Tiger Shroff : टायगरनं व्यक्त केली इच्छा; म्हणाला, 'हॉलिवूडमध्ये करिअर करायचंय, अनेकदा ऑडिशन दिलं पण...';
टायगरनं हॉलिवूडमध्ये करिअर करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

Tiger Shroff : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) त्याच्या डान्सनं आणि फिटनेसनं नेहमी प्रेक्षकांची मनं जिंकतो. लवकरच त्याचा 'हीरोपंती-2' (Heropanti 2) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. टायगरनं एका मुलाखतीमध्ये हॉलिवूडमध्ये करिअर करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
टायगरनं मुलाखतीमध्ये सांगितलं, 'हॉलिवूडमध्ये सध्या कोणताही तरूण अॅक्शन हिरो नाहिये. मी ज्या प्रकारच्या गोष्टी करतो तशा प्रकारचं अॅक्शन करणारा हिरो सध्या हॉलिवूडमध्ये नाहिये असे हिरो तुम्ही 90 च्या दशकात पाहिले असतील. म्हणून मला हॉलिवूडमध्ये काम करायचे आहे. टायगर पुढे म्हणाला, 'मला दोन तीन वेळा हॉलिवूडमधून ऑफर आल्या. मी अनेकवेळा ऑडिशन देखील दिले. एक-दोन वेळा त्या ऑडिशनमध्ये फेल देखील झालो. पण मी प्रयत्न करत आहे. '
View this post on Instagram
2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या हिरोपंती या चित्रपटामधून त्यानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यावेळी टायगरच्या फिटनेसनं अनेकांचे लक्ष वेधलं पण काहींनी त्याच्या लूकला ट्रोल केलं. अनेकांनी त्याला गर्ल लूक आणि पिंक लिप्स लूक असं म्हणत ट्रोल केले होते. पण टायगरनं या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. . लवकरच टायगरचे हिरोपंती-2, गणपत आणि बडे मिया छोटो मिया हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Cannes Film Festival: 75 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या ज्युरी मेंबर्सच्या यादीत दीपिकाचं नाव; पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली माहिती
- Gulhar : 'मनात आलं तर प्रेम करीन, नाहीतर एखाद्याचा गेम करीन;' 'गुल्हर' चित्रपटाचा जबदस्त ट्रेलर रिलीज
- Alia Bhatt : लग्नानंतर आलियाला मिळाली 'गुड न्यूज'; चित्रपटांबरोबरच सोशल मीडियावरही डंका
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
