एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Job Majha : राष्ट्रीय आरोग्य अभियान,संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट येथे नोकरीच्या संधी, लवकर करा अर्ज
Job Majha : पाचोरा पिपल्स को - ऑपरेटिव्ह बँक (जळगाव), राष्ट्रीय आरोग्य अभियान या ठिकाणी भरती सुरू असून त्यासाठी अर्ज कसा करायचा, काय पात्रता आहे याची सविस्तर माहिती
Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
पाचोरा पिपल्स को - ऑपरेटिव्ह बँक, जळगाव
- पोस्ट - मुख्य कार्यकारी अधिकारी, शाखा व्यवस्थापक
- शैक्षणिक पात्रता - MBA/ CA/ पदवीधर
- एकूण जागा - 06
- ईमेलद्वारे तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे.
- अर्ज पाठवण्याचा ईमेल आयडी - pachorapeoples@yahoo.in
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 22 जुलै 2022
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, अहमदनगर
- पोस्ट - सहाय्यक प्राध्यापक, भौतिक संचालक, ग्रंथपाल
- शैक्षणिक पात्रता - M.Sc., NET/ SET/ Ph.D
- एकूण जागा - 48
- थेट मुलाखत होणार आहे.
- मुलाखतीचा पत्ता - संजीवनी कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, सहजानंदनगर ता.कोपरगाव, जि.अहमदनगर 423603
- मुलाखतीची तारीख - 27 जुलै 2022
- तपशील - sanjivani.org.in
राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई
- पोस्ट - शहर कार्यक्रम व्यवस्थापक, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक
- शैक्षणिक पात्रता - MBBS/ BDS
- एकूण जागा - 111
- वयोमर्यादा - 18 ते 38 वर्ष
- अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 25 जुलै 2022
- तपशील - arogya.maharashtra.gov.in
टीएचडीसी इंडिया लिमिटेड (टिहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड)
- पोस्ट - इंजिनिअरिंग ट्रेनी सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल
- शैक्षणिक पात्रता - B.E/B.Tech/B.Sc अभियांत्रिकी इन सिव्हिल/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल 2022 ची GATE परीक्षा दिली असावी
- एकूण जागा - 45
- वयोमर्यादा - 30 वर्षांपर्यंत
- ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 1 ऑगस्ट 2022
- तपशील - www.thdc.co.in (या वेबसाईटवर गेल्यावर career मध्ये job opportunities मध्ये new openings वर क्लिक करा. तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. advertisement download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
मुंबई
Advertisement