एक्स्प्लोर

'बिग बॉसच्या विरोधात बोलाल तर...'; जान्हवी किल्लेकरनं रुचिता जामदारला सुनावलं; रितेश भाऊंची बाजू घेत म्हणाली...

Janhavi Killekar On Ruchita:बिग बॉस हे इतकं मोठं नाव आहे की त्या घरात जायला लोक कुठल्याही लेबलला जायला तयार असतात. बिग बॉस अत्यंत मोठा शो आहे.

Janhvi killekar on Ruchita jamdar: बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेली रुचिता जामदार सध्या प्रचंड चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात जवळपास प्रत्येकाशी तिचे वाद झाले. घराच्या बाहेर आल्यानंतर अनेक ठिकाणी ती मुलाखती देताना दिसत आहे. या मुलाखतींमध्ये बिग बॉसविषयी तिने अनेक खळबळजनक  खुलासे केले आहेत. अनेक स्पर्धकांची पोलखोलही केली आहे. रुचिताच्या घरातील आणि बाहेरच्या वागण्यावर अनेक सेलिब्रेटी तसेच बिग बॉसच्या घरात जाऊन आलेले माजी स्पर्धक टीका करताना दिसत आहेत. काही जण तिच्या बाजूनेही उभे राहिल्याचे दिसत आहे. दरम्यान, बिग बॉस 5 मध्ये फिनालेपर्यंत पोहोचलेल्या जान्हवी किल्लेकरने रुचिता जामदारवर टीका केलीये. (Bigg Boss Marathi 6)

काय म्हणाली जान्हवी किल्लेकर?

जान्हवी म्हणाली, "हाय, हॅलो, नमस्कार. आज मला तुम्हा सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. आपल्या महाराष्ट्रात असे अनेक कॉन्टेन्ट क्रियेटर्स आहेत, एक्टर, इन्फ्लुएन्सर आहेत ज्यांना बिग बॉसच्या घरात जायचंय. महाराष्ट्रात असे अनेक लोक आहेत जे बिग बॉस मध्ये एकदा जाण्यासाठी धडपडतायत, रडतायत, तडफडतायत- की प्लिज एकदा तरी आम्हाला बिग बॉसमध्ये घ्या. बिग बॉस हे इतकं मोठं नाव आहे की त्या घरात जायला लोक कुठल्याही लेबलला जायला तयार असतात. बिग बॉस अत्यंत मोठा शो आहे. त्या शोमध्ये जाण्याचं स्वप्न महाराष्ट्रातील प्रत्येक जण बघत असतो. पण जेव्हा तुम्हाला तिथे जायची संधी मिळते, त्या संधीचं सोनं करायचं सोडून आतमध्ये एक तर माती खाऊन बाहेर येतात. ठीक आहे, माती खाऊन बाहेर येतात तिथपर्यंत ठीक आहे. पण ज्या शोने तुम्हाला ओळख दिली, ज्यामुळे तुमचं नाव संपूर्ण महाराष्ट्राला कळलं, किमान त्या शोला तुम्ही नाव ठेवू नका - की बिग बॉस दुटप्पी आहे. विशेषतः रितेश देशमुख. रितेश सरांच्या बाबतीत कुणीही बोलायचं नाही, कारण तो अत्यंत चांगला व्यक्ती आहे. अर्थात तुम्हाला आत्तापर्यंत समजलं असेल मी कोणाविषयी बोलते. नाव घ्यायला काहीच हरकत नाही. मी रुचिताबद्दल बोलतेय."

जान्हवी पुढे म्हणाली, "ती जे आता बिग बॉसविरोधात बोलतेय ते खूप चुकीचं आहे. मला असं म्हणायचंय की कोण आहेस तू? किंवा कोण होतीस तू? पण बिग बॉसच्या निर्मात्यांनी तुला संधी दिली की बिग बॉसमध्ये ये आणि स्वतःला सिद्ध कर. बिग बॉसच्या घरात गेल्यावर चुका होतात. बरेच गेम चेंज होतात. राग येतो. सगळं होतं. मी सुद्धा त्या सगळ्या चुका केल्या आहेत. मी काही कोणाला जज करत नाही. माझा मुद्दा एवढाच आहे की आपल्याला ज्या शोमुळे नाव मिळालं, किमान त्या शोबद्दल तुम्ही वाईट बोलू नका. तुम्ही इतर स्पर्धकांविषयी बोला, काहीही बोला; पण तुम्ही बिग बॉस या शोला बोलू शकत नाही. आणि रितेश सरांना तर नाहीच नाही."

'जिस थाली मे खाते हो…'

ती पुढे म्हणाली, "तुम्ही आता असं म्हणताय की बिग बॉसने तुम्हाला चुकीचं दाखवलं. पण तुम्हाला चुकीचं दाखवून बिग बॉसला काय मिळणार आहे? जे तू आतमध्ये करणार ते बिग बॉस दाखवणार. मग याबद्दल बोलायचं झालं तर मला तक्रारींची लिस्टच लिहायला पाहिजे. मलाही त्यांनी 'वीकेंडचा वार' ला नाही बोलू दिलं. सगळ्यात जास्त ओरडा खाणारी कंटेस्टंट मी होते. पण आजपर्यंत मी बिग बॉसला कधीही नावं ठेवली नाहीत. किंवा रितेश सरांकडे नजर वर करूनही बघितली नाही. कारण ते बिग बॉसचे होस्ट आहेत. आज इतका मोठा व्यक्ती आपल्याशी बोलतोय हीच मोठी गोष्ट आहे यार. बिग बॉसने आपल्याला निवडलं, यापेक्षा आपल्याला काय हवंय एक कलाकार म्हणून? जिस थाली में तुम खाते हो उसी थाली में छेद कर रहे हो. चुकीचं आहे. तू बोल. अर्थात तुला फ्रस्ट्रेशन असेल की मी बाहेर आले. मी जे चांगलं केलं ते दाखवलं नाही, माझा गेम सुधारला होता -हे जे तिचे वाक्य आहेत."

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Jahnavi Kiran Killekar (@jahnavikillekar)

बिग बॉस आणि रितेश सरांविरोधात बोललीस तर…

ती म्हणाली, "मी घरात सगळ्यात जास्त ओरडा खाणारी व्यक्ती होते. पण जेव्हा मला रितेश सरांनी माझ्या चुका सांगितल्या तेव्हा माझा गेम चेंज केला. त्यानंतर मी ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्या सगळ्या बिग बॉसने दाखवल्या. माझ्या चांगल्या आणि वाईट दोन्ही बाजू त्यांनी दाखवल्या. तुम्ही काहीही करा, पण बिग बॉसला नावं ठेऊ नका. आज त्या शोने तुम्हाला बनवलं आहे. माझ्यासाठी तो शो देवासारखा आहे. या शोमध्ये जाण्याआधी मी अनेक मालिका केल्या होत्या, पण मी इतकी फेमस नव्हते. आज मी जी काही आहे, जे काही कमावलं आहे, जे काही मिळवलं आहे ते सगळं मला बिग बॉस या शोने दिलं आहे. तुम्ही या सगळ्यांना काहीही बोला, काहीही करा; पण बिग बॉसच्या विरोधात काही बोललात तर मी खपवून घेणार नाही. रितेश सरांच्या विरोधात तर नाहीच नाही."

महत्त्वाच्या बातम्या

Pranit More Comeback After Controversy: 370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
Mithun Chakraborty Sridevi Affair Clim: 'त्यावेळी तीन महिने नवरा-बायकोप्रमाणे एकत्र राहिलेले...'; श्रीदेवी आणि मिथुन चक्रवर्तींबाबत चक्रावणारा दावा
'त्यावेळी तीन महिने नवरा-बायकोप्रमाणे एकत्र राहिलेले...'; श्रीदेवी आणि मिथुन चक्रवर्तींबाबत चक्रावणारा दावा
Nikita Rawal Angry On Ranbir Kapoor: 'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
Jeetendra Nephew Award Winning Director: एकता कपूरचा भाऊ 'हा' अवॉर्ड विनिंग डायरेक्टर, अभिनयात ठरला फ्लॉप, मग बनवली सुपरहिट 'कल्ट क्लासिक फिल्म', ओळखलं का कोण?
एकता कपूरचा भाऊ 'हा' अवॉर्ड विनिंग डायरेक्टर, अभिनयात ठरला फ्लॉप, मग बनवली सुपरहिट 'कल्ट क्लासिक फिल्म', ओळखलं का कोण?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Crime: वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; ऑनलाइन कंपनीतील कामगिरीच्या स्पर्धेतून जीवघेणा हल्ला, दोघांना अटक
वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! चांगला इन्सेंटिव्ह मिळवतो म्हणून सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; दोघांना अटक, नागपूर हादरलं
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
Maharashtra Live blog updates: सोलापूर जिल्हा परिषदेतील सभागृहाचे नाव बदलाला राष्ट्रवादी शरद पवार गट आणि संभाजी ब्रिगेडचा विरोध
Maharashtra Live blog updates: सोलापूर जिल्हा परिषदेतील सभागृहाचे नाव बदलाला राष्ट्रवादी शरद पवार गट आणि संभाजी ब्रिगेडचा विरोध
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Eknath Shinde and PM Modi: सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
Nikita Rawal Angry On Ranbir Kapoor: 'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Manoj Jarange Patil and Pravin darekar: फडणवीसांवर टीका करताच प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगेंची अक्कलच काढली, म्हणाले, 'नाक्यावर आंदोलन करणं आणि...'
फडणवीसांवर टीका करताच प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगेंची अक्कलच काढली, म्हणाले, 'नाक्यावर आंदोलन करणं आणि...'
Embed widget