एक्स्प्लोर

Carry On Spygiri : मराठी रंगभूमीवर ‘दाभोळकरी पॅटर्न’चा धमाका! ‘कॅरी ऑन स्पायगिरी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Carry On Spygiri Marathi Play : भरत दाभोळकर यांचे ‘कॅरी ऑन स्पायगिरी’ हे स्पाय-कॉमेडी नाटक मराठी रंगभूमीवर येणार असून मुंबई आणि पुण्यात एप्रिलमध्ये शुभारंभाचे प्रयोग होणार आहेत.

मुंबई : इंग्रजी, हिंदी आणि गुजराती रंगभूमीवर अनेक दशके अधिराज्य गाजवणारे प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि ‘अॅड गुरु’ भरत दाभोळकर आता प्रथमच मराठी रंगभूमीवर धडाकेबाज एंट्री करत आहेत. ‘सवाईगंधर्व’ निर्मित ‘कॅरी ऑन स्पायगिरी’ हे त्यांचे नवीन नाटक लवकरच रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नाटकात दाभोळकर लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता अशा तिहेरी भूमिकेत दिसणार आहेत.

मराठी रंगभूमीवर ‘स्पाय-कॉमेडी’सारखा वेगळा विषय घेऊन येत असलेले हे नाटक प्रेक्षकांसाठी एक अनोखा अनुभव ठरणार आहे. हलक्या-फुलक्या विनोदासोबतच साहस आणि सस्पेन्स यांचा मिलाफ या नाटकात पाहायला मिळणार आहे.

Marathi Theatre : इंग्रजीतील गाजलेलं नाटक आता मराठीत

भरत दाभोळकर यांनी यापूर्वी पु. ल. देशपांडे, वसंत कानेटकर आणि जयवंत दळवी यांसारख्या दिग्गजांची नाटकं इंग्रजीत सादर करून ती लोकप्रिय केली होती. आता ते स्वतःचं इंग्रजी नाटक मराठी प्रेक्षकांसाठी नव्या ढंगात सादर करत आहेत. याआधी या नाटकाच्या इंग्रजी आवृत्तीत विजू खोटे, किशोर प्रधान, अतुल परचुरे यांसारख्या कलाकारांनी काम केले होते.

Spy Comedy : 'मराठमोळं' कुटुंब पाकिस्तानात

या नाटकात मूळ कथानक कायम ठेवत मराठी प्रेक्षकांना साजेसं रूप दिलं आहे. गुजराती कुटुंबाऐवजी आता एक ‘मराठमोळं’ कुटुंब पाकिस्तानात पोहोचतं आणि तिथे घडणाऱ्या भन्नाट घटनांची मालिका प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहे. आधुनिक काळातील जागतिक घडामोडींची जाण आणि त्यातून उभा राहणारा विनोद हा या नाटकाचा गाभा आहे.

Carry On Spygiri Star Cast : दमदार कलाकारांची साथ

या नाटकासाठी निर्माता आकाश भडसावळे यांनी पुढाकार घेतला आहे. भरत दाभोळकर यांच्यासोबत ज्येष्ठ अभिनेते मोहन आझाद रंगमंचावर झळकणार आहेत. या जोडीमुळे नाटकाला अधिक रंगत येणार आहे.

OTT vs Theatre : प्रेक्षकांचा नाटकांकडे वाढता ओढा

भरत दाभोळकर यांच्या मते, ओटीटीवरील साचेबद्ध कंटेंट पाहून प्रेक्षक कंटाळले आहेत आणि त्यामुळे ते पुन्हा रंगभूमीकडे वळत आहेत. ‘कॅरी ऑन स्पायगिरी’सारखा हलका-फुलका आणि मनोरंजक विषय प्रेक्षकांसाठी ताजेतवाने अनुभव देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Show Details : मुंबई-पुण्यात शुभारंभाचे प्रयोग

या नाटकाचा पहिला प्रयोग 10 एप्रिल 2026 रोजी श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह येथे होणार आहे. त्यानंतर 18 एप्रिल 2026 रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे पुणेकरांना या नाटकाचा आस्वाद घेता येणार आहे. ‘कॅरी ऑन स्पायगिरी’ हे नाटक मराठी रंगभूमीवर एक वेगळा ट्रेंड निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त केला जात असून ‘दाभोळकरी पॅटर्न’ची ही नवी सुरुवात ठरणार आहे.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Prasad Oak On Dharamveer Movie: 'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Ashok Shinde On Alka Kubal: 'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पाणउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पाणउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
Satish Pulekar On Nana Patekar: नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget