Marathi upcoming cinema : 'तू माझा किनारा, चित्रपटामध्ये झळकणार 'ही' नवी जोडी! पुर्ण बातमी वाचा...
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर केतकी आणि भुषण या दोघांच एकत्र फोटोशूट पाहुन प्रेक्षकांमध्ये कुतूहल निर्माण झाला होता. अनेकांना ते दोघं खऱ्या आयुष्यात एकत्र असल्याचं वाटलं, पण...

Upcoming marathi movie : काही दिवसांपुर्वी प्रसिद्ध कलाकार भुषण प्रधान आणि बाहुभषिय चित्रपटांमध्ये झळकणारी केतकी नारायण, हे दोघे सोशल मीडिया पोस्ट मुळे एकत्र असण्याची बातमी समोर आली पण त्यानंतर त्यांनी त्यांचा अपकमिंग चित्रपट 'तु माझा किनारा'चं पोस्टर पब्लिश करुन या चित्रपटात भुषण आणि केतकी एकत्र दिसणार असल्याची बातमी प्रेक्षकांना दिली, सिनेमा मध्ये त्या दोघांच्या भूमिका काय असणार आहेत? हे आणखी रिव्हील केलेलं नाही. मराठी सिनेसृष्टी सतत वेग-वेगळ्या कथांसह सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येते पण हा चित्रपट नक्की कुठल्या संकल्पनेवर आधारित आहे हे अजून सस्पेंसच आहे.
त्यांचे आणखी कुठले चित्रपट?
केतकीने युथ, उदाहरनार्थ नेमाडे, अंडरवर्ल्ड, विचित्रम, फादर चिट्टी, उमा कार्तिक आणि 83 असे अनेक मराठी, हिंदी, मल्याळम, तेलुगु भाषांमध्ये चित्रपट, लघुपट,वेब सिरीज करुन प्रेक्षकांची मनं जिंकली तसेच घरत गणपती, ऊन सावली, लग्न कल्लोळ, जुनं फर्निचर अशा अनेक मराठी चित्रपटांतुन भुषणने चाहत्यांच्या मनावर छाप सोडली.
मराठी चित्रपटांमध्ये भरपुर जोड्या आपण पाहिल्या पण ही जोडी मात्र आपण पहिल्यांदाच पाहणार आहोत.
काय आहे सिनेमा ची कहाणी?
त्यांच्या कॅरेक्टरमध्ये कोणते संघर्ष? कोणते सस्पेंस लपले आहेत? या प्रश्नांची उत्तरं लवकरंच मिळणारआहेत. हा चित्रपट प्रेक्षकांना एक वेगळा आणि संस्मरणीय अनुभव देईल. चित्रपटाचं स्टोरीलाईन नेमकी काय आहे, हे अजून गूढच ठेवण्यात आलं आहे. पण इतकं नक्की हा सिनेमा प्रेक्षकांच्या भावनांना स्पर्श करणारा असून, साध्या वाटणाऱ्या आयुष्यातले असाधारण प्रश्न समोर आणणार आहे.
कधी प्रदर्शित होणार?
‘तू माझा किनारा’ हा चित्रपट ३१ ऑक्टोबर रोजी सिनेमाघरांमध्ये प्रदर्शित होणार. ‘तू माझा किनारा’ फक्त पडद्यावर घडणारी कथा नाही, तर प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात कुठेतरी उमटणारा आरसा आहे. भुषण आणि केतकी पहिल्यांदाच एक जोडपं म्हणुन प्रेक्षकांच्या भेटीली येणार आहेत. तर दोघांच्याही चाहत्यांमध्ये तितकीच उत्सुकता आहे.
हेही वाचा :























