एक्स्प्लोर

Indian Navy Recruitment 2024 : भारतीय नौदलातील भरती! बी.टेक कॅडेट पदांसाठी करा अर्ज; अधिक माहिती वाचा

Indian Navy B.tech Cadet Entry Scheme : भारतीय नौदलातील 10+2 बी.टेक कॅडेट प्रवेश योजनेअंतर्गत भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.

Indian Navy B.tech Cadet Entry Scheme 2024 : जर तुम्ही दहावी (SSC) किंवा बारावी (HSC) उत्तीर्ण असाल आणि सरकारी नोकरीसाठी (Government Job) इच्छुक असाल आणि भारतीय सैन्यात भरती (Indian Navy Recruitment 2024) होण्याचे स्वप्न पाहत असाल तर, तुम्हाला भारतीय सैन्याचा भाग बनण्याची सुवर्ण संधी आहे. भारतीय नौदलाने 10+2 B.Tech प्रवेश 2024 साठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2024 आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाइन माध्यमातून अर्ज करून या भरतीमध्ये सामील होऊ शकतात. अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने करता येतो आणि कोणतेही शुल्क जमा करावे लागणार नाही.

भारतीय नौदलातील भरती

या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट joinindiannavy.gov.in वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करू शकतात. भरतीसाठी ऑनलाइन अर्ज 20 जानेवारी 2024 या अंतिम तारखेपर्यंत भरता येईल. भारतीय नौदलात 10+2 (B.TECH) कॅडेट एंट्री स्कीम भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. 12 वी उत्तीर्ण झालेल्या आणि भारतीय नौदलात भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. भारतीय नौदलाने कार्यकारी आणि तांत्रिक शाखेच्या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

Indian Navy Recruitment 2024 : रिक्त पदांचा तपशील

भारतीय नौदल कॅडेट एंट्री स्कीम भरतीअंतर्गत एकूण 35 पदांवर भरती करण्यात येणार आहे. यामधील 10 पदे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.

Indian Navy Recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता काय आहे?

या भरतीअंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवार दहावी, बारावी परीक्षा किंवा इतर बोर्डातून समकक्ष परीक्षा पास असणे गरजेचं आहे. उमेदवाराने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित (PCM) विषयांमध्ये किमान 70 टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासह, उमेदवाराने जेईई मेन 2023 च्या प्रवेश परीक्षेत भाग घेतलेला असणं आवश्यक आहे. 

Indian Navy Recruitment 2024 : वयोमर्यादा

या भरतीसाठी इच्छुक उमेदवाराचा जन्म 2 जानेवारी 2005 ते 1 जुलै 2007 दरम्यान झालेला असावा. उमेदवाराची किमान उंची 157 सेमी पेक्षा किंवा त्याहून अधिक असावी. या भरती मोहिमेसाठी पात्रता आणि निकष याबद्दलच्या तपशीलवार माहितीसाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.

भारतीय नौदल कॅडेट एंट्री स्कीम डायरेक्ट भरती लिंकसाठी येथे क्लिक करा

भारतीय नौदल कॅडेट एंट्री स्कीम भरतीची अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

IT Recruitment 2024 : आयकर विभागात नोकरीची संधी! कुठे करायचा अर्ज, शेवटची तारीख काय? सर्व माहिती एका क्लिकवर...

महत्त्वाच्या बातम्या

देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
NEET मध्ये अपयशी झाली, तरीही जिद्द नाही सोडली, वयाच्या 21 व्या वर्षीच मिळवल्या पाच सरकारी नोकऱ्या, शुभांगीवर कौतुकाचा वर्षाव
NEET मध्ये अपयशी झाली, तरीही जिद्द नाही सोडली, वयाच्या 21 व्या वर्षीच मिळवल्या पाच सरकारी नोकऱ्या, शुभांगीवर कौतुकाचा वर्षाव
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी गुड न्यूज, देशातील 7 राज्यात 12 लाख नवीन नोकऱ्या मिळणार, महाराष्ट्रात किती?  
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी गुड न्यूज, देशातील 7 राज्यात 12 लाख नवीन नोकऱ्या मिळणार, महाराष्ट्रात किती?  

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget