Web Exclusive | सुशांतचा मृत्यू आणि ब्लाइंड आयटम लेखाचं कनेक्शन काय?
सुशांतने आपल्या जवळच्यांना आणि डॉक्टरांना देखील सांगितल होतं की, अशी ब्लाइंड अर्टिकल मला त्रासदायक ठरतायत. यावरून आता प्रश्न उभा राहतोय की हे आर्टिकल सुशांतच्या डिप्रेशनचे कारण ठरले होते का? यामुळेचं सुशांतने आत्महत्या केली का ? आता याचं बाबींची पोलिस चौकशी करत आहेत.
मुंबई : सोशल मीडियावर सुशांत सिंह राजपूत यांच्या विरोधात छापलेली ब्लाइंड आयटम सुशांतच्या नैराश्याचे कारण होते का? याचा तपास मुंबई पोलिस करत आहे. पोलिसांना आतापर्यंत चौकशीमध्ये समजले आहे की, सुशांत स्वता:च्या विरोधात नकारात्मक प्रसिद्धीमुळे नैराश्यात गेला होता. या इंडस्ट्री मधील काही मोठी नावे सुशांतची प्रतिमा खराब करण्याचे षडयंत्र रचत असल्याचा तपास मुंबई पोलिस करत आहेत. सुशांतच्या विरोधात ब्लाइंड आयटम लिहणारे हे कोण होते आणि कोणाच्या सांगण्यावरून लिहीत होते? यासाठीच आज मुंबई पोलिसांनी पत्रकार राजीव मसंद यांची चौकशी केली. 'एबीपी माझा'कडे सुशांत विरुद्धची सर्व ब्लाइंड आयटमचे लेख आहेत ज्यामुळे सुशांत खूप निराश होता. 1) sushant Sing bad boy of Bollywood
2) ब्लाइंड आयटम (पिंकविलाचं अर्टिकल) - सुशांतला चुकीचं वर्तनामुळे आपलं घर सोडाव लागलं
3) ब्लाइंड आयटम - सुशांत चित्रपटासाठी आपल्या गुरु सोबत संबंध बनवतो आणि चित्रपट मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो
4) ब्लाइंड आयटम - सुशांत आजारी असल्याची चर्चा, सुशांतने आपण दवाखान्यात गेल्याची माहिती लपवली
5) सुशांत आपल्या सहकलाकारांसोबत करतो चुकीचं वर्तन, सहकलाकाराने दिली माहिती
6) सुशांतवर MeToo चा आरोप झाल्यामुळे त्याच्या चाहत्यांची संख्या घटली, चित्रपट निर्मात्यांकडून सुशांतला घेण्यास कचराई
7) सुशांत दारू पिऊन सेटवर आणि मुलाखतीसाठी पोहचला
8) ब्लाइंड आयटम - मागच्या फ्लॉप फिल्म नंतर आता सुशांत ' पानी' चित्रपटाकडून आशावादी
अशाच प्रकारचे कित्येक ब्लाइंड आर्टिकल सुशांत विरोधात छापण्यात आले. यावरून स्पष्टपणे लक्षात येतंय की, बॉलीवुड मध्ये काही लोकं होते जे सुशांतला वेळोवेळी बदनाम करण्याचा प्रयत्न करत होते. आणि त्यात ते कित्येक पटीने यशस्वी देखील झाले होते. सुशांतने आपल्या जवळच्यांना आणि डॉक्टरांना देखील सांगितल होतं की, अशी ब्लाइंड अर्टिकल मला त्रासदायक ठरतायत. यावरून आता प्रश्न उभा राहतोय की हे आर्टिकल सुशांतच्या डिप्रेशनचे कारण ठरले होते का? यामुळेचं सुशांतने आत्महत्या केली का ? आता याचं बाबींची पोलिस चौकशी करत आहेत.
सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या चौकशीवेळी तीने माहिती दिली की, सुशांतच्या विरोधात आशा प्रकारचे ब्लाइंड आयटम काही महिन्यांपासून अनेकवेळा छापण्यात आले होते. त्यामुळे सुशांत प्रचंड निराश होता.
हे आर्टिकल छापल होतं पिंक विला वेबसाईडने ज्यामध्ये लिहिलं होतं ‘सुशांतने सनकी स्वभाव आणि घमंड यामुळे अनेक चित्रपट घालवले. मागील वर्षी हिट फिल्म देऊन देखील यंदा त्याला चित्रपट मिळालेला नाही. याचं कारण त्याचं चुकीचं वागणं आणि आपल्या स्ट्रगल करत असणाऱ्या मैत्रिणीला चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून घेण्याचा हट्ट. आता त्याच्यासमोर एक नवीनचं संकट आलं आहे. त्याला आपलं घर खाली करण्याची नोटिस देण्यात आली आहे. घरात रात्री बेरात्री होणाऱ्या पार्ट्यांची आणि गोंधळाच्या सतत येणारी तक्रार यामुळे घरमालकाने सुशांतला घर खाली करण्यास सांगितलं. यावरून प्रचंड वाद देखील झाला. परंतु अखेर सुशांतला आपलं घर खाली करावं लागलं. आता सुशांत आपल्या मैत्रिणीच्या घरी किंवा मुंबईच्या बाहेर एका बंगल्यामध्ये राहत आहेत’
या आर्टिकलवरुन सुशांत प्रचंड नाराज झाला. पोलिसांच्या चौकशीमध्ये समोर आलं की, अशा सुशांतच्या अनेक खाजगी बाबींविषयी ब्लाइंड आर्टिकल छापण्यात आले यामुळे सुशांत प्रचंड नाराज होता.
सुशांतने स्वत: डॉक्टरांना आणि त्याच्या जवळच्या काही लोकांना या लेखाबद्दल सांगितलं. तो नाराज होता पण त्यामागे कोण असू शकते हे कधीही त्याने कोणलाच कधी सांगितलं नाही. हे सर्व सुशांत सुशांतच्या प्रतिमेचे नुकसान करण्यासाठी केले जात आहे का? याचा शोध पोलिस घेत आहेत.
पोलिस तपासात एक बाब समोर आली की, सुशांत प्रचंड त्रस्त होता. यामध्ये आणखी वाढ तेव्हा झाली जेव्हा त्याचं नावं त्याची पूर्व मॅनेजर दिशा सालयनच्या मृत्यूनंतर त्याचं तिच्या मृत्यूशी कनेक्शन जोडण्यात आलं. यावेळी सुशांत आजारी असल्याच्या अनेक बातम्या येऊ लागल्या. त्यावेळी सुशांतच्या मॅनेजरला माध्यमांमध्ये सांगावं लागलं की, केवळ सुशांतला थोडा ताप आहे . परंतु ब्लाइंड आर्टिकलमध्ये मात्र सुशांतचं मानसिक संतुलन बिघडलं असल्याचं छापण्यात आलं. त्यामुळे सुशांत प्रचंड दु:खी झाला. सुशांतला भीती होती की, त्याचं नावं दिशाच्या मृत्यूशी जोडल जाईल.
आता प्रश्न पडतो की बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये हे ब्लाइंड आयटम कोण लिहितो आणि का? हे कोण व्हायरल करत आणि कोणाच्या इशार्याने केलं जात. पोलिस चौकशीत असे दिसून आले आहे की, फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक सिंडिकेट चालते ज्यामध्ये बड्या सेलिब्रिटी पीआर एजन्सीमार्फत सोशल मिडीयावर हे लेख पोस्ट करतात. जर कोणाबद्दल काही निगेटिव्ह बातमी छापायची किंवा व्हायरल करायची असेल तर पीआर-पत्रकाराचे हे नेटवर्क वापरले जाते.
याच चौकशी मध्ये पोलिसांनी इंडस्ट्री मधील दोन मोठे पीआर, एक मोठा पत्रकार आणि हे लेख प्रकाशित केलेल्या वेबसाइट्स च्या पत्रकारांची चौकशी केली गेली आहे. यातील एक नाव आहे राजीव मसंद, ज्यांच्याकडून पोलिसांनी एकदा चौकशी केली आहे आणि पुढेही त्यांची चौकशी केली जाणार. पोलिस चौकशीत राजीव मसंद यांनी सांगितले की ‘ते लेख मी नाही लिहीले आणि त्याबद्दल पोलिसांना दिलेली सर्व माहिती निराधार आहे’.
सुशांतला या बातमीने इतके दु: ख झाले होते की त्याने घरात राहणे देखील बंद केले आहे. सुशांत अनेकदा या वृत्तांतून पळून जात असे. म्हणूनच त्यांनी मुंबईजवळ पवना धरण जवळ व्हिला भाड्यानेही घेतला. सुशांतला या उद्योगातून एक प्रकारे पळून जाण्याची इच्छा होती. काही दिवस तिथेच राहिल्यानंतर सुशांत मुंबईला परतला आणि वांद्रेला घर घेऊन राहू लागला. पण तिथेही सुशांतच्या या नकारात्मक प्रसिद्धीने पाठलाग सोडला नाही.
आता प्रश्न असा निर्माण होतो की सुशांतचे जीवन नरक बनवण्याच्या इच्छेतील हे लोक कोण आहेत? कोणाच्या सांगण्यावरून हे सर्व केले जात होत. पोलिस या प्रश्नांची उत्तरे शोधत आहेत.
संबंधित बातम्या :
सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, आदित्य चोप्राने पोलीस चौकशीत सर्व आरोप फेटाळले
सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण; रिया चक्रवर्तीची अमित शाहांकडे सीबीआय चौकशीची मागणी
रिया चक्रवर्तीला बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी; इन्स्टाग्रामवर सांगितली आपबीती
Sushant SIngh Rajpur Suicide Case | सुशांतचे यशराज प्रॉडक्शनसोबत कोणतेही मतभेद नव्हते -आदित्य चोप्रा