एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

आदित्य L-1 ते चंद्रयान, गगनयान, शुक्रयान... इस्त्रोच्या भविष्यातील अंतराळ मोहिमा कशा आहेत?

India At 2047: भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो (ISRO) ही भारताची सर्वात मोठी अंतराळ संस्था आहे. 1960 पासून इस्रोनं अनेक यशस्वी टप्पे पार केले आहेत.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो (ISRO) ही भारताची सर्वात मोठी अंतराळ संस्था आहे. 1960 पासून इस्रोनं अनेक यशस्वी टप्पे पार केले आहेत. मागील 62 वर्षांत इस्रोनं भारताचं नाव जगात पोहचवलं आहे.  होमी भाभा आणि विक्रम साराभाई यांनी इस्रोच्या जडणघडणीमध्ये मोलाचं योगदान दिलेय. अंतराळ संशोधनासाठी ऑटोमिट एनर्जी विभागाअंतर्गत 1962 मध्ये भारतीय अंतराळ संशोधन समितीची स्थापना (INCOSPAR) करण्यात आली. ऑगस्ट 1969 मध्ये INCOSPAR चे नाव बदलून भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणचेच इस्रोची ठेवण्यात आले. 19 एप्रिल 1975 मध्ये इस्रोनं पहिले स्वदेशी उपग्रह आर्यभट्ट लाँच केले. 
 
यशस्वीरित्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने आतापर्यंत संपूर्ण भारतभरात आपली 20 महत्त्वपूर्ण केंद्रे स्थापन केली आहेत. वेगवेगळ्या हेतूंसाठी भारतातील वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळी भारतीय संशोधन केंद्रे स्थापन केली गेली आहेत. या सर्वांचे मुख्य कार्यालय म्हणजे बेंगळुरूमध्ये स्थापित अंतराळ संशोधन, ज्याला इस्त्रो म्हणून देखील ओळखले जाते. इस्रोनं आतापर्यंत अनेक यशस्वी प्रयोग केले आहेत.  सॅटेलाइट, उपग्रह अवकाशात सोडण्यासह इस्रोनं अनेक यशस्वी उपक्रम राबवले आहेत. SITE, रोहिनी सिरिज, INSAT, GSAT सिरिज, EDUSAT, HAMSAT, भास्करा-1, रिसोर्ससॅट सिरिज,  कार्टोसॅट सिरिज, कल्पना-1, ओशनसॅट-1, पृथ्वी निरीक्षण उपग्रह मालिका, भारतीय प्रादेशिक नेव्हिगेशन उपग्रह प्रणाली, स्पेस रिकव्हरी एक्सपेरिमेंट सॅटेलाइट, SARAL, चंद्रयान-1, Mars Orbiter Mission (MOM), अॅस्ट्रोसॅट, आणि चंद्रयान-2 चे यशस्वी प्रेक्षपण इस्रोनं केले आहे. 

इस्रोच्या भविष्यातील मोहिमा -
इस्रो सध्या अनेक प्रोजेक्टवर काम करत आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या शतक महोत्सवापर्यंत इस्रो अनेक मोठमोठे कार्यक्रम राबवणार आहे. यामध्ये आदित्य एल 1, चंद्रयान 3, गगनयान, व्हीनस ऑर्बिटर मिशन आणि NISAR यासारख्या मोहिमाचा समावेश आहे. इस्रोच्या काही मोहिमाबाबत माहिती जाणून घेऊयात...

Aditya L1 Mission 
इस्रो यंदा आदित्य एल 1 अंतराळयान लाँच करण्याच्या तयारीत आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठवण्यात येणारे हे पहिलेच अंतराळयान होय. पृथ्वीला प्रकाश आणि उष्णता देणार्‍या या सूर्याबद्दल आतापर्यंत फारशी माहिती मिळालेली नाही. विशेषत: सूर्याच्या रचनेबाबत आतापर्यंत संशयाची स्थिती होती. अशा परिस्थितीत सूर्याशी संबंधित रहस्य उघडण्यासाठी आदित्य एल 1 मिशम महत्वाचं ठरणार आहे.  आदित्य एल 1 ची वजन तब्बल 400 किलो असेल. पृथ्वीच्या कशेबाहेर गेल्यानंतर टप्प्या टप्प्याने याचं वजन कमी होणार आहे. म्हणजेच, याचा एक एक भाग कमी होणार आहे. आदित्य एल 1 च्या एकूण सात पेलोड्स असणार आहेत.  सूर्याचे निरीक्षण करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. वर्षाअखेरपर्यंत आदित्य अवकाशात झेप घेण्याची शक्यता आहे. 

 Chandrayaan-3 
चांद्रयान 1 आणि दोननंतर इस्रो (ISRO) लवकरच चांद्रयान-3 लाँच करणार आहे. चांद्रयान-3 चे काम वेगाने सुरू आहे. भूतकाळातील उणिवांपासून धडा घेत भारताचे शास्त्रज्ञ चांद्रयान-3 मोहिमेत परिश्रमपूर्वक काम करत आहेत.  चांद्रयान-2 चा ऑर्बिटर चांद्रयान-3 मिशनमध्ये वापरला जाईल. ते खूप फायदेशीर ठरेल. चांद्रयान-3 अगदी चांद्रयान-2 सारखंच असणार आहे. परंतु, यावेळी फक्त लँडर-रोवर आणि प्रोपल्शन मॉडेल असेल. यामध्ये ऑर्बिटर पाठवण्यात येणार नाही. कारण चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरकडून यासाठी मदत घेण्यात येणार आहे. चांद्रयान-3 मोहिमेसाठी इस्रोला तामिळनाडूमध्ये लाँच पॅड बांधले जाणार आहे. 

Gaganyaan 1 आणि Gaganyaan 2 
भारत लवकरच गगनयान 1 आणि त्यानंतर गगनयान अंतराळात सोडणार आहे. या मोहिमेत भारत पहिल्यांदाच अंतराळवीरांना पाठवणार आहे.  भारताची ही पहिली मानव मोहीम अंतराळात जाईल. या मोहिमेत भारतातील तीन अंतराळवीरही असतील. 2023 मध्ये गगनयानच्या प्रत्यक्ष उड्डाण करण्यापूर्वी तीन चाचणी मोहिमा देखील केल्या जातील. या तीन चाचणी मोहिमा मानवरहित असतील, त्यावेळी भारताकडून एक ह्युमनॉइड रोबोट पाठवला जाईल. त्यामुळेच इस्रोने 'व्योमित्र' नावाचा महिला रोबोट तयार केला असून तो संशोधनानंतर अवकाशात पाठवला जाणार आहे. हा 'हाफ-ह्युमनॉइड' (मानवी) रोबोट अवकाशातून आपला रिपोर्ट इस्रोला पाठवणार आहे.

 NISAR (निसार )
नासा आणि इस्रो दोन्ही संस्था एकत्रपणे निसार मोहिमेवर काम करत आहे. निसार मोहिम पृथ्वी-निरीक्षण मोहीम आहे. प्रगत रडार इमेजिंगचा वापर करून जमिनीच्या पृष्ठभागाच्या बदलांची कारणे आणि परिणामांचे मोजमाप घेण्याचा या मोहिमेमागील प्रमुख उद्देश आहे. 2023 मध्ये ही मोहीम होण्याची शक्यता आहे. 

Gaganyaan 3 
गगनयान एक आणि गगन यान दोन नंतर भारत गगनयान तीन मोहिम राबवणार आहे. गगनयान तीनमध्ये अंतराळवीरांच्या चमूला पाठवण्यात येणार आहे. भारताची ही पहिली मानव मोहीम अंतराळात जाईल. यासाठी अंतराळवीर प्रशिक्षणार्थींच्यावैमानिकांच्या पूलसाठी निवड करण्यात येणार आहे. पाठवण्यात येणाऱ्या वैमानिकांची फिटनेस चाचणी आणि मानसशास्त्रीय तसेच वायुवैद्यकीय मूल्यमापन करण्यात येईल. जर गगनयान तीन यशस्वी झाले तर असा प्रयोग करणारा भारत चौथा देश ठरणार आहे. याआधी अमेरिका, चीन आणि Soviet Union यांनी यशस्वी प्रयोग केलाय. 

 Lunar Polar Exploration Mission (LUPEX) 
जपानमधील JAXA आणि इस्रो एकत्रपणे ल्युनिअर पोलार मिशनवर काम करणार आहेत. चंद्रावर असलेल्या जलस्रोतांचे प्रमाण आणि स्वरूप पाहणे, हा या अंतराळ मिशनचा प्रमुख उद्देश आहे. भविष्यातील अंतराळ संशोधन मिशनमध्ये या जलस्रोतांचा वापर करण्यासाठी LUPEX मिशनचं यश महत्वाचं आहे. 2025 मध्ये ही मोहिम राबवण्यात येणार आहे. 

 Mangalyaan-2 
मंगलयान 2 ही फक्त ऑर्बिटर मिशन आहे. अंदाजे 2025 मध्ये मंगलयान 2 अंतराळात जाण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे या मोहिमेला उशीरा झाला आहे. आता यावर काम सुरु करण्यात आले आहे. 

AstroSat-2 - 
सात वर्षांपूर्वी 2015 मध्ये अॅस्ट्रोसॅट उपग्रह पाठवण्यात आला होता. सात वरर्षानंतरही तो व्यवस्थित काम करत आहे. आता त्याची पुढील अपडेट अॅस्ट्रोसॅट - 2 पाठवण्यात येणार आहे. याच्या लाँचिंगची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. या मोहिमेवर सध्या काम सुरु आहे, लवकरच याची अधिकृत तारीख जाहीर करण्यात येईल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Guinea Football Match : फुटबॉल सामन्यात मॅच रेफरीचा वादग्रस्त निर्णय, दोन्ही संघांमध्ये हाणामारी, प्रेक्षकही मैदानात घुसले; 100 जणांचा मृत्यू
फुटबॉल सामन्यात मॅच रेफरीचा वादग्रस्त निर्णय, दोन्ही संघांमध्ये हाणामारी, प्रेक्षकही मैदानात घुसले; 100 जणांचा मृत्यू
Rohit Pawar: एकनाथ शिंदेंना धोक्याची जाणीव झाल्याने गृहमंत्रीपदाची मागणी, अजितदादांचे मंत्री अमित शाह ठरवणार: रोहित पवार
एकनाथ शिंदेंना धोक्याची जाणीव झाल्याने गृहमंत्रीपदाची मागणी, अजितदादांचे मंत्री अमित शाह ठरवणार: रोहित पवार
विधानसभा निवडणुकीत पक्ष विरोधी काम करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचा इशारा
विधानसभा निवडणुकीत पक्ष विरोधी काम करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचा इशारा
बाळासाहेब थोरातांना पोस्टल मते 70 टक्के, मग EVM मध्ये मागे कसे, ठाकरे गटाने प्रेझेंटेशन मांडलं
बाळासाहेब थोरातांना पोस्टल मते 70 टक्के, मग EVM मध्ये मागे कसे, ठाकरे गटाने प्रेझेंटेशन मांडलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 3 PM : 02 डिसेंबर 2024 : ABP MajhaMahayuti Sarkar Oath Ceremony News : महायुती सरकारचा शपथविधी सोहळा ५ डिसेंबरला, आसन व्यवस्था कशी असणार?Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2 PM : 2 डिसेंबर 2024 : ABP MajhaShrikant Shinde on DCM : उपमुख्यमंत्रिपदाची चर्चा निराधार , श्रीकांत शिंदेंचं स्पष्टीकरण

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Guinea Football Match : फुटबॉल सामन्यात मॅच रेफरीचा वादग्रस्त निर्णय, दोन्ही संघांमध्ये हाणामारी, प्रेक्षकही मैदानात घुसले; 100 जणांचा मृत्यू
फुटबॉल सामन्यात मॅच रेफरीचा वादग्रस्त निर्णय, दोन्ही संघांमध्ये हाणामारी, प्रेक्षकही मैदानात घुसले; 100 जणांचा मृत्यू
Rohit Pawar: एकनाथ शिंदेंना धोक्याची जाणीव झाल्याने गृहमंत्रीपदाची मागणी, अजितदादांचे मंत्री अमित शाह ठरवणार: रोहित पवार
एकनाथ शिंदेंना धोक्याची जाणीव झाल्याने गृहमंत्रीपदाची मागणी, अजितदादांचे मंत्री अमित शाह ठरवणार: रोहित पवार
विधानसभा निवडणुकीत पक्ष विरोधी काम करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचा इशारा
विधानसभा निवडणुकीत पक्ष विरोधी काम करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचा इशारा
बाळासाहेब थोरातांना पोस्टल मते 70 टक्के, मग EVM मध्ये मागे कसे, ठाकरे गटाने प्रेझेंटेशन मांडलं
बाळासाहेब थोरातांना पोस्टल मते 70 टक्के, मग EVM मध्ये मागे कसे, ठाकरे गटाने प्रेझेंटेशन मांडलं
Rishabh Pant And Shreyas Iyer Qualification : IPL इतिहासातील सर्वात महागडे ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर कितवीपर्यंत शिकले?
IPL इतिहासातील सर्वात महागडे ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर कितवीपर्यंत शिकले?
Chhagan Bhujbal : खरंच गृहमंत्रीपदावरून महायुतीची गाडी अडली? छगन भुजबळांनी सांगितलं कारण; म्हणाले, मोदी-शाह...
खरंच गृहमंत्रीपदावरून महायुतीची गाडी अडली? छगन भुजबळांनी सांगितलं कारण; म्हणाले, मोदी-शाह...
किमान कुराणची तरी लाज ठेवायची, राज्यात एमआयएमच्या पराभवानंतर असदुद्दीन ओवैसींनी सज्जाद नोमानींवर डागली तोफ
किमान कुराणची तरी लाज ठेवायची, राज्यात एमआयएमच्या पराभवानंतर असदुद्दीन ओवैसींनी सज्जाद नोमानींवर डागली तोफ
Suryakumar Yadav And Devisha Shetty Love Story : आयुष्यातील पहिलं प्रेम ते आयुष्याचे साथीदार; साऊथ इंडियन फॅमिलीमधील देविशा शेट्टी अन् सूर्यादादाच्या पहिल्या भेटीची भन्नाट कहाणी
आयुष्यातील पहिलं प्रेम ते आयुष्याचे साथीदार; साऊथ इंडियन फॅमिलीमधील देविशा शेट्टी अन् सूर्यादादाच्या पहिल्या भेटीची भन्नाट कहाणी
Embed widget