एक्स्प्लोर
Advertisement
IPL 2016 : बंगळुरु आणि हैदराबाद संघात अंतिम सामना
नवी दिल्ली : आयपीएलच्या नवव्या मोसमाच्या विजेतेपदासाठी रॉयल चॅलेन्जर्स बंगलोरला सनरायझर्स हैदराबादचा सामना करावा लागणार आहे. विराट कोहली आणि डेव्हिड वॉर्नरच्या फौजांमधला हा अंतिम सामना बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर रविवार, 29 मे रोजी खेळवण्यात येईल.
दिल्लीच्या कोटला स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या क्वालिफायर टू सामन्यात हैदराबादने गुजरात लायन्सला चार विकेट्सनी हरवून आयपीएलच्या फायनलमध्ये धडक मारली.
या सामन्यात गुजरातने हैदराबादला विजयासाठी 163 धावांचं लक्ष्य दिलं होतं. सलामीला आलेल्या डेव्हिड वॉर्नरने कर्णधारास साजेशी खेळी उभारुन हैदराबादच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. त्याने 58 चेंडूंत अकरा चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 93 धावांची खेळी रचली. वॉर्नरने बिपुल शर्माच्या साथीने सातव्या विकेटसाठी रचलेली 46 धावांची अभेद्य भागीदारी हैदराबादच्या विजयात निर्णायक ठरली. शर्माने 11 चेंडूंत तीन षटकारांसह नाबाद 27 धावांची खेळी केली.
त्याआधी, अॅरॉन फिन्चच्या 32 चेंडूंमधल्या 50 धावांच्या खेळीच्या जोरावर गुजरातने 20 षटकांत सात बाद 162 धावांची मजल मारली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
बीड
व्यापार-उद्योग
मुंबई
Advertisement