Fact Check : प्रशांत किशोर यांची भाजप प्रवक्ता म्हणून नियुक्ती झालीय का? व्हायरल पत्राचं सत्य समोर
Prashant Kishor: निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याबाबत एक पत्र व्हायरल होत आहे. त्या पत्राची सत्यता समोर आली आहे.
Claim :
भाजपनं प्रशांत किशोरनं प्रवक्ता म्हणून नियुक्त केलं.
Fact : नाही व्हायरल पत्र खोटं आहे.
सोशल मीडियावर भाजपच्या राष्ट्रीय महासचिवांकडून जारी करण्यात आलेल्या एका बनावट पत्राची जोरदार चर्चा आहे. प्रशांत किशोर यांचा उल्लेख असणारं पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी माजी रणनीतिकार आणि जनसुराज अभियानाचे संस्थापक प्रशांत किशोर यांना राष्ट्रीय मुख्य प्रवक्ता म्हणून नियुक्त केलं आहे. मात्र, सत्यता पडताळणी केली असता ते पत्र खोटं असल्याचं आढळून आलं. भाजपच्यावतीनं व्हायरल होत असलेलं खोटं असल्याचं म्हटलं.
प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला 370 जागा मिळणार नाहीत. मात्र, भाजप 270 पेक्षा कमी जागा मिळणार नाहीत असं म्हटलं. ज्यानंतर हे पत्र व्हायरल होत आहे.
व्हायरल पत्र भाजपचे राष्ट्रीय सचिव अरुण सिंह यांच्या नावानं कथितपणे जारी करण्यात आलं आहे. या पत्रावरील तारीख 22 मे 2024 सांगण्यात आलीय. याशिवाय पत्रात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष ज पी नड्डा यांनी श्री प्रशांत किशोर यांची भाजपच्या राष्ट्रीय मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
Newschecker ने व्हायरल फोटोच्या पडताळणीसाठी कीवर्डची मदत घेत गुगल सर्च केलं. यावेळी त्यांना अशा प्रकारची कोणतीही बातमी आढळली नाही. ज्यामध्ये व्हायरल दावा सत्य असल्याचं समोर येईल.
यानंतर भाजपच्यावतीनं जारी करण्यात आलेल्या ओरिजनल लेटरशी पडताळणी केली असता दोन्हींमध्ये फरक आढळला. तुम्ही या फोटोतून ते पाहू शकता.
या दरम्यान प्रशांत किशोर यांची संघटना जनसुराजच्या एक्स प्लॅटफॉर्मवर एक ट्वीट मिळालं. त्यामध्ये हे पत्र बनावट असल्याचं सांगण्यात आलं आहे. जनसुराजनं जयराम रमेश यांच्या व्हाटसअप चॅटचा फोटो शेअर केला आहे त्यात भाजपचं बनावट पत्र शेअर केलेलं दिसून येतं.
जनसुराजनं यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, तुम्ही सर्वजण फेक न्यूजबद्दल बोलता,तुमच्यावर अन्याय होत असल्याचा दावा करता पण काँग्रेस पक्षाचे माध्यमप्रमुख खोटं पत्र शेअर करत आहेत.
यानंतर भाजप प्रवक्ते जयवीर शेरगिल यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी व्हायरल पत्र खोटं असलंयाचं सांगितलं."जर काही असेल तर आम्हाला संघटनेकडून माहिती मिळाली असती, भाजपच्या सोशल मीडिया हँडलवर याबाबत माहिती शेअर करण्यात आली असती" असं जयवीर शेरगिल यांनी सांगितलं.
भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी हा दावा खोटा असल्याचं म्हटलं.
Conclusion :
सत्यता पडताळणीत मिळालेल्या माहितीनुसार व्हायरल होणारं पत्र खोटं असल्याचं समोर आलं आहे. भाजपनं असं कोणतही पत्र जारी केलेलं नाही.
Result : False
[डिस्क्लेमर: ही बातमी पहिल्यांदा Newschecker वर प्रकाशित झाली होती. एबीपी माझानं 'Shakti Collective' अंतर्गत हे वृत्त प्रकाशित केलं असून मूळ बातमीचा अर्थ बदलेलं असा कोणताही बदल केलेला नाही.]