NEET मध्ये अपयशी झाली, तरीही जिद्द नाही सोडली, वयाच्या 21 व्या वर्षीच मिळवल्या पाच सरकारी नोकऱ्या, शुभांगीवर कौतुकाचा वर्षाव
सध्याचे युग हे स्पर्धेचं युग आहे असं म्हटलं जातं. या स्पर्धेच्या युगात टियाकयचं असेल तर तुम्हाला संघऱष करावाच लागतो. आज अनेक मुलं प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन यशाचं शिखर गाठताना दिसत आहेत.
Success Story : सध्याचे युग हे स्पर्धेचं युग आहे असं म्हटलं जातं. या स्पर्धेच्या युगात टियाकयचं असेल तर तुम्हाला संघऱष करावाच लागतो. आज अनेक मुलं प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन यशाचं शिखर गाठताना दिसत आहेत. आज आपण मध्य प्रदेश पोलीस कॉन्स्टेबल शुभांगी मिश्रा यांची यशोगाथा पाहणार आहोत. कोणत्याही महागड्या कोचिंगशिवाय, शुभांगी यांनी वयाच्या 21 वर्षीय पाच सरकारी नोकऱ्या मिळवण्याचा पराक्रम केला आहे. यूट्यूब आणि स्व-अभ्यासाच्या जोरावर तिने हे यश मिळवलं आहे. नीट परीक्षेत अपयशी ठरल्यानंतरही हार न मानता शुभांगीने मिळवलेलं यश प्रत्येक स्पर्धाशील विद्यार्थ्यासाठी एक आदर्श आहे.
मध्य प्रदेश पोलीस कॉन्स्टेबल शुभांगी मिश्रा यांची यशोगाथा खरोखरच प्रेरणादायी आहे. एकेकाळी त्यांना डॉक्टर व्हायचे होते आणि त्यांनी नीट (NEET) परीक्षेची तयारीही केली होती, पण त्यांना एमबीबीएसची जागा मिळू शकली नाही. असे असूनही, तिने हार मानली नाही आणि आपले ध्येय बदलले. योग्य दिशेने काम करून, त्यांनी वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी अल्पावधीतच पाच सरकारी नोकऱ्या मिळवल्या. सध्या शुभांगी मिश्रा शहडोल पोलीस लाइन्समध्ये कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत.
शुभांगीचा जन्म 24 ऑक्टोबर 2004 रोजी झाला. वयाच्या 21 व्या वर्षी, शुभांगी मिश्रा यांनी डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 दरम्यान होणाऱ्या पाचही स्पर्धा परीक्षांसाठी अर्ज भरले. त्यानंतर सुमारे पाच ते सहा महिने कठोर परिश्रम घेतले आणि परिणामी, जून-जुलै 2026 मध्ये त्यांची पाचही परीक्षांसाठी निवड झाली.
शुभांगीचे वडील हेड कॉन्स्टेबल
एकाच वेळी पाच सरकारी नोकऱ्या मिळवल्याने शुभांगीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सर्वांना आश्चर्यचकित करणारी शुभांगी मिश्रा ही मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्यातील शाहपूर गावची रहिवासी आहे. तिचे वडील, श्याम कुमार मिश्रा, हे देखील मध्य प्रदेश पोलिसात हेड कॉन्स्टेबल असून सध्या शहडोल आयजी कार्यालयात कार्यरत आहेत. आपल्या मुलीच्या अभूतपूर्व यशाने वडील खूप आनंदित झाले आहेत. मुलींना शिक्षण आणि प्रगतीसाठी पूर्ण संधी दिल्यास त्याही मोठे यश मिळवू शकतात असे ते म्हणाले. .
कोणत्याही क्लासशिवाय मिळवले यश
शुभांगीने दिलेल्या माहितीनुसार, तिने कोणत्याही महागड्या कोचिंग संस्थांच्या मदतीशिवाय या पाच स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवले आहे. ती 8 जून 2026 रोजी मध्य प्रदेश पोलिसात कॉन्स्टेबल म्हणून रुजू झाली. एमपी पोलिस कॉन्स्टेबल व्यतिरिक्त, तिची इतर चार महत्त्वाच्या पदांसाठीही निवड झाली आहे: एसएससी स्टेनोग्राफर, मध्य प्रदेश पोलिस उपनिरीक्षक, सहाय्यक उपनिरीक्षक (एएसआय-स्टेनो) आणि सुभेदार.
नीट परीक्षेतील अपयशाने एका नव्या प्रवासाची सुरुवात
शुभांगीने दिलेल्या माहितीनुसार, तिने यूट्यूबच्या मदतीने घरबसल्या तयारी केली. तिला स्वतःवर पूर्ण विश्वास होता. ज्यामुळे तिने एकाच वेळी पाच परीक्षा उत्तीर्ण केल्या. बारावी पूर्ण झाल्यावर, डॉक्टर बनण्याचे स्वप्न घेऊन तिने नीट परीक्षा दिली. तिला पहिल्या प्रयत्नात 400 आणि दुसऱ्या प्रयत्नात 570 गुण मिळाले, पण कट-ऑफमुळे तिला एमबीबीएसची जागा मिळू शकली नाही. हा तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ होता, पण हार मानण्याऐवजी तिने आपले ध्येय बदलले आणि मध्य प्रदेश पोलीस कॉन्स्टेबल बनण्याचा निर्णय घेतला.
दररोज 8 ते 10 तास अभ्यास
आपली दिशा बदलल्यानंतर, शुभांगीने दररोज 8 ते 10 तास अभ्यास करून स्पर्धा परीक्षांची कसून तयारी सुरू केली. तिने यूट्यूब, ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि स्व-अध्ययनाला आपला सर्वात मोठा आधार मानले. तिचा विश्वास आहे की, "अपयश हा कधीही शेवट नसतो; ती एका नवीन सुरुवातीची संधी असते." आता, UPSC किंवा राज्य PCS परीक्षा उत्तीर्ण करून एक कुशल नागरी सेवक बनणे हे तिचे पुढचे आणि सर्वात मोठे स्वप्न आहे, ज्यासाठी ती सातत्याने तयारी करत आहे. लहानपणापासूनच नागरी सेवांमध्ये सामील होण्याचे त्यांचे स्वप्न होते असे तीन सांगितले.






















