बेरोजगार तरुणांसाठी मोठी संधी, 'ही' कंपनी 2000 कोटींची गुंतवणूक करणार, 6000 नवीन नोकऱ्या मिळणार
Job Opportunitie : बेरोजरगार तरुणांसाठी एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे. नोकरीची गरज असणाऱ्या उमेदवारांसाठी मोठ्या प्रमाणात नोकरीची संधी मिळणार आहे.
Job Opportunitie : बेरोजरगार तरुणांसाठी एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे. नोकरीची गरज असणाऱ्या उमेदवारांसाठी मोठ्या प्रमाणात नोकरीची संधी मिळणार आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनी नोएडामध्ये डेव्हलपमेंट सेंटर सुरू करण्याचा विचार करत आहे. या प्रकल्पामुळे आयटी क्षेत्रात सुमारे 6000 रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. यामुळं प्रादेशिक विकासाला मदत होईल.
15 एकर जागेवर डेव्हलपमेंट सेंटर केंद्र उभारणार
मायक्रोसॉफ्ट कंपनी 15 एकर जागेवर डेव्हलपमेंट सेंटर केंद्र उभारणार आहे. ही कंपनी अंदाजे 2000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या विकास केंद्रात तीन टॉवर असतील, जे पर्यावरणपूरक आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज असतील. दरम्यान, या नवीन प्रकल्पामुळं हजारो तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे.
कधी पूर्ण होणार प्रकल्प?
मायक्रोसॉफ्टने या प्रकल्पासाठी सविस्तर बांधकाम आराखडा नोएडा प्राधिकरणाकडे सादर केला आहे. हा प्रकल्प दोन टप्प्यात पूर्ण होणार आहे. पहिल्या टप्प्यात तीन टॉवर आणि त्यांची पार्किंग सुविधा बांधण्यात येणार असून, दुसऱ्या टप्प्यात इतर कामे पूर्ण केली जाणार आहेत. 2027 पर्यंत हे केंद्र कार्यान्वित करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. प्रस्तावित आराखड्यात फ्लोअर एरिया रेशो (FAR) आणि उंची मानके लक्षात ठेवण्यात आली आहेत. हे केंद्र पर्यावरणपूरक बनवण्यात हिरवीगार जागा आणि आधुनिक डिझाइन महत्त्वाची भूमिका बजावेल. नोएडा प्राधिकरणाने या प्रकल्पासाठी मंजुरीची प्रक्रिया सुरू केली असून, लवकरच बांधकाम सुरू होण्याची अपेक्षा आहे.
मायक्रोसॉफ्टचे हे केंद्र जेवर विमानतळाजवळ
मायक्रोसॉफ्टचे हे केंद्र नोएडा-ग्रेटर नोएडा एक्सप्रेसवेजवळ स्थित असेल, ज्यामुळे त्याची कनेक्टिव्हिटी सुधारेल. हे स्थान मेट्रो लाइन आणि आगामी नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाशी देखील जोडले जाईल, ज्यामुळे ते व्यवसाय आणि विकासासाठी एक मोक्याचे स्थान बनले आहे. नोएडा-ग्रेटर नोएडा एक्सप्रेसवे वर आधीच अनेक आयटी कंपन्या आहेत ज्यात TCS, HCL आणि Adobe सारख्या विदेशी कंपन्या देखील आहेत.
नोएडा आयटी हब होणार
हे विकास केंद्र नोएडाला भारतातील आयटी हबमध्ये समाविष्ट करण्यात मदत करेल. हे केंद्र केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही तंत्रज्ञानाच्या विकासाला प्रोत्साहन देईल. 6000 हून अधिक रोजगाराच्या संधी तरुणांसाठी उपलब्ध होणार आहेत. यामध्ये 2000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. यामुळं आर्थिक विकासाला गती मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या: