Yogita Chavan On Rumors Of Separation From Saurabh Choughule: लग्नाच्या वर्षभरातच सौरभ चौघुलेसोबतच्या नात्यात तणाव? योगिता चव्हाण म्हणाली...
Yogita Chavan On Rumors Of Separation From Saurabh Choughule: कलर्स मराठीवरची गाजलेली मालिका, 'तुझ्यात जीव गुंतला' फेम ऑन स्क्रिन जोडपं अंतरा आणि मल्हार म्हणजेच, रियल लाईफमधले योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांची केमिस्ट्री जुळली आणि दोघांनी थेट एकमेकांसोबत साताजन्माची गाठ बांधली.

Yogita Chavan On Rumors Of Separation From Saurabh Choughule: गेल्या काही दिवसांपासून हिंदी आणि मराठी दोन्ही इंडस्ट्रीमधील सेलिब्रिटी जोडप्यांचे घटस्फोट चर्चेत आहेत. सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या घटस्फोटानंतर आता मराठी कलाविश्वातील आणखी एका सेलिब्रिटी जोडप्याच्या घटस्फोटाबाबत चर्चा रंगल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या जोडप्यानच्या संसारात लग्नाच्या वर्षभरातच वादळ आल्याचं बोललं जात आहे. तसेच, आता प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचल्याच्याही चर्चा सुरू आहेत.
कलर्स मराठीवरची गाजलेली मालिका, 'तुझ्यात जीव गुंतला' फेम ऑन स्क्रिन जोडपं अंतरा आणि मल्हार म्हणजेच, रियल लाईफमधले योगिता चव्हाण (Yogita Chavan) आणि सौरभ चौघुले (Saurabh Choughule) यांची केमिस्ट्री जुळली आणि दोघांनी थेट एकमेकांसोबत साताजन्माची गाठ बांधली. दोघांनी धुमधडाक्यात लग्न केलेलं. दोघांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झालेले. पण, आता लग्नाच्या वर्षभरातच दोघांच्या सुखी संसारात मिठाचा खडा पडल्याचं बोललं जात आहे. दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केलं आहे. तसेच, सोशल मीडियावरुन लग्नाचे फोटोही डिलिट केले आहेत. याशिवाय नुकत्याच झालेल्या दिवाळीलाही जोडपं एकत्र दिसलेलं नाही. त्यामुळे सोशल मीडियावर घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलंय. अखेर आता योगिता चव्हाणनं घटस्फोटाच्या चर्चांवर आपलं मौन सोडलंय.

घटस्फोटाच्या चर्चांवर काय म्हणाली योगिता?
योगिता चव्हाणनं न्यूज 18 लोकमतला आपली प्रतिक्रिया दिली. न्यूज 18 लोकमतनं दिलेल्या वृत्तानुसार, ज्यावेळी योगिता चव्हाणसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी तिला तिच्या आणि सौरभ चौघुलेसोबतच्या घटस्फोटाबाबत विचारण्यात आलं. त्यावर बोलताना अभिनेत्री म्हणाली की, तिला तिच्या वैयक्तिक आयुष्यावर काहीही बोलायचं नाही आहे. तसेच, सौभर चव्हाणसोबतही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क होऊ शकला नाही. अशातच योगिता चव्हाणच्या प्रतिक्रियेमुळे घटस्फोटाच्या चर्चांना आणखी उधाण आलं आहे. योगिता चव्हाणनं अशी प्रतिक्रिया दिल्यामुळे सोशल मीडियावर घटस्फोट झाल्याच्या चर्चा सकारात्मक असल्याच्या बोललं जात आहे.
सेटवरच जुळलं... योगिता-सौरभची हटके स्टोरी (Yogita Chavan Saurabh Choughule Love Story)
2024 मध्ये योगिता चव्हाण आणि सौरभनं लग्न केलं. दोघांनी लग्नाचे फोटो शेअर करुन चाहत्यांना सुखद धक्का दिलेला. दोघांनीही कलर्स मराठीवरच्या 'जीव माझा गुंतला' मालिकेत एकत्र काम केलेलं. मालिकेत योगिता आणि सौरभ मुख्य भूमिकेत झळकलेले. 'जीव माझा गुंतला' मालिकेत योगिता चव्हाणणं अंतरा, तर सौरभनं मल्हारचं पात्र साकारलं होतं. याच मालिकेच्या सेटवर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. लग्नाचे फोटो शेअर करत त्यांनी '3 मार्च 2024… आयुष्यभराचा हमसफर' असं कॅप्शन दिलेलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























