एक्स्प्लोर
...म्हणून क्रिकेटर्स सरावादरम्यान फुटबॉल खेळतात!
मुंबई : सरावादरम्यान मैदानात फुटबॉल खेळणारे क्रिकेटर्स, ही दृश्य आपल्यासाठी नवी नाहीत. पण क्रिकेटर्स फुटबॉलच का खेळतात, फुटबॉल खेळल्याने क्रिकेटर्संना नेमका काय फायदा होता, असे प्रश्न अनेकांना पडले असेल. आयपीएलच्या निमित्ताने या प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत.
रॉयल चॅलेन्जर्स बंगलोरचा कर्णधार विराट कोहलीच्या मते, मैदानाला चार फेऱ्या मारण्यापेक्षा काही मिनिटं फुटबॉल खेळल्याने चांगला व्यायाम होतो, शरीराची ताकद आणि चपळाई वाढते आणि थकवाही लवकर दूर होतो. त्यामुळे अनेकदा व्यायामाऐवजी केल्यावर क्रिकेटर्स फुटबॉल खेळणं पसंत करतात.
स्वतः विराट एक उत्तम फुटबॉलर असल्याची पावतीच त्याचा बंगलोरचा टीममेट शेन वॉटसनने दिली आहे. भारताचा कसोटी कर्णधार विराट हा रॉयल चॅलेन्जर्स संघाचा रोनाल्डो आहे, असं वॉटसनने म्हटलं आहे. विराटप्रमाणेच लोकेश राहुलही उत्तम फुटबॉल असल्याचं वॉटसनने म्हटलं आहे.
दुसरीकडे भारताच्या वन डे संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचं फुटबॉलप्रेम तर जगजाहीर आहे. आयपीएलमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्सचं नेतृत्त्व करणारा धोनी एका जमान्यात आपल्या शाळेच्या फुटबॉल संघासाठी गोल कीपिंगही करायचा. धोनी, कोहली, लोकेश राहुलप्रमाणेच मनीष पांडे आणि रवींद्र जाडेजा हे भारतीय शिलेदार तसंच ड्वेन स्मिथ, ड्वेन ब्राव्हो, डेल स्टेन आणि सॅम बिलिंग्सही उत्तम फुटबॉल खेळतात.
तसं फुटबॉल आणि क्रिकेटचं जवळचं नातं आहे. इंग्लंडचे अनेक क्रिकेटर्स आपल्या लहानपणी फुटबॉलही खेळायचे. इंग्लंडचे माजी कसोटीवर डेनिस कॉम्पटन यांनी आर्सेनलच्या संघाकडून अनेक स्पर्धा जिंकण्याचा पराक्रमही गाजवला आहे. इंग्लंडचे महान ऑलराऊंडर इयान बोथमही काही छोट्या संघांकडून फुटबॉल खेळले आहेत.
आयपीएलमध्ये तर फुटबॉलचं महत्त्व आणखी मोठं आहे. वेगवेगळ्या देशांचे, वेगवेगळ्या राज्यांतले खेळाडू आयपीएलच्या निमित्ताने एकाच टीमकडून खेळताना दिसतात. क्रिकेट हा सांघिक खेळ असला, तरी क्रिकेटमध्ये वैयक्तिक कामगिरीवर जास्त भर दिला जातो. अशा परिस्थितीत खेळाड़ूंमध्ये संघभावना निर्माण होणं गरजेचं असतं. त्यासाठी फुटबॉलची मदत घेतली जाते.
सरावादरम्यान खेळला जाणारा फुटबॉल क्रिकेटर्संना आपली कामगिरी उंचावण्यासाठीही मदत करत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement