Tom Cruise : वयाच्या 61व्या वर्षी टॉम क्रूझचं ब्रेकअप; 25 वर्षांनी लहान प्रेयसीसोबतचं नातं तुटलं
Tom Cruise Breaks Up : अभिनेत्याने सोशल मीडियावर अल्सीना खैरोवासोबत नाते असल्याची कबुली दिली. आता, त्याच्या अवघ्या 10 दिवसांमध्येच ब्रेकअप झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.
![Tom Cruise : वयाच्या 61व्या वर्षी टॉम क्रूझचं ब्रेकअप; 25 वर्षांनी लहान प्रेयसीसोबतचं नातं तुटलं Tom Cruise breaks up with Elsina Khayrova days after meeting her children Said Report Tom Cruise : वयाच्या 61व्या वर्षी टॉम क्रूझचं ब्रेकअप; 25 वर्षांनी लहान प्रेयसीसोबतचं नातं तुटलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/23/6b31e3092f988ddeb25a8f73db9cdcaf1708669524358290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Tom Cruise Breaks Up : हॉलिवूडचा स्टार अभिनेता टॉम क्रूझच्या (Tom Cruise) वैयक्तिक आयुष्यात मोठी घडामोड झाली आहे. 61 व्या वर्षी टॉम क्रूझचे प्रेमप्रकरण संपुष्टात आले आहे. टॉम क्रूझ आणि त्याची रशियन प्रेयसी एल्सिना खैरोवाचे (Elsina Khayrova) ब्रेकअप झाले असल्याचे वृत्त आहे. टॉमने 10 दिवसांपूर्वीच आपल्या रिलेशनशिपची माहिती दिली होती. त्यानंतर आता त्याचे ब्रेकअप झाल्याचे वृत्त आहे.
61 व्या वर्षी तुटलं हृदय
टॉम क्रूझने त्याच्या गर्लफ्रेंडसोबतचे नाते संपुष्टात आणले असल्याचा दावा केला जात आहे. दोघेही मागील काही महिन्यांपासून डेट करत होते. 13 फेब्रुवारी रोजी, अभिनेत्याने सोशल मीडियावर एल्सिना खैरोवासोबत नाते असल्याची कबुली दिली. आता, त्याच्या अवघ्या 10 दिवसांमध्येच ब्रेकअप झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. टॉम क्रूझने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एल्सिना खैरोवाचा फोटोही डिलीट केला आहे.
View this post on Instagram
माझ्यापेक्षा 25 वर्षांनी लहान असलेल्या गर्लफ्रेंडशी ब्रेकअप
टॉम क्रूझ आणि त्याच्या गर्लफ्रेंडच्या वयाच्या अंतरात 25 वर्षांचा फरक आहे. त्यांच्या ब्रेकअपची अनेक कारणे सांगितली जात आहेत. काही जणांच्या मते टॉम क्रूझने एल्सिना खैरोवाचे हृदय तोडले. तर, काहींच्या मते त्याच्या गर्लफ्रेंडमुळेच ब्रेकअप झाले. गेल्या काही महिन्यांपासून दोघेही लंडनमध्ये एकत्र राहत असल्याच्या बातम्या येत आहेत. यावेळी अभिनेत्याने आपल्या प्रेयसीच्या मुलांचीही भेट घेतली. या भेटीनंतरच टॉम क्रूझने अल्सीनापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला असल्याचे वृत्त आहे.
द यूएस सन या इंग्रजी वृत्तसंकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, टॉम क्रूझ आणि अलेसिना खैरोवा लंडनमध्ये एअर ॲम्ब्युलन्स चॅरिटीच्या समर्थनार्थ आयोजित केलेल्या गाला डिनर दरम्यान दिसले. दोघेही इथे वेगळे पोहोचले होते, त्यानंतर त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या पसरू लागल्या. मात्र, आतापर्यंत दोघांनीही या वृत्तांवर कोणतेही वक्तव्य केलेले नाही.
तीन वेळेस अडकला लग्नाच्या बेडीत पण...
टॉम क्रूझने याआधी तीन वेळेस संसाराचा डाव मांडला. मात्र, तिन्ही वेळेस त्याचे घटस्फोट झाले. याआधीच्या तिन्ही लग्नापासून त्याला अपत्ये आहेत.
इतर संबंधित बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)