Free Hit Danaka : 17 डिसेंबरला 'फ्री हिट दणका', फँड्रीतला 'जब्या' दिसणार प्रमुख भूमिकेत, सोबतीला सल्या अन् लंगड्याही
'फ्री हिट' दणका' हा सिनेमा 17 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.
Free Hit Danaka : मागील अनेक महिन्यांपासून रखडलेल्या प्रदर्शनाच्या तारखादेखील आता जाहीर होऊ लागल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे 'फ्री हिट' दणका' हा सिनेमा. या चित्रपटाचे नवीन पोस्टर आले आहे. पोस्टरच्या माध्यमातून हा सिनेमा 17 डिसेंबरला प्रदर्शित होणार
असल्याची माहिती देण्यात आली आहे. या चित्रपटाची निर्मिती एसजीएम फिल्मसने केली आहे. सुनील मगरे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. चित्रपटात फॅंड्री फेम सोमनाथ अवघडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर सैराट चित्रपटातील अरबाज (सल्या)
आणि तानाजी (लंगड्या) यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
'फ्री हिट' दणका' सिनेमाची कथा आणि पटकथा सुनील मगरे यांची आहे. तर लेखन आणि संवाद संजय नवगीरे यांचे आहेत. आकाश ठोंबरे, मेघनाथ सोरखडे आणि सुनील मगरे हे चित्रपटाचे निर्माते आहेत. प्रेमाच्या महिन्याचे औचित्य साधून या प्रेमकथा असलेल्या
'फ्री हिट' दणका' या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
22 ऑक्टोबरपासून सिने-नाट्यगृहे सुरू होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यानंतर अनेक सिने-निर्मात्यांनी त्यांच्या सिनेमाच्या तारख्या जाहीर केल्या आहेत. बॉलिवूडच्या जवळजवळ 22 सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. मराठीतीलदेखील बिग बजेट असणाऱ्या सिनेमांनी त्यांच्या प्रदर्शनाची तारिख जाहीर केली आहे. गेले अनेक दिवस सिनेमागृहे बंद असल्याने प्रेक्षक चांगल्या आशयाच्या, वैविध्यपूर्ण सादरीकरणाची वाट बघत होते.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सिनेमागृहे बंद होती. पण अनेक कलाकारंना त्यांच्या अभिनयावर, लेखकांना त्यांच्या लिखानावर, दिग्दर्शकांना उत्तम सादरीकरण बघून त्यावर मेहनत घेता आली. त्यामुळे आता येणाऱ्या दिवसांत प्रेक्षकांना उत्तम सादरीकरणाचा आस्वाद मिळणार आहे. सिनेमागृहे बंद असल्याने अनेक प्रेक्षक ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळले होते. तर कलाकारांनीदेखील ओटीटी प्लॅटफॉर्म अनुभवायला सुरूवात केली होती. 22 ऑक्टोबरपासून सिनेमागृहे सुरू होणार असल्याची बातमी आली आणि इतके महिने आतुरतेने वाट पाहणाऱ्या चित्रपटसृष्टी आणि चित्रपटप्रेमींमध्ये एक उत्साहाचे आणि सकारात्मक वातावरण निर्माण झाले. त्यानंतर येत्या काही दिवसांत अनेक कलाकार निर्मात्यांची भूमिका स्वीकारताना दिसून येतील.