Sharad Ponkshe: "त्यावेळी बाळासाहेब ठाकरे हे आमच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले..."; शरद पोंक्षेंनी सांगितले ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ नाटकाच्या प्रयोगादरम्यान आलेले अनुभव
'मी नथुराम गोडसे बोलतोय' (Me Nathuram Godse Boltoy) या नाटाकाच्या प्रयोगादरम्यान आलेल्या अनुभवांबद्दल शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून सांगितलं आहे.
Sharad Ponkshe: अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांचे 'मी नथुराम गोडसे बोलतोय' (Me Nathuram Godse Boltoy) हे नाटक ऑक्टोबर महिन्यापासून पुन्हा रंगभूमिवर येत आहे. नुकताच एक व्हिडीओ शरद पोंक्षे यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटाकाच्या प्रयोगादरम्यान आलेल्या अनुभवांबद्दल शरद पोंक्षे यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून सांगितलं आहे.
शरद पोंक्षेंनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून शरद पोंक्षे यांनी ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाच्या प्रयोगादरम्यान आलेले अनुभव सांगितले. ते म्हणाले, "सेन्सॉर प्रमाणपत्र मिळाल्यावर 10 जुलै 1998 पासून आमच्या नाटकाचे प्रयोग सुरु झाले. नाटकांच्या प्रयोगाला सुरुवात झाल्यानंतर आम्हाला एकएक अनुभव आले. एखाद्या अभिनेत्यानं चाळीस पन्नास वर्ष या नाट्यसृष्टीमध्ये काम केल्यानंतर त्याच्या वाट्याला जेवढे अनुभव येत असतील तेवढे अनुभव मला एक भूमिका साकारताना आले."
पुढे शरद पोंक्षेंनी सांगितले, "माझी अख्खी बस जाळण्यात आली, स्टेजवर नाटक सुरु असताना पन्नास-साठ काँग्रेसचे लोक येत होते आणि मला घेरत होते. हे सगळे अनुभव मला येत असताना रसिक प्रेक्षकांनी कधीच हाऊसफुलचा बोर्ड खाली उतरु दिला नाही. महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांना मानलं पाहिजे. 20 वर्षात 1100 प्रयोग झाले, पण आमचा एकही प्रयोग रद्द करण्यात आला नाही. चालू प्रयोगात स्टेजच्या चारही बाजूंनी लोक येऊन थांबायचे. पण मी घाबरलो नाही. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आमच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले. ते एकमेव राजकारणी व्यक्ती होते, जे आमच्या पाठिशी उभे राहिले."
शरद पोंक्षे यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओला कॅप्शन दिलं, "नथुराम गोडसे बोलतोय पुन्हा रंगभूमिवर ऑक्टोबरपासून फक्त 50 प्रयोग. तिकीट विक्री bookmyshow वर सुरू.लवकर आपल तिकीट बूक करा"
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
प्रदीप दळवी (Pradeep Dalvi) यांनी 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकाचं लेखन केलं आहे. . शरद पोंक्षे यांच्या 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकाच्या आगामी प्रयोगांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या: