Sangeet Devbabhali : 'संगीत देवबाभळी'चा कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या बी. ए. अभ्यासक्रमात समावेश
संगीत देवबाभळी (Sangeet Devbabhali) या नाटकाचा सामावेश आता कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या बी.ए. मराठी भाग 2 सत्र 3 च्या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे.
Sangeet Devbabhali : भद्रकाली प्रॉडक्शन्सच्या (Bhadrakali Production) संगीत देवबाभळी (Sangeet Devbabhali) या नाटकाचा सामावेश आता कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या बी.ए. मराठी भाग 2 सत्र 3 च्या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. रखुमाई आणि संत तुकाराम महाराजांची पत्नी आवली यांच्यातील संवाद प्रेक्षकांसमोर मांडणाऱ्या 'संगीत देवबाभळी' नाटकाचा शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी आता अभ्यास करणार आहेत.
भद्रकाली प्रॉडक्शन्सच्या इन्स्टाग्रामवर पेजवर एक खास पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये लिहिलं आहे, "भद्रकाली प्रॉडक्शन्स"च्या प्राजक्त देशमुख लिखित 'संगीत देवबाभळी' या मराठी रंगभूमीवरील माईलस्टोन नाटकाचा या वर्षीपासून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील बी.ए. मराठी भाग 2 सत्र 3 च्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. प्राजक्त देशमुख चे मनःपूर्वक अभिनंदन!" या पोस्टला कमेंट करुन अनेकांनी 'संगीत देवबाभळी' नाटकाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.
'संगीत देवबाभळी' या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन प्राजक्त देशमुखने केले आहे. तसेच या नाटकामध्ये शुभांगी सदावर्ते आणि मानसी जोशी यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. संगीत देवबाभळी या नाटकाचा समावेश मुंबई विद्यापीठीच्या बी.ए. अभ्यासक्रमाच्या मराठी विषयात देखील करण्यात आला होता.
View this post on Instagram
'संगीत देवबाभळी' या नाटकामध्ये तुकाराम महाराजांची पत्नी आवली यांची भूमिका शुभांगी सदावर्तेनं साकारली आहे. तर रखुमाई ही भूमिका मानसी जोशीनं साकारली आहे.
'संगीत देवबाभळी' या नाटकाच्या टीमनं एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी प्रसाद कांबळी म्हणाले , प्राजक्तने या नाटकाची संकल्पना मांडली. गद्य भाषेत असलं तरी सर्वसामान्यांच्या भाषेत असल्यानं त्यामुळे हे करायचंच असं फिक्स केलं. सुरुवातीच्या 70-80 प्रयोगाला खूप कमी प्रेक्षक संख्या लाभली. पण प्रयोग थांबवले नाहीत. त्यानंतर मात्र चांगला प्रतिसाद मिळत गेला. भद्रकालीच्या यशामध्ये हे नाटक माईल स्टोन ठरलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या