एक्स्प्लोर

Anil Arora Death : मलायका 11 वर्षांची असताना आईवडिलांचा घटस्फोट, कोण होते अनिल अरोरा?

Anil Arora Death :  मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांच्या निधनाची बातमी समोर येताच साऱ्यांना धक्का बसला. पण अनिल अरोरा नेमके कोण होते याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

Anil Arora Death :  बॉलिवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेत्री मलायका अरोराचे (Malaika Arora) वडील अनिल अरोरा (Anil Arora Death) यांचे निधन झाले आहे. मुंबईतील वांद्रे येथील इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून त्यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. दरम्यान मलायकाच्या वडीलांना एवढं मोठं पाऊल का उचचलं याचा तपास सध्या सुरु आहे. मलायकाचे वडील मर्चंट नेव्हीमध्ये होते. त्यांनी  मल्याळी ख्रिश्चन जॉयस पॉलीकार्पशी लग्न केले. त्यांना त्यांना मलायका आणि अमृता ही दोन मुली आहे. पण मलायका 11 वर्षांची असतानाच त्यांनी पत्नीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 

मलायकाच्या वडीलांनी बुधवार 11 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता आत्महत्या केल्याची बातमी समोर आली. त्यांनी सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच मलायकाचा एक्स नवरा अरबाज खान तिच्या घरी पोहचला. जेव्हा ही घटना घडली तेव्हा मलायका पुण्यात होती. पण अनिल अरोरा यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये. 10 सप्टेंबर रोजी मलायका आणि अमृता दोघीही आपल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी घरी पोहोचल्या होत्या आणि आज ही घटना घडली. त्यामुळे साऱ्यांनाच धक्का बसला आहे. 

मर्चंट नेव्हीमध्ये होते मलायकाचे वडील

 मलायका अरोराची आई जॉयस पॉलीकार्प मल्याळी ख्रिश्चन होती आणि तिचे वडील अनिल अरोरा फाजिल्का शहरातील पंजाबी हिंदू होते ज्यांनी भारतीय मर्चंट नेव्हीमध्ये काम केलं होतं. त्यांची मुलगी मलायका अरोरा ही बॉलीवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. 

मलायकाच्या आई-वडिलांचा झाला होता  घटस्फोट

मलायकाने एकदा खुलासा केला होता की तिचे आई-वडील वेगळे झाले तेव्हा ती फक्त 11 वर्षांची होती. मात्र, काही वर्षांपूर्वी वयाचा हा टप्पा गाठल्यानंतर दोघेही एकत्र राहू लागले. त्यावेळी तिने म्हटलं होतं की, 'माझं बालपण खूप छान होतं, पण ते सोपं नव्हतं. मागे वळून पाहताना, मला ते गोंधळात टाकणारं सगळं आठवतं. परंतु कठीण प्रसंग देखील तुम्हाला महत्त्वाचे धडे शिकवतात.

अनिल अरोरा यांना दोन मुली 

अनिल अरोरा यांना मलायका आणि अमृता ह्या दोन मुली आहेत. मलायकाने अरबाज खान याच्याशी लग्नगाठ बांधली होती. पण 19 वर्षांनी त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ती बराच काळ अर्जुन कपूरला डेट करत होती. पण त्यानंतर त्यांच्याही ब्रेकअपच्या बातम्या समोर येऊ लागल्या. तसेच अमृताने शकील लडाकसोबत 2009 मध्ये लग्नगाठ बांधली. या दोघांनाही दोन मुलं आहेत. 

ही बातमी वाचा : 

Malaika Arora Father Anil Arora passed Away : वडिलांच्या निधनाने खचली मलायका, सात्वंन करण्यास पोहचले सलीम खान, अर्जुन कपूर; पाहा फोटो...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा भाजपला हात, परभणी महापालिकेत काय घडणार? ठाकरेंची शिवसेना-काँग्रेसबद्दल मोठी अपडेट समोर
चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा भाजपला हात, परभणी महापालिकेत काय घडणार? काँग्रेस- ठाकरेंच्या सेनेबद्दल अपडेट समोर
Sharad Pawar and PM Modi: मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना फोन, नेमकं काय बोलणं झालं?
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना फोन, नेमकं काय बोलणं झालं?
चंद्रपूरमध्ये भाजप- ठाकरेंची शिवसेना एकत्र, भाजपचा महापौर, विदर्भातील युतीचे हादरे महाराष्ट्राच्या राजकारणात बसणार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची पहिली प्रतिक्रिया
चंद्रपूरमध्ये भाजप- ठाकरेंची शिवसेना एकत्र, महाराष्ट्राच्या राजकारणात हादरे बसणार, काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray and Mohan Bhagwat: 'मराठी माणसाला डिवचत गुजराती भाषिकांना चोंबाळण्याचा प्रयत्न', मोहन भागवतांच्या 'त्या' वक्तव्यावर राज ठाकरे का संतापले?
'मराठी माणसाला डिवचत गुजराती भाषिकांना चोंबाळण्याचा प्रयत्न', मोहन भागवतांच्या 'त्या' वक्तव्यावर राज ठाकरे का संतापले?

व्हिडीओ

Chandrapur Mayor Election 2026 : चंद्रपूरमध्ये भाजप-ठाकरेसेनेची सत्ता स्थापन, महापौरपदी भाजपच्या संगीता खांडेकर विराजमान
Sunetra Pawar Delhi Daura:मुख्यमंत्र्यांपाठोपाठ सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा, अमित शहांची भेट घेणार
ZP Election Result Celebration : झेडपी निकालानंतर उमेदवारांचं जोरदार सेलिब्रेशन Special Report
Politics On Savarkar : स्वा. सावकरांना भारतरत्न देण्याच्या चर्चेला जोर Special Report
ZP Election Result : जिल्हा परिषद निवडणुकीत मराठवाड्यात कुणाचा गुलाल, कोण बेहाल? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा भाजपला हात, परभणी महापालिकेत काय घडणार? ठाकरेंची शिवसेना-काँग्रेसबद्दल मोठी अपडेट समोर
चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा भाजपला हात, परभणी महापालिकेत काय घडणार? काँग्रेस- ठाकरेंच्या सेनेबद्दल अपडेट समोर
Sharad Pawar and PM Modi: मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना फोन, नेमकं काय बोलणं झालं?
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना फोन, नेमकं काय बोलणं झालं?
चंद्रपूरमध्ये भाजप- ठाकरेंची शिवसेना एकत्र, भाजपचा महापौर, विदर्भातील युतीचे हादरे महाराष्ट्राच्या राजकारणात बसणार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची पहिली प्रतिक्रिया
चंद्रपूरमध्ये भाजप- ठाकरेंची शिवसेना एकत्र, महाराष्ट्राच्या राजकारणात हादरे बसणार, काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray and Mohan Bhagwat: 'मराठी माणसाला डिवचत गुजराती भाषिकांना चोंबाळण्याचा प्रयत्न', मोहन भागवतांच्या 'त्या' वक्तव्यावर राज ठाकरे का संतापले?
'मराठी माणसाला डिवचत गुजराती भाषिकांना चोंबाळण्याचा प्रयत्न', मोहन भागवतांच्या 'त्या' वक्तव्यावर राज ठाकरे का संतापले?
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरातील तेजीला ब्रेक, चांदीचे दर 11000 रुपयांनी घसरले, सोनं किती रुपयांनी स्वस्त?
सोने आणि चांदीच्या दरातील तेजीला ब्रेक, चांदीचे दर 11000 रुपयांनी घसरले, सोनं किती रुपयांनी स्वस्त?
Maharashtra 12 Zilla Parishad Result 2026: 12 जिल्हा परिषद, 12 निकाल; भाजप नंबर 1, अजितदादांची राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानावर, कुठे-कुणाची सत्ता?, संपूर्ण निकाल
12 जिल्हा परिषद, 12 निकाल; भाजप नंबर 1, अजितदादांची राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानावर, कुठे-कुणाची सत्ता?, संपूर्ण निकाल
Satara ZP Election Result : साताऱ्यात सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, राष्ट्रवादी- शिवसेनेच्या निर्णयाकडे लक्ष, भाजप विरोधी बाकांवर?
साताऱ्यात सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, राष्ट्रवादी- शिवसेनेच्या निर्णयाकडे लक्ष, सेना किंगमेकर  
BCCI Central Contract : टीममध्ये स्थान मिळूनही ईशान किशन BCCI च्या केंद्रीय कराराच्या यादीतून बाहेर, रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं काय झालं? 
टीममध्ये स्थान मिळूनही ईशान किशन BCCI च्या केंद्रीय कराराच्या यादीतून बाहेर, रोहित आणि विराटचं काय?
Embed widget