TV actor Aman Jaiswal : बाईकवरुन शूटींगसाठी निघालेल्या अभिनेत्याला भरधाव ट्रकची धडक, अमन जयस्वालचा दुर्दैवी मृत्यू
TV actor Aman Jaiswal : भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत अभिनेत्याचा मृत्यू झालाय.
TV actor Aman Jaiswal : मुंबईच्या (Mumbai) जोगेश्वरी पश्चिमेत झालेल्या अपघातात एका टिव्ही अॅक्टरचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत अभिनेता अमन जयस्वाल याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. मुंबईच्या जोगेश्वरी पश्चिमेत टीव्ही ॲक्टर अमन जयस्वाल याचा अपघात झाला आणि यातच त्याचा मृत्यू झालाय. दरम्यान, अभिनेत्याच्या अपघाती मृत्यूनंतर कलाक्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.
बाईकवरुन जात असताना भरधाव ट्रकची धडक,
अधिकची माहिती अशी की, 22 वर्षीय टीव्ही ॲक्टर अमन जयस्वाल आज संध्याकाळी शूटिंगसाठी जोगेश्वरी पश्चिम मधून बाईकवर जात होता. याचवेळी भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रकने अमनला जोरदार धडक दिली. यामध्ये अमन गंभीररित्या जखमी झाला होता. उपचारासाठी जखमी अमनला जोगेश्वरी येथील ट्रामा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान अमन जैस्वाल याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला असून आंबोली पोलिसांनी ट्रक चालकाचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस फरार झालेल्या ट्रक चालकाचा शोध घेत आहेत.
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवासhttps://t.co/RtmT8AA3IT
— ABP माझा (@abpmajhatv) January 17, 2025
उपचारादरम्यान अमन जैस्वाल याचा दुर्दैवी मृत्यू
मुंबईच्या जोगेश्वरी पश्चिमेत टीव्ही ॲक्टर अमन जैस्वाल याचा रस्ता अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे..22 वर्षीय टीव्ही ॲक्टर अमन जैस्वाल आज संध्याकाळी शूटिंगसाठी जोगेश्वरी पश्चिम मधून बाईकवर जात असताना भरधाव वेगाने जात असलेली ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे अमन जखमी झाला होता.. उपचारासाठी जखमी अमनला जोगेश्वरी येथील ट्रामा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान अमन जैस्वाल याचा दुर्दैवी मृत्यू झाली...अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला असून आंबोली पोलिसांनी ट्रक चालकाचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Satara Crime : साताऱ्यात अंधश्रद्धेचा कळस, ऊसाच्या शेतात नेऊन महिलेचं शीर धडा वेगळं केलं; मृतदेहाजवळ लिंबू-मिरची टाकली https://t.co/6TTNNGPFlf
— ABP माझा (@abpmajhatv) January 17, 2025
इतर महत्त्वाच्या बातम्या