एक्स्प्लोर

LIVE BLOG : विंग कमांडर अभिनंदन यांचं देशवासियांकडून सोशल मीडियावरुन स्वागत

IAF Wing Commander Abhinandan Varthaman is returning India today LIVE BLOG : विंग कमांडर अभिनंदन यांचं देशवासियांकडून सोशल मीडियावरुन स्वागत

Background

नवी दिल्ली : भारताचा ढाण्या वाघ अखेर आज भारतात परत येणार आहे. भारतीय वायू दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका करण्याची घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काल (28 फेब्रुवारी) पाकच्या संसदेत केली. त्यानंतर आज अभिनंदन यांना वाघा बॉर्डरद्वारे भारतात आणलं जाणार असल्याचं कळतं.

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान सध्या इस्लामाबादमध्ये आहेत. आज दुपारी त्यांना लाहोरला आणलं जाईल. त्यांना आज वाघा बॉर्डरवरुन भारतात पाठवलं जाईल. यावेळी भारतीय अधिकारी ग्रुप कॅप्टन जेडी कुरियनही त्यांच्यासोबत असतील. परंतु अभिनंदन यांच्या परतीची वेळ सध्या निश्चित नाही.

बीटिंग रिट्रीट सोहळ्यादरम्यान अभिनंदनला भारताकडे सोपवलं जावं, अशी पाकिस्तानची इच्छा आहे. परंतु पाकिस्तानने अभिनंदनला दुपारपर्यंत सोपवावं, असा भारताचा आग्रह आहे. भारतात परतल्यानंतर वैमानिक अभिनंदन यांना अमृतसरच्या हवाईतळावर नेलं जाईल. यानंतर त्यांना अमृतसरहून दिल्लीला पाठवलं जाईल.

वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचा परतीचा प्रवास कसा असेल?

भारताच्या कूटनीतीचा विजय
भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या स्थितीत देशाच्या कूटनीतीचा मोठा विजय झाला आहे. भारताच्या दबावासमोर पाकिस्तान झुकला आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधान इम्रान खान यांना केवळ 24 तासांच्या आतच भारतीय वायूदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका करण्याची घोषणा करावी लागली. पाकिस्तानचं लढाऊ विमान F16 पाडल्यानंतर अभिनंदन यांचं MIG21 हे लढाऊ विमानही कोसळलं.

यानंतर अभिनंदन यांचं पॅराशूट पाकव्याप्त काश्मीरमध्ये उतरलं, जिथे पाकिस्तानी सैन्याने त्यांना ताब्यात घेतलं. मात्र आम्हाला आमचा वैमानिक कोणत्याही अटीशिवाय सुरक्षित पाठवा, अशी भूमिका भारताने घेतली. भारत आणि आंतरराष्ट्रीय दबावात काल (28 फेब्रुवारी) पाकिस्तानच्या संसदेत इम्रान खान यांनी अभिनंदन वर्धमान यांची सुटका करण्याची घोषणा केली. आज वाघा बॉर्डरवरुन अभिनंदन भारतात परतणार आहेत.

पाकिस्तानने अभिनंदन यांच्या सुटकेची घोषणा केल्यानंतर भारताच्या तिन्ही सैन्य दलाने एकत्रित पत्रकार परिषद घेतली. अभिनंदन भारतात परत येण्याबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला.

हा तर ‘पायलट’ प्रोजेक्ट, रिअल काम नंतर, अभिनंदन यांच्या सुटकेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सूचक वक्तव्य

शौर्याचं दुसरं नाव अभिनंदन
पाकिस्तानच्या ताब्यात असूनही अभिनंदन यांनी पाकला कोणतीही माहिती दिली नाही. एवढंच नाही तर पाकव्याप्त काश्मीरमध्ये उतरल्यानंतर भारतीय वायूसेनेशी संबंधित गोपनीय कागदपत्रे त्यांनी अक्षरशा: खाल्ली. विंग कमांडर अभिनंदन यांनी त्यांच्याकडील अनेक दस्तऐवज तलावात टाकले. पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात असूनही ते अतिशय निर्भीड होते. मी कोणतीही माहिती देणार नाही, असंही त्यांनी पाकिस्तानला ठणकावून सांगितलं. पॅराशूटद्वारे अभिनंदन खाली उतरले तेव्हा लोकांनी त्यांना घेरलं आणि गैरवर्तन केलं. परंतु अभिनंदन यांनी धीर सोडला नाही.

विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानात कसे पोहोचले
पाकिस्तान वायूदलाच्या विमानांनी परवा भारतात घुसखोरीचा प्रयत्न केला होता. भारतीय वायदलानेही याला सडेतोड उत्तर दिलं होतं. भारताने पाकिस्तानचं लढाऊ विमान F16 उद्ध्वस्त केलं. परंतु या कारवाईत विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचं MIG21 विमान कोसळलं. याच MIG 21 मधून पॅराशूटमधून उतरताना ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये उतरले, यानंतर पाकिस्तान सैन्याने त्यांना ताब्यात घेतलं होतं.

संबंधित बातम्या

गोष्ट नचिकेताची.. कारगिल युद्धात पाकिस्तानच्या तावडीतून भारतात परतलेला वैमानिक

पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय वैमानिकाच्या वडिलांचं देशवासियांना भावूक पत्र

पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय वैमानिकाची सुटका होणार, इम्रान खान यांची घोषणा

बालाकोटमधील एअर स्ट्राईकचे पुरावे आहेत, तिन्ही दलाची संयुक्त पत्रकार परिषद

23:38 PM (IST)  •  01 Mar 2019

23:39 PM (IST)  •  01 Mar 2019

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी

व्हिडीओ

Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
Kolhapur ZP Election: कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?
कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?
प्रचाराची सांगात होताच रिक्षात आढळली बॅग; अपक्ष उमेदवाराने पकडली 50 लाखांची रोकड
प्रचाराची सांगात होताच रिक्षात आढळली बॅग; अपक्ष उमेदवाराने पकडली 50 लाखांची रोकड
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | मंगळवार
ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
Embed widget