IBPS SO Recruitment 2022 : बँकेत नोकरीसाठी अर्जाची शेवटची संधी, 710 पदांवर भरती, आजच करा अर्ज
IBPS Recruitment 2022 : बँकेत SO पदांवरील भरतीसाठी सुवर्णसंधी आहे. या भरती अंतर्गत 710 रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे.
IBPS SO Recruitment 2022 : तुम्ही बँकेत नोकरीसाठी ( Bank Job Vacancy ) संधीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बँकेत SO पदांवरील भरती सुरु झाली आहे. इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनने (IBPS) SO पदांवरील भरतीसाठी अर्ज दाखल करण्याती आज शेवटची तारीख आहे. IBPS भरतीसाठी अर्ज करण्याची आज शेवटची संधी आहे. IBPS ही भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या मालकीची केंद्रीय भरती संस्था आहे. या IBPS संस्थेद्वारे राष्ट्रीय बँकामधील भरतीसाठी भरती प्रक्रिया राबवली जाते.
IBPS SO भरती अंतर्गत स्पेशालिस्ट ऑफीसर ( Specialist Officer ) पदांवर भरती करण्यात येणार आहे. IBPS भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ibps.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन लवकरात लवकर अर्ज दाखल करावा. या भरतीसाठी अर्ज करण्याआधी उमेदवाराने पूर्ण अधिसूचना नीट वाचून घ्यावी. ही अधिसूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
IBPS SO भरती अंतर्गत कायदा अधिकारी, आयटी अधिकारी, कृषी क्षेत्र अधिकारी, राजभाषा अधिकारी, एचआर/पर्सनल अधिकारी आणि व्यवस्थापकीय अधिकारी या पदांवर भरती केली जाईल.
IBPS SO Recruitment 2022 : 'या' बँकांमध्ये होणार भरती
IBPS SO भरती अंतर्गत बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, यूको बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक आणि पंजाब आणि सिंध बँक या बँकामध्ये विविध पदांवर भरती करण्यात येणार आहे.
IBPS SO Recruitment 2022 : रिक्त पदांचा तपशील
- कृषी क्षेत्र अधिकारी ( Agriculture Field Officer ) : 516
- व्यवस्थापकीय अधिकारी ( Managing Officer ) : 100
- आयटी अधिकारी ( IT Officer ) : 44
- राजभाषा अधिकारी ( Rajbhasha Officer ) : 25
- एचआर/पर्सनल अधिकारी ( HR/Personnel Officer ) : 15
- कायदा अधिकारी ( Law Officer ) : 10
IBPS SO Recruitment 2022 : अर्जाचे शुल्क
IBPS SO भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना 850 रुपये अर्जाचे शुल्क भरावे लागेल. आरक्षित वर्गातील उमेदवाराला शुल्कात सूट देण्यात आली असून त्यांना केवळ 175 रुपये शुल्क भरावं लागेल.
IBPS SO Recruitment 2022 : वयोमर्यादा
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 ते 30 वर्ष असावे.
IBPS SO Recruitment 2022 : कशी असेल निवड प्रक्रिया?
या भरतीसाठी निवड प्रक्रिया प्रवेशस परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत या प्रकारे करण्यात येईल. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवाराने येथे दिलेल्या डायरेक्ट लिंकवर क्लिक करा.