Govinda Naam Mera : प्रतीक्षा संपली! विकी कौशलचा 'गोविंदा नाम मेरा' या दिवशी होणार रिलीज
Govinda Naam Mera : विकी कौशलचा बहुप्रतिक्षित 'गोविंदा नाम मेरा' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
![Govinda Naam Mera : प्रतीक्षा संपली! विकी कौशलचा 'गोविंदा नाम मेरा' या दिवशी होणार रिलीज Vicky kaushal film govinda naam mera release date out will be streamed on disney plus hotstar 16th december marathi news Govinda Naam Mera : प्रतीक्षा संपली! विकी कौशलचा 'गोविंदा नाम मेरा' या दिवशी होणार रिलीज](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/18/f02f55fd0885778a3c4c4d00794699d61668771433722358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Govinda Naam Mera Release Date Out : अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) बॉलिवूडमधील दमदार अभिनेत्यांपैकी एक आहे. आतापर्यंतच्या कारकिर्दीत विकी कौशलने अनेक भूमिका साकारल्या असून प्रत्येक भूमिकेत त्याने आपलं स्थान आणि अभिनय कौशल्य दाखवून दिलं आहे. विकी कौशलचा बहुप्रतिक्षित 'गोविंदा नाम मेरा' (Govinda Naam Mera) हा सिनेमाही रिलीजसाठी सज्ज झाला आहे. अशातच विकीने त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. विकीने त्याच्या इन्स्टाग्रामवर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.
विकीने शेअर केली 'गोविंदा नाम मेरा'ची रिलीज डेट
विकीने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर गोविंदा नाम मेरा सिनेमाचा पोस्टर शेअर केला आहे. आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “गोविंदा नाम मेरा, नाचना काम मेरा. लवकरच माझी कथी घेऊन येत आहे #GovindaNaamMera स्ट्रीमिंग 16 डिसेंबरला फक्त Disney+ Hotstar वर घेऊन येत आहे!” अशी पोस्ट शेअर केली आहे. या चित्रपटात कियारा अडवाणी आणि भूमी पेडणेकर देखील दिसणार आहेत. धर्मा प्रोडक्शनची निर्मिती असलेला हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
View this post on Instagram
करण जोहरनेही ट्विट केले आहे
करण जोहरनेही आपल्या इन्स्टावरुन सिनेमाच्या रिलीजची तारीख जाहीर केली आहे. त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिले, "तुमच्या मनाला चटका लावणारा प्लॉट ट्विस्ट! तयार व्हा. कारण काही मसाला मनोरंजन थेट तुमच्या होम स्क्रीनवर येत आहे! 'गोविंदा नाम मेरा' डिस्ने+ हॉटस्टारवर 16 डिसेंबरला येत आहे." अशा शब्दांत करण जोहरने ट्विट केले आहे.
View this post on Instagram
डान्सरच्या भूमिकेत दिसणार विकी कौशल
'गोविंदा नाम मेरा' चित्रपटात विकी कौशलची डान्सरची भूमिका आहे. या चित्रपटात पत्नीशिवाय एक मैत्रीणही असणार आहे. चित्रपटात गोविंदा बनलेला विकी घर मिळवण्यासाठी धडपडताना दिसणार आहे. हा सिनेमा बॉलिवूड अभिनेता गोविंदाचा बायोपिक असल्याचा अनेक लोकांचा समज होता. पण करण जोहरने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये त्याने स्पष्ट केले आहे की, ही गोविंदाच्या बायोपिकची नसून एका डान्सरच्या संघर्षाची कथा आहे.
View this post on Instagram
'गोविंदा नाम मेरा' चित्रपटात भूमिक पेडणेकर आणि कियारा अडवाणी पहिल्यांदाच विकी कौशलबरोबर स्क्रिन शेअर करत आहेत. तिघांची केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. अशा परिस्थितीत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाल्यामुळे चाहते खूप खूश आहेत.
महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)