LIVE BLOG | CWC19 : इंग्लंडकडून दक्षिण आफ्रिकेचा 104 धावांनी धुव्वा
LIVE
Background
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या सत्तापर्वाचा आरंभ आज होत आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी संध्याकाळी सात वाजता दुसऱ्यांदा विराजमान होतील. मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सात खासदारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदींसोबत 50 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मोदींच्या आधीच्या मंत्रिमंडळातील 21 जणांचा डच्चू मिळण्याची शक्यता आहे. त्यापैकी पाच ते सहा कॅबिनेट मंत्र्यांनाही नारळ दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात युवा आणि महिलांना स्थान दिलं जाणार असल्याची माहितीही विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
महाराष्ट्रातून कोण कोण?
शिवसेनेच्या गोटातून अरविंद सावंत यांना मंत्रिपद मिळणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांचाही पहिल्यांदाच कॅबिनेटमध्ये समावेश होणार आहे. मोदींच्या आधीच्या मंत्रिमंडळातील भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, रेल्वेमंत्री पियुष गोयल, केंद्रीय मानव संसाधन मंत्री प्रकाश जावडेकर आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं स्थान नव्या सरकारमध्येही कायम असेल.
दरम्यान, माजी मंत्री सुभाष भामरे आणि सुरेश प्रभू यांचा दुसऱ्या मंत्रिमंडळात समावेश होणार नसल्याची माहिती आहे. भामरे संरक्षण राज्यमंत्रिपदाची धुरा सांभाळत होते, तर प्रभू यांच्याकडे वाणिज्य मंत्रालयाची धुरा होती.
मोदी 2.0 मंत्रिमंडळात कोणाकोणाची वर्णी शक्य?
अरविंद सावंत
संजय धोत्रे
रावसाहेब दानवे
नितीन गडकरी
प्रकाश जावडेकर
पियुष गोयल
रामदास आठवले
रविशंकर प्रसाद
राजनाथ सिंह
स्मृती इराणी
सदानंद गौडा
राज्यवर्धन सिंह राठोड
बाबुल सुप्रियो
जितेंद्र सिंह
अर्जुन मेघवाल
प्रल्हाद पटेल (कर्नाटक)
किशन रेड्डी (तेलंगणा)
पुरुषोत्तम रुपाला (गुजरात)
रामचंद्र प्रसाद सिंह (जेडीयू)
मनसुख मांडवीय
कृष्णपाल गुर्जर
संजीव बलियान
साध्वी ज्योति निरंजन
थावरचंद गहलोत
इंद्रजीत राव
गिरीराज सिंह
कैलास चौधरी
नित्यानंद राय
के पी रवींद्रन (अण्णाद्रमुक)
राष्ट्रपती भवनात होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी सुरक्षेचा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी असलेल्या सुरक्षाव्यवस्थेप्रमाणे व्यवस्था या सोहळ्यासाठी करण्यात आली आहे. आर्मी, वायुसेना आणि दिल्ली पोलिसांच्या 10 हजाराहून अधिक जवानांची फौज या सोहळ्यासाठी तैनात करण्यात आली आहे.
नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार, 'रायसीना हिल' वर पाहुण्यांची मांदियाळी, सोहळ्यासाठी अभेद्य सुरक्षा व्यवस्था
मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब दिल्लीला रवाना झाले आहेत. याशिवाय काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. पश्चिम बंगालमधील हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांनाही शपथविधीचं निमंत्रण आहे.
शिवसेना खासदारांमध्ये अस्वस्थता
शिवसेनेतून खासदार अरविंद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर शिवसेनेच्या ग्रामीण भागातील खासदारांमध्ये नाराजी असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेनेकडून शहरी भागात मंत्रिपद गेल्याने ही नाराजी आहे. राज्यसभेवर असलेल्या खासदारांपेक्षा सामान्यांमधून आलेल्यांना मंत्रिपद द्यावं, असाही काही शिवसेना खासदारांचा सूर आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष कोण?
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना केंद्रात मंत्रिपद मिळाल्यास महाराष्ट्रात भाजपचं प्रदेशाध्यक्षपद कुणाला मिळणार यावर आता चर्चा होऊ लागली आहे. भाजपच्या पहिल्या फळीतील चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आणि पंकजा मुंडे यांची नावं पुढे आली आहेत.
नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी परदेशी पाहुणेही दिल्लीत दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. भूतानचे पंतप्रधान लोतेय तेशरिंग, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ आणि थायलंडचे विशेष दूत ग्रीसदाही सकाळी दिल्ली विमानतळावर दाखल झाले आहेत.