एक्स्प्लोर

Mahesh Tilekar : कौतुकास्पद! महेश टिळेकर देणार निराधार महिलेच्या डोक्यावर छप्पर

रंभा पवार यांना स्वखर्चाने घर बांधून देण्याचा निर्णय महेश टिळेकर (Mahesh Tilekar) आणि नितीन धिमधिमे यांनी घेतला आहे.

Pune : पुण्यातील (Pune) अप्पर इंदिरा नगरमधील ओटा वसाहतीत राहणाऱ्या 65 वर्षांच्या रंभा पवार यांच्यावर नियतीने बालपणापासूनच आघात केले. येणाऱ्या परिस्थितीला तोंड देत जगण्यासाठी असलेल्या संघर्षामुळे आता उतार वयात त्या हतबल झालेल्या आहेत. वयाच्या बाराव्या वर्षी एका अपघातात रंभा बाईंचा एक डोळा कायमचा निकामी झाला. घरच्या गरिबीमुळे काबाडकष्ट करत आई वडिलांनी त्यांचे लग्न लावून दिले. लग्नानंतर वर्षभरात पतीने त्यांना वाऱ्यावर सोडून देत दुसरे लग्न केले. एकट्या पडलेल्या रंभा पवार माहेरी आश्रयाला आल्या. आई वडिलांचा आणि भावाचा आधार मिळाला तरी दारोदार जाऊन जुने कपडे गोळा करून त्या बदली छोटी भांडी देण्याचा व्यवसाय करू लागल्या.एकेदिवशी डोक्यावर ओझं घेऊन ट्रेनमध्ये चढत असताना पाय घसरून त्या खाली पडल्या सुदैवानं जीव वाचला पण शरीराला गंभीर इजा झाल्यामुळे 3 वर्ष त्या चालू शकल्या नाहीत. त्यावेळी भावानं त्यांना खूप जपलं. 

काही दिवसांनी आई वडिलांचे निधन झाले आणि काही वर्षातच पाठोपाठ एकुलता एक हक्काचा आधार असणारा भाऊ पण जग सोडून गेला. आई वडिलांचं घर असलेल्या एका छोट्या खोलीत राहून पोटापाण्यासाठी बाहेर  साफसफाईचे काम रंभाबाई पवार करत असताना आजार उद्भवला. डायबेटिजमुळे शरीर साथ  देत नाही. शरीराप्रमाणे जुन्या मातीच्या घराच्या भिंतीही खचल्या आहेत. छपराचे लोखंडी  पत्रे गंजल्यामुळे पावसाळ्यात  त्यातून पडणाऱ्या पाण्यामुळे संपूर्ण खोलीत पाणी साठते. अशा अवस्थेत न झोपता रात्र त्या जागून काढतात. 

घर दुरुस्तीसाठी कराव्या लागणाऱ्या खर्चासाठी त्यांच्याकडे पैसा नाही. डोक्यावर नीट छप्पर नाही आता पुढं कसं होणार या चिंतेत असणाऱ्या रंभा बाई पवार यांना मराठी तारका प्रोडक्शनचे निर्माता, दिग्दर्शक महेश टिळेकर आणि त्यांचे मित्र वास्तू शिल्प डेव्हलपरचे नितीन धिमधिमे यांनी मदतीचा हात दिला आहे. रंभा बाई पवार या जेष्ठ महिलेची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या परिस्थीतीची माहिती घेऊन रंभाबाईंना स्वखर्चाने घर बांधून देण्याचा निर्णय महेश टिळेकर आणि नितीन धिमधिमे यांनी घेतला आहे.

हेही वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Uday Tikekar on Ashok Saraf Laxmikant Berde: 'अशोक मामा अन् लक्ष्मीकांत बेर्डे खूप सतवायचे, फायटिंग सीन करताना चिमटा...'; उदय टिकेकरांनी सांगितला सेटवरचा किस्सा
'अशोक मामा अन् लक्ष्मीकांत बेर्डे खूप सतवायचे, फायटिंग सीन करताना चिमटा...'; उदय टिकेकरांनी सांगितला सेटवरचा किस्सा
Shweta Keswani Supports Shahana Goswami: एकापेक्षा जास्त पुरुषांसोबत नातं असेल, तर त्यात अडचण काय? अभिनेत्रीचं ओपन रिलेशनशिप्सवर बेधडक वक्तव्य, म्हणाली...
एकापेक्षा जास्त पुरुषांसोबत नातं असेल, तर त्यात अडचण काय? अभिनेत्रीचं ओपन रिलेशनशिप्सवर बेधडक वक्तव्य, म्हणाली...
Govinda on Mother: अभिनय सोडला, टक्कल केलं अन् भुवया काढल्या; गोविंदाच्या आईनं असं का केलं? पती म्हणाला, 'तू खूप सुंदर आहेस पण...'
अभिनय सोडला, टक्कल केलं अन् भुवया काढल्या; गोविंदाच्या आईनं असं का केलं? पती म्हणाला, 'तू खूप सुंदर आहेस पण...'
Marathi Natak Aamne Samne Leena Bhagwat Mangesh Kadam: 'तिसऱ्यांदा मानधन वाढ...'; रोहन, केतकीच्या नाटकातून काढल्याच्या आरोपांवर निर्मात्यांनी मौन सोडलं, लीना भागवत म्हणाल्या...
'तिसऱ्यांदा मानधन वाढ...'; रोहन, केतकीच्या नाटकातून काढल्याच्या आरोपांवर निर्मात्यांनी मौन सोडलं, लीना भागवत म्हणाल्या...

व्हिडीओ

Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं
Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षची आज निवड नाहीच, महायुतीचे सर्व संचालक सभेसाठी अखेर गैरहजर, सभा तहकूब
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षची आज निवड नाहीच, महायुतीचे सर्व संचालक सभेसाठी अखेर गैरहजर, सभा तहकूब
Navnath Ban : शिवसेनेनं केसानं गळा कापला; भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार; नवनाथ बन यांनी पराभवाचं खापर शिवसेनेवर फोडलं; पुरावे दाखवत म्हणाले, 'धंगेकरांवर कारवाई....'
शिवसेनेनं केसानं गळा कापला; भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार; नवनाथ बन यांनी पराभवाचं खापर शिवसेनेवर फोडलं; पुरावे दाखवत म्हणाले, 'धंगेकरांवर कारवाई....'
Ravindra Dhangekar: शिवसेनेनं लपून पाठिंबा दिला नाही, ओपन पाठिंबा दिला, एकनाथ शिंदेंना पुन्हा नेतृत्व दिले पाहिजे; महायुतीच्या वादात रवींद्र धंगेकरांची थेट मागणी
शिवसेनेनं लपून पाठिंबा दिला नाही, ओपन पाठिंबा दिला, एकनाथ शिंदेंना पुन्हा नेतृत्व दिले पाहिजे; महायुतीच्या वादात रवींद्र धंगेकरांची थेट मागणी
Nagpur MLC Election Result 2026: नागपूरमध्ये 2 अंकाचा वापर करुन सुधाकर कोहळेंचा घातपात? जेन झी, जातीच्या फॅक्टरमुळे पदवीधरचा निकाल फिरला
नागपूरमध्ये 2 अंकाचा वापर करुन सुधाकर कोहळेंचा घातपात? जेन झी, जातीच्या फॅक्टरमुळे पदवीधरचा निकाल फिरला
Amravati Election 2026 Result: पराभव जिव्हारी लागला अन्...; अमरावतीतील शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारानं थेट काढली शिक्षकांची लायकी, म्हणाले ‘जशी लायकी तसा प्रतिनिधी, पैठणी अन् पैशांवर...'
पराभव जिव्हारी लागला अन्...; अमरावतीतील शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारानं थेट काढली शिक्षकांची लायकी, म्हणाले ‘जशी लायकी तसा प्रतिनिधी, पैठणी अन् पैशांवर...'
Gokul Election: 'गोकुळ अध्यक्ष निवडीसाठी सभेला यावं यासाठी काही संचालकांचे मत, पण...' साडेपाच लाख शेतकऱ्यांचा रोष हे 12 संचालक घेणार नाहीत; सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
'गोकुळ अध्यक्ष निवडीसाठी सभेला यावं यासाठी काही संचालकांचे मत, पण...' साडेपाच लाख शेतकऱ्यांचा रोष हे 12 संचालक घेणार नाहीत; सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
Pimpri Chinchwad Fire News: मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास फोन आला अन्....; पार्किंगमध्ये 17 दुचाकी अन् 4 चारचाकी भस्मसात, फायरमनने सांगितला घटनेचा थरार, पिंपरीत नेमकं काय घडलं?
मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास फोन आला अन्....; पार्किंगमध्ये 17 दुचाकी अन् 4 चारचाकी भस्मसात, फायरमनने सांगितला घटनेचा थरार, पिंपरीत नेमकं काय घडलं?
Pratap Sarnaik on Meenakshi Shinde: 'आरोप चुकीचे सिद्ध होईपर्यंत पदाचा राजीनामा...'; प्रताप सरनाईकांचं मिनाक्षी शिंदेंबाबत सूचक वक्तव्य, ठाण्यातील पत्रकार परिषदेत काय घडलं?
'आरोप चुकीचे सिद्ध होईपर्यंत पदाचा राजीनामा...'; प्रताप सरनाईकांचं मिनाक्षी शिंदेंबाबत सूचक वक्तव्य, ठाण्यातील पत्रकार परिषदेत काय घडलं?
Embed widget