वरूण धवनच्या ड्रायव्हरचे निधन; शूटिंग दरम्यान आला हृदयविकाराचा झटका
वरूणचे ड्रायव्हर (Varun Dhawan) मनोज साहू (manoj sahu) यांचे निधन झाले आहे.
![वरूण धवनच्या ड्रायव्हरचे निधन; शूटिंग दरम्यान आला हृदयविकाराचा झटका Varun Dhawan Driver manoj sahu Suffers Heart Attack During Shoot Dies In Hospital वरूण धवनच्या ड्रायव्हरचे निधन; शूटिंग दरम्यान आला हृदयविकाराचा झटका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/19/e9e705dfe76802697ee39f971607841d_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Varun Dhawan Driver Manoj Sahu : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता वरूण धनव (Varun Dhawan) एका अॅड फिल्मच्या शुटिंगसाठी मुंबईमधील मेहबूब स्टूडिओ येथे काल (मंगळवारी) गेला होता. यावेळी नेहमी प्रमाणे वरूणचे ड्रायव्हर मनोज साहू (manoj sahu) हे देखील वरूणसोबत गेले. मनोज यांनी वरूणला गाडीमधून मेहबूब स्टूडिओ येथे सोडले. त्यानंतर वरूणनं शूटिंगला सुरूवात केली. शूटिंग संपण्याची वाट पाहात मनोज हे मेहबूब स्टूडिओच्या इथेच थांबले पण त्याच वेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना लगेच लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वरूण धवनच्या टिममधील एका सदस्यानं एबीपी न्यूजला सांगितलं, 'मेहबूब स्टूडिओमध्ये असताना मंगळवारी मनोज साहू यांना सहा वाजता हार्ट अटॅक आला. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल् होते. पण हार्ट अटॅक आल्यानं त्यांचे निधन झाले. '
जेव्हा मनोज यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, तेव्हा हॉस्पिटलमध्ये वरूण देखील गेला. बराच वेळ वरूण हॉस्पिटलमध्ये होता. मनोज यांच्या प्रकृतीबाबत तो डॉक्टरांना विचारत होता.
मनोज साहू हे फक्त वरूण धवनचेच नाही तर त्यांच्या वडिलांचे म्हणजेच डेव्हिड धवनचे देखील ड्रायव्हर होते. जेव्हा वरूणनं देखील अभिनय क्षेत्रात काम करायचं ठरवलं तेव्हा मनोज साहू हे त्याचे ड्रयाव्हर झाले. मनोज साहू हे गेली 25 वर्ष धवन कुटुंबाकडे ड्रायव्हर म्हणून काम करत होते. त्यांच्या कुटुंबामध्ये पत्नी आणि दोन मुलं आहेत.
संबंधित बातम्या
- 'पुष्पा'नंतर आता अल्लू अर्जुनची चाहत्यांना आणखी एक भेट; यावर्षी 'हा' चित्रपट होणार रिलीज
- Actress Childhood Photo : 'या' क्यूट मुलीला ओळखलं? सध्या आहे बॉलिवूडची 'एंटरटेन्मेंट क्विन'
-
श्रीदेवीच्या पाठीवर लिहिलंय 'बोनी'; बोनी कपूरने शेअर केला जुना फोटो, चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)