HPCL Recruitment 2023 : हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये मोठी भरती; तपशील जाणून घ्या
HPCL Recruitment 2023 : हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने बंपर पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ज्यासाठी उमेदवार आजपासून अर्ज करू शकतात.
Job Majha : हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार, HPCL मार्फत विविध पदांवर भरती केली जाणार आहे. ज्यासाठी तुम्ही आता अर्ज करु शकता. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी आहे. त्यामुळे तुम्ही नोकरीच्या शोधात असाल, तर तुम्ही ही संधी अजिबात सोडू नका.
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. मुंबई
एकूण जागा : 60
रिक्त पदाचे नाव : असिस्टंट प्रोसेस टेक्निशियन
शैक्षणिक पात्रता : B.Sc. केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
एकूण जागा : 30
वयाची अट : 18 ते 25 वर्षे
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 फेब्रुवारी 2023
अधिकृत तपशील : hpcl.co.in
दुसरी पोस्ट
असिस्टंट बॉयलर टेक्निशियन
शैक्षणिक पात्रता : बारावी उत्तीर्ण किंवा ITI, प्रथम श्रेणी बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र
एकूण जागा : 07
वयाची अट : 18 ते 25 वर्षे
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 फेब्रुवारी 2023
अधिकृत तपशील : hpcl.co.in
तिसरी पोस्ट
असिस्टंट फायर & सेफ्टी ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता : (i) बारावी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) बेसिक फायरमन कोर्स किंवा नागपूर फायर कॉलेजकडून सब ऑफिसर्स कोर्स किंवा 60 टक्के गुणांसह फायर & सेफ्टी डिप्लोमा (iii) अवजड वाहन चालक परवाना
एकूण जागा : 18
वयाची अट : 18 ते 25 वर्षे
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 फेब्रुवारी 2023
अधिकृत तपशील : hpcl.co.in
चौथी पोस्ट
असिस्टंट मेंटेनेंस टेक्निशियन (इलेक्ट्रिकल)
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा
एकूण जागा : 05
वयाची अट : 18 ते 25 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 फेब्रुवारी 2023
अधिकृत तपशील : hpcl.co.in
अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :