Walmik Karad Jyoti Jadhav: ज्योती जाधवला वाल्मिक कराडपासून दोन मुलं; पुण्यात आणखी तीन फ्लॅट्स, दुसऱ्या पत्नीच्या नावावर मोठं घबाड
Walmik Karad Jyoti Jadhav: संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी ज्योती जाधव यांची चौकशी देखील करण्यात आली आहे.
Walmik Karad Jyoti Jadhav: ज्योती मंगल जाधव (Jyoti Jadhav) ही महिला वाल्मिक कराड (Walmik Karad) याची दुसरी पत्नी असून तिच्या नावे पुण्यात आणखी तीन फ्लॅट्स असल्याची माहिती एबीपी माझाला उपलब्ध झाली आहे. त्याचबरोबर या ज्योती मंगल जाधवला वाल्मिक कराडपासून दोन मुलं देखील असून त्यांच्या नावे देखील काही संपत्ती खरेदी केल्याचं समोर आलं आहे.
पुण्यातील हडपसरमधील एमेनोरा पार्क टाऊनशीपमध्ये सेक्टर आर 21, टॉवर 33, 17 वा मजल्यावर 7 नंबरचा एक फ्लॅट, तर आर 21, टॉवर 33, 8 नंबरचा दुसरा फ्लॅट आणि Gera Greensville , फ्लॅट नंबर A 3 , खराडी हा आणखी एक फ्लॅट ज्योती मंगल जाधवच्या नावावर असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी ज्योती जाधव यांची चौकशी देखील करण्यात आली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणानंतर वाल्मिक कराड सुरूवातीच्या दिवसात ज्योती जाधवकडे राहायला होता, अशीही माहिती समोर आली होती.
कोट्यावधी रुपये खर्च करुन दोन ऑफीस स्पेसेस खरेदी करण्यात आल्याचेही समोर-
ज्योती मंगल जाधवच्या नावे पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोर उभ्या राहत असलेल्या इमारतीत कोट्यावधी रुपये खर्च करुन दोन ऑफीस स्पेसेस खरेदी करण्यात आल्याचेही समोर आलं आहे. त्याचबरोर वाल्मिक कराडच्या स्वतःच्या आणि पहिल्या पत्नीच्या नावे पिंपरी-चिंचवडमध्ये दोन फ्लॅट असल्याचे देखील उघड झालंय.
फ्लॅटच्या लिलावाच्या भीतीने वाल्मिक कराड कुटुंबियांची धावपळ-
वाल्मिक कराडचे पिंपरी चिंचवडमध्ये दोन अलिशान फ्लॅट असल्याची अन त्या फ्लॅटचा कर थकवल्याचं एबीपी माझाने समोर आणलं. त्यानंतर जागी झालेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेने वाल्मिक कराडच्या एका फ्लॅटचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरु केली. ही बातमी एबीपी माझाने दाखवल्यानंतर कराड कुटुंबियांची धावपळ उडाली. त्यांनंतर काही तासांतच कराड कुटुंबीयांनी दोन्ही फ्लॅटचा थकीत कर भरुन टाकला. पार्क स्ट्रीट सोसायटीत जून 2021मध्ये फोर बीएचके फ्लॅट खरेदी करण्यात आला. वाल्मिक कराड आणि पत्नी मंजली वाल्मिक कराडच्या नावे असलेल्या अलिशान फ्लॅटचा आत्तापर्यंत एक रुपयांचा ही कर अदा करण्यात आला नव्हता. या फ्लॅटचा 1 लाख 55 हजार 444 रुपयांचा कर थकलेला होता. जो आता भरण्यात आलाय. तर एप्रिल 2016मध्ये पिंक सिटी रोडवरील मि कासा बिला सोसायटीतील टू बीएचके खरेदी करण्यात आला होता. आता मिळकत कर तर भरला गेलाय मात्र प्रश्न या मिळकती खरेदी करण्यासाठी वाल्मिक कराडने कोट्यवधींची रक्कम कुठून आणली? याचा तपास होण्याची गरज आहे.
Jyoti Mangal Jadhav यांचा संबंध काय, FC रोडवरील संपत्तीचं गौडबंगाल काय?, VIDEO:
संबंधित बातमी:
Walmik Karad: वाल्मिक कराडचे ते दोन व्यक्ती विदेशात; सीआयडीकडे नवीन माहिती, गूढ आता उलघडणार?