एक्स्प्लोर
Advertisement
Job Majha : भारतीय रिझर्व्ह बँक, राष्ट्रीय आरोग्य अभियान येथे नोकरीची संधी
Job Majha : EXIM बँक आणि भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.
Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
EXIM बँक
- पोस्ट – अधिकारी
- शैक्षणिक पात्रता - MBA/PGDBA/ पदवीधर/ पदव्युत्तर पदवी
- एकूण जागा – 30
- वयोमर्यादा – 40 वर्षांपर्यंत
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 एप्रिल 2022
- तपशील - www.eximbankindia.in (या वेबसाईटवर गेल्यावर खालच्या बाजूला असलेल्या careers वर क्लिक करा. Recruitment of Officers on Contract. यावर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जालना
- पोस्ट - हृदयरोगतज्ज्ञ, नेफ्रोलॉजिस्ट, सर्जन, स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, फिजिशियन, ऑर्थोपेडिशियन
- शैक्षणिक पात्रता – MBBS/ MD/ MS
- एकूण जागा - 22
- ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – जिल्हा रुग्णालय, जालना
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 एप्रिल 2022
- तपशील - jalna.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर Notices मध्ये recruitment वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. View file करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
भारतीय रिझर्व्ह बँक
पोस्ट - असिस्टंट मॅनेजर (राजभाषा)
- शैक्षणिक पात्रता - इंग्रजी विषयासह हिंदी द्वितीय श्रेणी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य
- एकूण जागा – 6
- वयोमर्यादा – 21 ते 30 वर्ष
- नोकरीचं ठिकाण – मुंबई
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 एप्रिल 2022
- तपशील - rbi.org.in
दुसरी पोस्ट - असिस्टंट मॅनेजर (शिष्टाचार आणि सुरक्षा)
- शैक्षणिक पात्रता - उमेदवार सैन्यात / नौदल / हवाई दलात कमीतकमी पाच वर्षे कमिशन सेवेचा अधिकारी असावा.
- एकूण जागा – 03
- वयोमर्यादा – 25 ते 40 वर्ष
- नोकरीचं ठिकाण – मुंबई
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 एप्रिल 2022
- तपशील - rbi.org.in (या वेबसाईटवर गेल्यावर whats new मध्ये Recruitment related Announcements वर क्लिक करा. त्यात 28 मार्च 2022 मध्ये जाहीर झालेल्या संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आरोग्य
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement