बँकेत नोकरीची मोठी संधी! विविध विभागात भरती प्रक्रिया सुरु, कसा कराल अर्ज?
Bank Jobs: बँकिंग क्षेत्रात करीअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी निर्माण झाली आहे. बँक ऑफ बडोदामध्ये भरती प्रक्रिया सुरु झाली आहे.
Bank Jobs : बँकिंग क्षेत्रात करीअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी निर्माण झाली आहे. बँक ऑफ बडोदामध्ये भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. स्पेशालिस्ट ऑफिसर पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती मोहिमेअंतर्गत संस्थेतील एकूण 1267 पदांवर नियुक्त्या करण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in द्वारे ऑनलाइन अर्ज करु शकतात. या भरती मोहिमेसाठी उमेदवारांना 17 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.
कोणत्या विभागात किती पद रिक्त?
ग्रामीण आणि कृषी बँकिंग विभाग: 200 पदे
किरकोळ दायित्व विभाग: 450 पदे
MSME बँकिंग विभाग: 341 पदे
माहिती सुरक्षा विभाग: 9 पदे
सुविधा व्यवस्थापन विभाग: 22 पदे
कॉर्पोरेट आणि संस्थात्मक पत विभाग: 30 पदे
वित्त विभाग : 13 पदे
माहिती तंत्रज्ञान विभाग: 177 पदे
एंटरप्राइझ डेटा मॅनेजमेंट ऑफिस विभाग: 25 पदे
बँक ऑफ बडोदा भरती प्रक्रियेसाठी पात्रता काय?
या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी, उमेदवार बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in वर माहिती पाहू शकतात. या साईटवर सविस्तर माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, उमेदवारांना अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 17 जानेवारी 2025 देण्यात आली आहेय
उमेदवारांची निवड कशी होणार?
निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाइन चाचणी, सायकोमेट्रिक चाचणी किंवा इतर कोणत्याही योग्य चाचणीचा समावेश असू शकतो. त्यानंतर, ऑनलाइन चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांना गटचर्चा आणि मुलाखतीसाठी बोलावले जाईल. ऑनलाइन परीक्षेत एकूण 150 प्रश्न असतील आणि त्याचे एकूण गुण 225 असतील. परीक्षेचा कालावधी 150 मिनिटांचा असेल. परीक्षेचे माध्यम इंग्रजी आणि हिंदी दोन्ही असेल, फक्त इंग्रजी भाषेची परीक्षा इंग्रजीमध्ये असेल.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांना मोठी संधी
दरवर्षी बँकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया होत असते. यावर्षीदेखील मोठ्या प्रमाणात बँकांमध्ये भरती प्रक्रिया होणार आहे. सध्या बँक ऑफ बडोदामध्ये विविध विभागात भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. दरम्यान, जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील त्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. या संधीचा त्यांनी लाभ घ्यावा. बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची त्यांना मोठी संधी आहे. दरम्यान, जे कोणी इच्छुक उमेदवार असतील त्.ांनी लवकरात लवकर अर्ज करणं गरजेचं आहे. कारण अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 17 जानेवारी आहे. अवधी जरी असला तरी लवकरात लवकर अर्ज करण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या: