श्रीदेवीच्या पाठीवर लिहिलंय 'बोनी'; बोनी कपूरने शेअर केला जुना फोटो, चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस
Sridevi's Throwback Pic : चित्रपट निर्माता बोनी कपूरने श्रीदेवीचा एक जुना फोटो शेअर केला असून त्यावर कमेंट्सचा पाऊस पडतोय.
![श्रीदेवीच्या पाठीवर लिहिलंय 'बोनी'; बोनी कपूरने शेअर केला जुना फोटो, चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस Boney Kapoor shares Sridevi s throwback pic with his name written on her back श्रीदेवीच्या पाठीवर लिहिलंय 'बोनी'; बोनी कपूरने शेअर केला जुना फोटो, चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/18/ecfd4e2502b5ed204f3365eff3ce1b55_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : चित्रपट निर्माता बोनी कपूरने त्याची दिवंगत पत्नी श्रीदेवीचा एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये श्रीदेवीच्या पाठीवर लाल रंगाने बोनी असं लिहिलं आहे. इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेला हा फोटा सध्या चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.
बोनी कपूरने शेअर केलेल्या या सुंदर फोटोखाली लिहिलं आहे की, लखनौमध्ये 2012 साली दुर्गा पूजा सण साजरा करतानाचा हा फोटो. आता या फोटोवर श्रीदेवीच्या चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने लिहिलं आहे की रुप की राणी, तर दुसऱ्याने लिहिलं आहे की, श्रीदेवी आज आपल्यात नाही यावर अजूनही विश्वास बसत नाही. एका चाहत्याने कमेंट केली आहे की, ...पण श्रीदेवीच्या पाठीवर बोनी असं कोण लिहिलंय? याची उत्सुकता आहे.
View this post on Instagram
या आधी गेल्या आठवड्यात, बोनी कपूरने श्रीदेवीचा आणखी एक जुना फोटो शेअर केला होता. त्या फोटोत बोनी कपूर आणि श्रीदेवी हे आईस्क्रिम खाताना दिसत आहेत. त्याखाली बोनी कपूरने लिहिलं आहे की, आमच्या दोघांकडेही सुंदर दात आहेत. पण किती खायचं यावर तिचं नियंत्रण आहे तर माझं नाही.
बोनी कपूरने त्याचा पहिला विवाह मोना कपूरशी केला होता. त्यानंतर या दाम्पत्यांनी 1996 साली घटस्फोट घेतला. या दोघांना अर्जुन कपूर आणि अंशुला कपूर अशी दोन अपत्यं आहेत. यानंतर 1996 सालीच बोनी कपूरने श्रीदेवीशी विवाह केला. या दोघांना जान्हवी कपूर आणि कुशी कपूर अशी दोन अपत्यं आहेत. तीन वर्षांपूर्वी, 2018 साली श्रीदेवीचा अपघाती मृत्यू झाला.
महत्त्वाच्या बातम्या :
- Pavitra Rishta Season 2 : अर्चना आणि मानव पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला,'पवित्र रिश्ता सीझन 2' चा ट्रेलर प्रदर्शित
- प्रत्येक भांडणानंतर Dhanush करायचा असे काही? मित्राने सांगितले दोघांच्या वेगळे होण्याचे खरे कारण
- Ala Vaikunthapurramuloo Hindi Teaser : अल्लू अर्जुनच्या 'अला वैंकुटापुर्रामुलू' सिनेमाचा हिंदी टीझर रिलीज
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)