भगवान प्लीज... 70 वर्षांच्या स्टारचा 42 वर्षांच्या अभिनेत्रीसोबत इंटिमेट सीन, चाहते भडकले, कमेंट बॉक्समध्ये तुटून पडले
Thug Life Trailer Kamal Haasan: 70 वर्षीय कमल हसन आणि अभिनेत्री त्रिशा कृष्णनसोबतचा रोमँटिक सीन, जो सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे.

Thug Life Trailer Kamal Haasan: 70 वर्षीय सुपरस्टार कमल हसन (Kamal Haasan) त्यांचा आगामी सिनेमा 'ठग लाईफ' (Thug Life) मुळे चर्चेत आहेत. नुकताच 'ठग लाईफ'चा ट्रेलर रिलीज करण्यात आला. ट्रेलरला तसा संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं. पण, ट्रेलर रिलीज होताच कमल हसन मात्र फार ट्रोल झाल्याचं दिसलं. एकीकडे कमल हसन आणि चित्रपट निर्माते मणिरत्नम (Mani Ratnam) यांची जोडी पुन्हा एकत्र आल्यामुळे चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. मात्र, दुसरीकडे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेल्या काही दृश्यांनंतर मात्र चाहत्यांचा भलताच हिरमोड झाल्याचं दिसलं.
विशेषतः 70 वर्षीय अभिनेत्याचा अभिनेत्री त्रिशा कृष्णनसोबतचा रोमँटिक सीन, जो सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. रेडिटवरील एका युजरनं कमल हासन आणि त्रिशा कृष्णन यांच्या ट्रेलरमधील एका रोमँटिक दृश्याचा स्क्रीनशॉट शेअर केला. दुसऱ्या एका फोटोमध्ये कमल हासन अभिरामीला किस करताना दिसत आहेत.
"नहीं भगवान प्लीज नो...", चाहत्यांचा संताप
युजरनं शेअर केलेल्या स्क्रिनशॉर्टसोबत एक कॅप्शन लिहिलं आहे. युजरनं लिहिलंय की, "नहीं भगवान प्लीज नो..." सिनेमातील लीड अॅक्टर कमल हसन 70 वर्षांचे आहेत. तर त्रिशा 42 वर्षांची आहे. अशातच या दोघांमध्ये इंटिमेट सीननं सर्वांची झोप उडवली आहे. नेटकरी प्रचंड चिडले असून त्यांनी टीकेची झोड उठवली आहे.
Noo god please no
byu/NavyLemon64 intollywood
एका युजरनं लिहिलंय की, "त्रिशा, श्रृती हसनपेक्षा फक्त तीन वर्षांनी मोठी आहे.", तर आणखी एका युजरनं लिहिलंय की, "फक्त 30 वर्षांचं अंतर आहे.", पुढे एका युजरनं लिहिलंय की, "अभिरामी आणि कमल हसन यांच्यात 30 वर्षांचं अंतर लिप लॉक शेअर करताना पाहाणं विचित्र वाटतंय."
ठग लाईफबद्दल बोलायचं झालं तर, हा चित्रपट मणिरत्नम यांनी दिग्दर्शित केला आहे आणि त्यात कमल हसन आणि सिलंबरासन मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट एका गँगस्टरच्या प्रवासावर आधारित आहे, जो एका लहान मुलाला गुन्हेगारीच्या जगात मार्गदर्शन करतो. जसजशी वर्ष जातात, तसतसा सिलंबरसननं साकारलेला मुलगा एक विश्वासू साथीदार बनतो. ट्रेलरमध्ये गँगस्टर ड्रामा दाखवण्यात आला आहे. तर त्रिशा कृष्णन, सान्या मल्होत्रा, अभिरामी, अशोक सेल्वन, ऐश्वर्या लक्ष्मी, जोजू जॉर्ज, नासेर, अली फजल, पंकज त्रिपाठी, रोहित सराफ आणि वैय्यापुरी महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
पैसे अंडरवर्ल्डमधून यायचे, दाऊद इब्राहिम बॉलिवूडला पोसायचा...; दिग्गज अभिनेत्रीनं पितळं उघडं पाडलं























