HAL Recruitment 2024 : सरकारी नोकरीची संधी! हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये वॉक-इन-इंटरव्यू, 324 पदांवर भरती
HAL Apprentice Recruitment 2024 : हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये शिकाऊ उमेदवाराच्या 324 रिक्त जागांवर भरती करण्यात येणार असून वॉक-इन-मुलाखत घेण्यात येणार आहे.
मुंबई : आयटीआय (ITI) किंवा डिप्लोमा (Diploma) केला आहे आणि नोकरी मिळत नाहीय किंवा चांगल्या नोकरीच्या शोधात अशा उमेदवारांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. आयआयटी किंवा डिप्लोमा केलेल्या उमेदवारांना सरकारी नोकरी (Government Job) करण्याची नामी संधी चालून आली आहे. हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये (Hindustan Aeronautics Limited) शिकाऊ उमेदवाराच्या 324 रिक्त जागांवर भरती करण्यात येणार असून वॉक-इन-मुलाखत घेण्यात येणार आहे. हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये (HAL Recruitment 2024) शिकाऊ उमेदवाराच्या 324 रिक्त जागांवर भरती करण्यात येणार असून वॉक-इन-मुलाखत घेण्यात येणार आहे.
हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये 324 पदांवर भरती
एचएएल भरती 2024 साठी (HAL) 20 ते 24 मे दरम्यान वॉक-इन-इंटरव्यू घेण्यात येणार आहेत. एचएएल अपरेंटिस भरतीच्या अधिसूचनेनुसार, कंपनी ग्रॅज्युएट शिकाऊ उमेदवार, डिप्लोमा शिकाऊ उमेदवार आणि आयटीआय शिकाऊ उमेदवार पदांवरील भरतीसाठी वॉक-इन-मुलाखत घेणार आहे. य भरती अंतर्गत एकूण 324 रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे.
रिक्त पदांचा तपशील
- एकूण रिक्त पदे - 324 पदे
- इंजिनियरिंग ग्रॅज्युएट अपरेंटिस - 64 पद
- टेक्निकल (डिप्लोमा) अपरेंटिस - 35 पद
- जनरल स्ट्रीम ग्रॅज्युएट अपरेंटिस - 25 पद
- आयटीआय ट्रेड अपरेंटिस - 200 पद
HAL Walk-in-Interview 2024 : आवश्यक कागदपत्रे (Important Document)
- दोन पासपोर्ट साइज फोटो
- आधार कार्ड
- एसएससी किंवा 10 दहावीची गुणपत्रिका
- आयटीआय अंक प्रमाणपत्र (सर्व सेमिस्टरसह)
- जन्म प्रमाणपत्र (जर एसएससी प्रमाणपत्रावर जन्मतारखेचा उल्लेख नसेल तर)
- आरक्षण/समुदाय/जात प्रमाणपत्र (SC, ST, OBC, EWS, XSM, PWD/PH) लागू असल्यास.
HAL Recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता
हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडच्या या भरतीसाठी पात्र उमेदवार आयटीआय किंवा डिप्लोमा पदवी प्राप्त किंवा संबंधित विषयामध्ये ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे.
HAL Walk-in-Interview Venue : मुलाखतीचे ठिकाण
पत्ता : हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड, एवियोनिक्स डिवीजन, सभागह, प्रशिक्षण आणि विकास विभागच्या मागे, बालानगर, हैदराबाद- 500042.
अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या (Job Vacancy) शोधात आहेत. मात्र अनेक वेळा पात्रता (Eligibility), शिक्षण (Education) असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'नं (ABP Majha) पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुणांपर्यंत सरकारी नोकरीच्या (Government Job News) भरतीची माहिती दिली जाते. संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन पात्र उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतील.
महत्त्वाच्या इतर बातम्या :