एक्स्प्लोर

Government Job : 10 वी, 12 वी उत्तीर्ण झालेल्यांसाठी मोठी संधी! 22,000 हून अधिक सरकारी नोकऱ्या, लाखात पगार मिळणार

Sarkari Nokari: पोलिस आणि आरपीएफ कॉन्स्टेबलपासून लिपिक आणि डेटा एन्ट्री ऑपरेटरपर्यंतच्या विविध पदांसाठी भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्यांना या संधीचा लाभ घेता येईल.

Government Job : 10वी आणि 12वी उत्तीर्ण उत्तीर्ण झाला असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) आणि SSC CHSL सह अनेक भरती जाहीर झाल्या आहेत. याद्वारे कॉन्स्टेबल, सब इन्स्पेक्टर, ड्रायव्हर, लिपिक, कनिष्ठ सहाय्यक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, स्टेनोग्राफर, लॅब अटेंडंट अशा पदांवर नोकऱ्या उपलब्ध आहेत. 

जर तुम्हाला हायस्कूल आणि इंटरमिडिएट परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर सरकारी नोकरी हवी असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. किंवा तुमच्या आजूबाजूला जर असे कुणी असतील तर त्यांनाही याबद्दल माहिती देऊ शकता. दहावी आणि बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू करणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. 

एसएससी सीएचएसएल म्हणजेच कंबाइंड हायर सेकेंडरी लेवल परीक्षा ही 12वी उत्तीर्ण झालेल्यांसाठी आहे. याद्वारे केंद्र सरकारच्या विविध विभाग आणि मंत्रालयांमध्ये लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC)/कनिष्ठ सचिवालय सहाय्यक आणि डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) सारख्या पदांवर भरती केली जाते. 10वी आणि 12वी उत्तीर्णांसाठीच्या पाच भरतीबद्दल जाणून घेऊया,

आरपीएफ कॉन्स्टेबल भरती 2024 (RPF Constable Recruitment 2024)

आरपीएफ म्हणजेच रेल्वे संरक्षण दलात 10वी पाससाठी 4208 कॉन्स्टेबलची भरती आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे आहे. आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीसाठी वयोमर्यादा 18 ते 28 वर्षे आहे. अनुसूचित जाती/जमातींना कमाल वयात 5 वर्षे सूट मिळेल आणि ओबीसी (नॉन क्रीमी लेयर) उमेदवारांना तीन वर्षांची सूट मिळेल. यासाठी आरआरबीच्या वेबसाइट्सवर जाऊन अर्ज करावा लागेल.

SSC CHSL भरती 2024

कर्मचारी निवड आयोगाने SSC CHSL 2024 ची अधिसूचना जारी केली आहे. 12वी पास एसएससी सीएचएसएल म्हणजेच कंबाइंड हायर सेकेंडरी लेवलसाठी अर्ज करू शकतात. याद्वारे डेटा एंट्री ऑपरेटर आणि लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC)/कनिष्ठ सचिवालय सहाय्यक यांच्या 3712 रिक्त पदांवर भरती केली जाईल. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 मे आहे. SSC वेबसाइट ssc.gov.in वर जाऊन अर्ज करावा लागेल. 

नवोदय विद्यालय समिती भरती 2024

नवोदय विद्यालय समिती (NVS) मध्ये शिक्षकेतर पदांसाठी 1377 रिक्त जागा आहेत. याद्वारे परिचारिका, अधिकारी, सहाय्यक, लघुलेखक, एमटीएस, लॅब अटेंडंट, मेस हेल्पर, संगणक ऑपरेटर अशा पदांवर भरती होणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइट nvs.ntaonline.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता 10वी, 12वी उत्तीर्ण, BA/B.Sc आहे.

पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 (Police Constable Recruitment 2024)

गुजरात पोलिसांनी कॉन्स्टेबल आणि जेल कॉन्स्टेबलच्या 12472 रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. 10वी आणि 12वी पास यासाठी अर्ज करू शकतात. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल आहे. https://ojas.gujarat.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करावा लागेल.

एअर इंडियामध्ये भरती (Air India Recruitment 2024)

Air India Air Transport Services Limited (AIATSL) किंवा AI Airport Services Limited (AIASL) ने युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर आणि हँडीमॅन/हँडीवुमन या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. 10वी पास यासाठी अर्ज करू शकतात. ही भरती कंत्राटी पद्धतीने होणार आहे. अधिसूचनेनुसार, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर आणि हँडीमॅन/हँडीवुमनसाठी 422 जागा रिक्त आहेत. https://www.aiasl.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करावा लागेल.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

VIDEO : वसईवाल्यांना वसईतच ठेवू, डहाणूपर्यंत येऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; तर हितेंद्र ठाकुरांचाही पलटवार
वसईवाल्यांना वसईतच ठेवू, डहाणूपर्यंत येऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; तर हितेंद्र ठाकुरांचाही पलटवार
दिल्लीनं लखनौच्या नवाबांचा खेळ बिघडवला, राजस्थानच्या रजवाड्यांना फायदा! 2 जागा, 3 संघ, कुणाला मिळणार प्लेऑफचं तिकिट?
दिल्लीनं लखनौच्या नवाबांचा खेळ बिघडवला, राजस्थानच्या रजवाड्यांना फायदा! 2 जागा, 3 संघ, कुणाला मिळणार प्लेऑफचं तिकिट?
दिल्लीचा शेवट गोड, लखनौचा 19 धावांनी पराभव, अर्शदची एकाकी झुंज
दिल्लीचा शेवट गोड, लखनौचा 19 धावांनी पराभव, अर्शदची एकाकी झुंज
Prakash Ambedkar : ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Hitendra Thakur : वसईवाल्यांना तिथेच निपटावू, फडणवीसांचा हितेंद्र ठाकूरांना इशाराJaipur 17 Crore Injection : लोक वर्गणीतून उभारले पैसे, 23 महिन्याच्या बाळाला दिलं 17 कोटींचं इंजेक्शनABP Majha Headlines : 11 PM : 14 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 10 PM : 14 May 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
VIDEO : वसईवाल्यांना वसईतच ठेवू, डहाणूपर्यंत येऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; तर हितेंद्र ठाकुरांचाही पलटवार
वसईवाल्यांना वसईतच ठेवू, डहाणूपर्यंत येऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; तर हितेंद्र ठाकुरांचाही पलटवार
दिल्लीनं लखनौच्या नवाबांचा खेळ बिघडवला, राजस्थानच्या रजवाड्यांना फायदा! 2 जागा, 3 संघ, कुणाला मिळणार प्लेऑफचं तिकिट?
दिल्लीनं लखनौच्या नवाबांचा खेळ बिघडवला, राजस्थानच्या रजवाड्यांना फायदा! 2 जागा, 3 संघ, कुणाला मिळणार प्लेऑफचं तिकिट?
दिल्लीचा शेवट गोड, लखनौचा 19 धावांनी पराभव, अर्शदची एकाकी झुंज
दिल्लीचा शेवट गोड, लखनौचा 19 धावांनी पराभव, अर्शदची एकाकी झुंज
Prakash Ambedkar : ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
रोहित-आगरकरला पांड्या नको होता, बीसीसीआयच्या दबावामुळे विश्वचषकाच्या संघात स्थान
रोहित-आगरकरला पांड्या नको होता, बीसीसीआयच्या दबावामुळे विश्वचषकाच्या संघात स्थान
व्हिएतनाममध्ये भारतीय खेळाडूंचा डंका; रूपा बायोरने मिळवून दिले पहिले ऐतिहासिक पदक  
व्हिएतनाममध्ये भारतीय खेळाडूंचा डंका; रूपा बायोरने मिळवून दिले पहिले ऐतिहासिक पदक  
ऑन कॅमेरा कर्णधाराला झाप झापलं; दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी गोयंकांनी राहुल घरी बोलवले, फोटो व्हायरल 
ऑन कॅमेरा कर्णधाराला झाप झापलं; दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी गोयंकांनी राहुल घरी बोलवले, फोटो व्हायरल 
काय सांगता? नवऱ्याने 5 रुपयाचे कुरकुरे आणले नाहीत, म्हणून पत्नीचं धक्कादायक पाऊल
काय सांगता? नवऱ्याने 5 रुपयाचे कुरकुरे आणले नाहीत, म्हणून पत्नीचं धक्कादायक पाऊल
Embed widget