Timepass 3 : टाईमपास-3 मधील ‘लव्हेबल’ गाणं रिलीज; हृता आणि प्रथमेशचा रोमँटिक अंदाज
Timepass 3 : 'टाइमपास 3' मधील ‘लव्हेबल’ हे गाणे नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे.
Timepass 3 : झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशन्सची निर्मिती, रवी जाधव दिग्दर्शित 'टाइमपास 3' (Timepass 3) येत्या 29 जुलैला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. दगडूचे वेड लावणारे प्रेम याआधी आपण सर्वांनीच पाहिले आहे. आता पुन्हा एकदा त्याच्या ‘लव्हेबल’ भावना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 'टाइमपास 3' मधील ‘लव्हेबल’ हे गाणे नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले असून हे गाणे प्रथमेश परब (prathamesh parab) आणि हृतावर (Hruta Durgule) चित्रित करण्यात आले आहे.
या गाण्यामध्ये दगडू आणि पालवीमध्ये हळूवार खुलत जाणारे प्रेम दिसत आहे. प्रेमाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर बहरत जाणारे हे गाणे आर्या आंबेकर व हर्षवर्धन वावरे यांनी गायले असून याला अमितराज यांनी संगीत दिले आहे. तर क्षितीज पटवर्धन यांनी हे गाणे शब्दबद्ध केले आहे.
गाण्याबद्दल दिग्दर्शक रवी जाधव म्हणतात, “काही दिवसांपूर्वीच प्रथमेशचे धमाल गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. आता ह्रता दुर्गुळे आणि प्रथमेश परब यांच्यातील नाजूक नात्यावरील ‘लव्हेबल’ गाणे आपल्या भेटीला आले आहे. यापूर्वीही ‘टाइमपास’च्या दोन्ही चित्रपटातील गाण्यांनी धुमाकूळ घातला होता. त्यामुळे ‘टाइमपास 3’ मधील गाणीही संगीतप्रेमींना नक्कीच आवडतील.”
पाहा गाणं:
साई तुझं लेकरु गाणं देखील झालं प्रदर्शित
टाईपमपास-3 मधील 'साई तुझं लेकरू' हे गाणे काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले असून साईच्या चरणी दगडूचे कुटुंब आणि मित्र प्रार्थना करताना दिसत आहेत. या गाण्यात भाऊ कदम म्हणजेच दगडूचे वडील साईबाबांसमोर आभार मानत, दगडू तुमचाच लेकरू असल्याचे सांगत आहेत.
टाइमपास या चित्रपटाच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागातील गाण्यांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते. 'टाइमपास ३'मधील गाणीही प्रेक्षकांच्या ओठांवर अशीच रुळतील. झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशन्सची निर्मिती असलेल्या 'टाइमपास 3' चे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले असून यात दगडूच्या आयुष्यात आलेली 'पालवी' पाहायला मिळणार आहे. या पालवीची भूमिका हृता दुर्गुळे हिने साकारली आहे. 'टाइमपास ३' 29 जुलैला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा:
Timepass 3 : 'साई तुझं लेकरू'; 'टाइमपास 3' मधील धम्माल गाणे प्रेक्षकांच्या भेटीला