(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Job Majha : दहावी पास आहात? वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडमध्ये आणि महावितरण अमरावती येथे विविध पदांसाठी भरती
Job Majha : वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडमध्ये आणि महावितरण अमरावती येथे विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.
Job Majha : वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडमध्ये विविध पदांच्या 135 जागांसाठी भरती निघाली आहे. महावितरण अमरावती आणि महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण येथे देखील विविध पदांसाठी भरती होणार आहे. यातील महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणसाठी थेट मुलाखतीद्वारे निवड होणार आहे. तर इतर दोन ठिकाणच्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.
वेस्टर्न कोलफिल्ड लि.
पोस्ट छ माइनिंग सिरदार T&S ग्रुप ‘C’
शैक्षणिक पात्रता : 10 वी परीक्षा उत्तीर्ण, माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि ओवरमन, प्रथमोपचार प्रमाणपत्र
एकूण जागा : 107
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट : www.westerncoal.in
पोस्ट : सर्व्हेअर (माइनिंग) T&S ग्रुप ‘B’
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण, खाण सर्वेक्षण इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि सर्व्हेअर प्रमाणपत्र
एकूण जागा : 28
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्ष
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट : www.westerncoal.in
महावितरण, अमरावती
पोस्ट : अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता : 12 वी पास, ITI
एकूण जागा : 56
वयोमर्यादा : 27 वर्षांपर्यंत
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट : www.mahadiscom.in
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण
पोस्ट : संचालक, उपसंचालक, सहायक संचालक, सचिव, कक्ष अधिकारी
शैक्षणिक पात्रता : पदवी/ पदव्युत्तर पदवी
एकूण जागा : 11
नोकरीचं ठिकाण : मुंबई
मुलाखतीद्वारे निवड होणार आहे.
मुलाखतीची तारीख : 14 आणि 15 फेब्रुवारी 2023
मुलाखतीचा पत्ता : महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण, मुंबई
अधिकृत वेबसाईट : www.mwrra.org
अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
महत्वाच्या बातम्या