एक्स्प्लोर
IPL: झहीरच्या दिल्लीने खातं उघडलं, पंजाबवर मात
नवी दिल्ली: झहीर खानच्या दिल्ली डेअरडेव्हिल्सनं किंग्स इलेव्हन पंजाबचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवून आयपीएलच्या नवव्या मोसमात गुणांचं खातं उघडलं.
दिल्लीच्या फिरोझशाह कोटलावर झालेल्या या सामन्यात दिल्लीनं पंजाबला अवघ्या 111 धावांत रोखलं होतं. मग विजयासाठीच्या 112 धावांचा पाठलाग करताना दिल्लीचा सलामीवीर क्विंन्टन डी कॉकनं अर्धशतक झळकावलं.
डी कॉकनं 42 चेंडूंत नऊ चौकार आणि एका षटकारासह नाबाद 59 धावांची खेळी उभारली. तर संजू सॅमसननंही 32 चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकारासह 33 धावांची खेळू रचून दिल्लीच्या विजयात हातभार लावला.
याआधी अमित मिश्राच्या फिरकी माऱ्यासमोर पंजाबच्या फलंदाजांनी अक्षरश: नांगी टाकली. आणि 20 षटकांत पंजाबला नऊ बाद 111 धावांचीच मजल मारता आली. अमित मिश्रानं तीन षटकांत 11 धावांच्या मोबदल्यात चार विकेट्स काढल्या. तर झहीर खान, ख्रिस मॉरिस आणि जयंत यादवनं प्रत्येकी एक विकेट काढली.
पंजाबसाठी मनन व्होरानं सर्वाधिक 32 धावांची खेळी केली. दरम्यान किंग्स इलेव्हन पंजाबचा आयपीएलमधला हा सलग दुसरा पराभव ठरला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement