एक्स्प्लोर

​India Post GDS Recruitment 2023: भारतीय पोस्ट विभागात 40 हजार पदांची भरती; संधी सोडू नका, आजच अर्ज करा

​India Post GDS Jobs 2023: इंडिया पोस्टनं भरती अधिसूचना जारी केली आहे आणि 40 हजारांहून अधिक पदांसाठी रिक्त जागा भरल्या आहेत. ज्यासाठी उमेदवारांनी लवकर अर्ज करावा.

​India Post GDS Jobs 2023: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी. अलीकडेच, टपाल विभागाने हजारो पदांच्या भरतीसंदर्भातील अधिसूचना जारी केली होती. भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार आणि पात्र उमेदवार indiapostgdsonline.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या मोहिमेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 फेब्रुवारी 2023 निश्चित करण्यात आली आहे. उमेदवार येथे नमूद केलेल्या माहितीच्या आधारे भरतीसाठी अर्ज करू शकतात.

भारतीय पोस्टची ही भरती मोहीम ग्रामीण डाक सेवक (GDS) च्या 40,889 रिक्त पदांच्या भरतीसाठी आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेद्वारे देशभरात जीडीएसची पदं भरली जाणार आहेत. GDS पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा 

अधिसूचनेनुसार, भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय 18 ते 40 वर्ष असावं. तसेच, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमांनुसार, कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

वेतनश्रेणी 

या पदांवर निवडलेल्या उमेदवारांना 10,000 रुपये ते 24,470 रुपये प्रति महिना वेतन दिलं जाईल.

कशी होणार निवड? 

या पदांसाठी अर्जदारांची निवड इयत्ता दहावीत मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल.

अर्ज शुल्क किती असेल? 

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरावं लागेल. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावं लागेल. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क भरण्यातून सूट देण्यात आली आहे.

कसा कराल अर्ज? 

स्टेप 1: सर्वात आधी उमेदवार अधिकृत वेबसाईट indiapostgdsonline.gov.in  वर भेट द्या. 
स्टेप 2: त्यानंतर रजिस्ट्रेशन करा. 
स्टेप 3: आता उमेदवार अर्ज भरा. 
स्टेप 4: अर्जात विचारल्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रं अपलोड करा.
स्टेप 5: आता अर्ज शुल्क भरा. 
स्टेप 6: भरलेला फॉर्म सबमिट करावा. 
स्टेप 7: फॉर्म सबमिट झाल्यानंतर डाऊनलोड करावा. 
स्टेप 8: फॉर्मची एक प्रिंटआऊट काढून स्वतःजवळ ठेवा. 

अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.  

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Job Majha : दहावी पास आहात? वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडमध्ये आणि महावितरण अमरावती येथे विविध पदांसाठी भरती 

महत्त्वाच्या बातम्या

Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget