Actor Manu Varma Divorce With Sindhu Varma: 25 वर्षांचा सुखी संसार आणि 3 मुलांचे पालक; आता घटस्फोट न घेताच सेलिब्रिटी जोडप्याचा काडीमोड
Actor Manu Varma Divorce With Sindhu Varma: अभिनेते मनु वर्मा आपली पत्नी सिंधू वर्मापासून वेगळे झाले आहेत. अद्याप दोघांचा कायदेशीररित्या घटस्फोट झालेला नाही.

Actor Manu Varma Divorce With Sindhu Varma: इतके नवं वर्ष सुरू झालं आणि तिकडे मनोरंजन विश्व (Entertainment Industry) एकापाठोपाठ होणाऱ्या सेलिब्रिटींच्या घटस्फोटानं (Celebrity Divorces) पुरतं हादरुन गेलंय. क्रिप कपूर सुरी (Krip Kapur Suri), माही विज (Mahhi Vij) आणि जय भानुशाली (Jay Bhanushali) यांच्यापाठोपाठ आता आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्यानं आपल्या पत्नीपासून वेगळं होत असल्याची घोषणा केली आहे. तब्बल 25 वर्षांनंतर सेलिब्रिटी कपलच्या सुखी संसारात मिठाचा खडा पडला. अभिनेत्यानं दिलेल्या माहितीनुसार, दोघेही कायदेशीररित्या अजूनही वेगळे झालेले नाहीत. पण, दोघेही दोन वर्षांपासून वेगळे राहत आहेत.
मल्याळम अभिनेते (Malayalam Actors) मनु वर्मा (Manu Varma) आपली पत्नी सिंधू वर्मापासून वेगळे झाले आहेत. अद्याप दोघांचा कायदेशीररित्या घटस्फोट झालेला नाही. मात्र मनु वर्मा यांनी पत्नी सिंधू वर्मासोबत असलेलं आपलं नातं मोडलं आहे. त्या दोघांनीही घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केला असून गेल्या दोन वर्षांपासून ते वेगळे राहत आहेत.
टीव्ही अभिनेता मनु वर्मा यांनी खुलासा केलाय की, ते आणि त्यांची पत्नी अभिनेत्री सिंधू वर्मा 25 वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट घेत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, हे जोडपं सध्या वेगळं राहत आहे आणि त्यांचा घटस्फोटाचा खटला न्यायालयात अद्याप प्रलंबित आहे. मनु वर्मा आणि सिंधू वर्मा हे मल्याळम टीव्ही इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध जोडपं आहे. मनु वर्मा यांनी खुलासा केलाय की, ते आणि त्यांची पत्नी दोन-तीन वर्षांपूर्वीपर्यंत अगदी गुण्यागोविंदानं एकत्र राहत होते, पण नंतर दोघांमधील तणाव वाढले आणि दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
टीव्ही अभिनेता मनु वर्मा म्हणाले की, दोघांचा घटस्फोट अद्याप अधिकृत नसला तरी, ते पुन्हा एकत्र येण्याची शक्यता कमी आहे. "मी आणि माझी पत्नी सध्या वेगळे राहत आहोत. आमचा अद्याप कायदेशीर घटस्फोट झालेला नाही. आम्ही पुन्हा एकत्र येण्याची शक्यता कमी आहे. आम्ही अगदी प्रेमानं एकत्र राहत होतो आणि एकत्र आयुष्य सुरू केलेलं पण नंतर अनेक गोष्टींत वाद निर्माण झाले..."
अद्याप कायदेशीररित्या आमचा घटस्फोट झालेला नाही. पण... : अभिनेते मनु वर्मा
मनु वर्मा यांनी मुव्ही वर्ल्ड मीडियाशी बोलताना पत्नीपासून वेगळं राहत असल्याचा खुलासा केला आहे. ते म्हणाले की, "मी आणि माझी पत्नी वेगळे झालो आहोत. अद्याप कायदेशीररित्या आमचा घटस्फोट झालेला नाही. पण, आम्ही पुन्हा एकत्र येण्याच्या कोणत्याही शक्यता दिसत नाहीत. आम्ही प्रेमात पडलो आणि एकत्र आयुष्य जगू लागलो, हे म्हणण्यात आता काहीच अर्थ उरलेला नाही. कारण आमच्यापेक्षाही एकमेकांवर जास्त प्रेम करणारी आणि एकत्र राहणारी जोडपीही वेगळी झाली आहेत. दोन-तीन वर्षांपूर्वी आम्ही एकमेकांच्या प्रेमात होतो. पण, या गोष्टीसाठी फार काळ लागला नाही..."
दरम्यान,मनू आणि सिंधू वर्मा यांनी 'कदमत्ताथु कथानार', 'पुक्कलम वरवयी' आणि 'कुमकुमाचेप्पू' सारख्या टीव्ही शोमध्ये एकत्र काम केलंय. सिंधू वर्मा 'एथो जन्म' आणि 'पंचग्नी'सारख्या टेलिव्हिजन मालिकांमधील भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























