Zohran Mamdani Wins Nyc Mayor Elections: भाजपनं पाकिस्तानी म्हणून हिणवलं, डोनाल्ड ट्रम्पने ताकद लावली, पण बॉलीवूड दिग्दर्शिकेच्या मुलाने सगळ्यांच्या नाकावर टिच्चून न्यूयॉर्कचं महापौरपद मिळवलं
Zohran Mamdani Wins Nyc Mayor Elections: डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या अध्यक्षीय कार्यकाळातील ही पहिली मोठी निवडणूक असल्यानं निवडणूक अत्यंत महत्त्वाची होती. त्यामुळेच, जोहरान ममदानी यांचा विजय डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी मोठा धक्का होता.

Zohran Mamdani Wins Nyc Mayor Elections: अमेरिकेतली (America) प्रसिद्ध असा न्यू यॉर्क (New York City) शहरात एक ऐतिहासिक राजकीय बदल पाहायला मिळाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, हा राजकीय बदल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यासाठी सर्वात मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय. खरं तर, न्यू यॉर्क शहरातील मेयरच्या निवडणुकीत एका भारतीय वंशाच्या व्यक्तीचा विजय झालाय. भारतीय वंशाचे जोहरान ममदानी हे डेमोक्रॅटिक उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले. त्यातल्या त्यात महत्त्वाची बाब म्हणजे, जोहरान ममदानी न्यू यॉर्कचे पहिले मुस्लिम मेयर झाले आहेत. आता याच्याशी ट्रम्प यांचा संबंध काय? त्याच्यासाठी हा धक्का कसा? तर, डोनाल्ड ट्रम्प जोहरान ममदानी यांना मोठा विरोध होता. तसेच, ते सतत ममदानी यांच्यावर आगपाखड करताना दिसलेले.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या अध्यक्षीय कार्यकाळातील ही पहिली मोठी निवडणूक असल्यानं निवडणूक अत्यंत महत्त्वाची होती. त्यामुळेच, जोहरान ममदानी यांचा विजय डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी मोठा धक्का होता. एवढंच नाहीतर, जर निवडणुकीत ममदानी जिंकले तर न्यू यॉर्कला निधी देणं बंद करण्याची धमकीही ट्रम्प यांनी दिली होती. पण, तरीसुद्धा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या धमक्यांना न जुमानता न्यू यॉर्कमधल्या जनतेनं जोहरान ममदानी यांना भरघोस मतांनी निवडून दिलं.
भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी अमेरिकेतली न्यू यॉर्कमधून मेयरची निवडणूक लढवली. त्याच्यासोबत निवडणुकीत इतर दोन प्रतिस्पर्धी होते. आपल्या दोन्ही प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत जोहरान ममदानी यांनी भरघोस मतांनी मोठा विजय मिळवला. निवडणुकीच्या रिंगणात मदनानी यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणून न्यू यॉर्कचे माजी गव्हर्नर अँड्र्यू कुओमो उभे होते, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तर रिपब्लिकन उमेदवार कर्टिस स्लिवा यांचाही मोठा पराभव झाला. 4 नोव्हेंबरला ही निवडणूक पार पडली. त्यापूर्वी यासाठी 25 ऑक्टोबर रोजी मतदान झालेलं.
भारतीय वंशाचे जोहरान ममदानी नेमके कोण?
अमेरिकेतली जगप्रसिद्ध शहर न्यू यॉर्कचे नवनिर्नाचित मेयर जोहरान ममदानी 34 वर्षांचे आहेत. खरं तर त्यांचा जन्म युगांडामध्ये झालेले. त्यानंतर ते न्यू यॉर्क शहरात आपल्या पालकांसोबत आले आणि इथेच स्थायिक झाले. जोहरान ममदानी न्यू यॉर्क राज्य विधानसभेचे सदस्य आहेत आणि डेमोक्रॅटिक सोशलिस्ट म्हणून त्यांना ओळखलं जातं. आता जोहरान ममदानी यांची आणखी एक ओळख सांगायची तर, 'सलाम बॉम्बे' सिनेमाच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शिका मीरा नायर यांचे ते पुत्र आहेत. युगांडातील भारतीय वंशाचे लेखक महमूद ममदानी हे जोहरान यांचे वडील आहेत.
राजकारणात येण्यापूर्वी ममदानी हे हिप-हॉप रॅपर होते. त्यांचे सर्वात प्रसिद्ध गाणे 'कांडा' युगांडामध्ये व्हायरल झालेलं. महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर, ममदानी क्वीन्समध्ये गेले. तिथे त्यांनी इमिग्रंट, रेंटर्स आणि ब्लॅक लाईव्ह्स मॅटर चळवळीसारख्या चळवळींमध्ये भाग घेतला. या काळात, ममदानी यांनी 2017 मध्ये डेमोक्रॅटिक पक्षासोबत त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. 2020 मध्ये, ते न्यू यॉर्क राज्य विधानसभेत निवडून आले. त्यानंतर 2022 आणि 2024 मध्ये बिनविरोध विजयी झाले.
His mother is Mira Nair, one of our best filmmakers, Padmashri , a beloved and celebrated daughter born and raised in great Bharat based in Newyork, she married Mehmood Mamdani ( Gujarati origin) a celebrated author, and obviously son is named Zohran, he sounds more Pakistani… https://t.co/U8nw7kiIyj
— Kangana Ranaut (@KanganaTeam) June 26, 2025
भाजपनं केलेला पाकिस्तानी असा उल्लेख...
जोहरान ममदानी यांच्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठ्या प्रमाणावर टीका केलेली. त्यामुळे न्यू यॉर्कमधली मेयरची निवडणूक अत्यंत चुरशीची आणि प्रतिष्ठेची बनलेली. अशातच जोहरान आपल्या भाषणांध्ये टीका करताना अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधत असल्यानं भाजपच्याही ते निशाण्यावर आलेले. अनेक भाजप समर्थक, नेते आणि मंत्री जोहरान ममदानी यांचा उल्लेख भारतीय असा न करता पाकिस्तानी असा करायचे. बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप नेत्या कंगना रणौतनं ट्वीट करत जोहरान यांच्यावर टीका केलेली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :


















