koffee with karan 7 : करण जोहराला झटका; दोन साऊथ सुपस्टार्सनं नाकारली 'कॉफी विथ करण-7 ' ची ऑफर
'कॉफी विथ करण 7' चा प्रिमिअर हा 7 जुलै रोजी होणार आहे.
koffee with karan 7 : प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरच्या (Karan Johar) 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. करण जोहरच्या कॉफी विथ करणच्या सहा सिझननं प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आता या कार्यक्रमाच्या सातव्या सिझनची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात आहेत. 'कॉफी विथ करण 7' चा प्रिमिअर हा 7 जुलै रोजी होणार आहे. या सिझनच्या पहिल्या एपिसोडमध्ये कोणता सेलिब्रिटी सहभागी होणार आहे? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. करणच्या शोमध्ये दोन साऊथ सुपस्टार्सला आमंत्रित करण्यात आलं होतं. पण या दोन सुपर स्टार्सनं कॉफी विथ करणमध्ये येण्यास नकार दिला.
7 जुलैला डिज्नी प्लस हॉटस्टारवर 'कॉफी विथ करण-7' चा पहिला एपिसोड रिलीज होणार आहे. रिपोर्टनुसार, कॉफी विथ करण-7 च्या पहिल्या एपिसोडची ऑफर ही आरआरआर चित्रपटातील राम चरण आणि ज्युनियर एनटीआर या दोन अभिनेत्यांना देण्यात आली होती. पण दोघांनी देखील शोमध्ये येणार नकार दिला आहे. आता या कार्यक्रमाच्या पहिल्या एपिसोडमध्ये कोण सहभागी होणार आहे? या प्रश्नाचे उत्तर प्रेक्षकांना सात जुलैला मिळणार आहे.
अनेक सेलिब्रिटींनी लावली होती हजेरी
करण हा 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतो. या कार्यक्रमामध्ये वेगवेगळे सेलिब्रिटी सहभाग घेतात. आमिर खान, शाहरूख खान, अमिताभ बच्चन आणि सलमान खान यांसारख्या प्रसिद्ध कलाकारांनी या शोमध्ये हजेरी लावली होती. काही दिवसांपूर्वी करण अनुपमा चोप्रा यांच्या फिल्म कंपेनियनच्या मजेशीर चॅट शोमध्ये सामील झाला होता. या चॅट शोमध्ये करणनं 'कॉफी विथ करण'च्या नव्या सिझनबाबत सांगितलं होतं.
शोमध्ये कोणते सेलिब्रिटी होऊ शकतात सामील
कॉफी विथ करणच्या सातव्या सिझनमधील एका एपिसोडमध्ये सलमान खान, आमिर खान आणि शाहरुख खान हे एकत्र उपस्थित राहणार आहेत, अशी चर्चा आहे. तसेच या सिझनमध्ये करिना कपूर, रणबीर कपूर, आलिया भट्ट, रणवीर सिंह, वरुण धवन, प्रियंका चोप्रा, निक जोनास, विजय देवरकोंडा, अनन्या पांडे हे कलाकार कॉफी विथ करणच्या या नव्या सिझनमध्ये हजेरी लावतील. त्यामुळे आता प्रेक्षक या कार्यक्रमाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.