एक्स्प्लोर

पुणेकर नाटकाला जाताय ना? ऋषिकेश जोशींच्या 'बोलविता धनी'ची एकच चर्चा; क्षितिज दातेसह 13 जणांची तगडी टीम

"कोणाच्याही खिजगणतीत नाही अशा जुन्या नाटकांच्या इतिहासातल्या एका महत्त्वाच्या प्रसंगावरती हे नाटक भाष्य करतं."

Bolavita Dhani Natak: प्रसिद्ध अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक हृषिकेश जोशी (Hrishikesh Joshi) यांच्या आगामी 'बोलविता धनी' या नाटकाची सध्या नाट्यवर्तुळात जोरदार चर्चा आहे. प्रवीण भोसले, भरत नारायणदास ठक्कर, समृद्धी तांबे, गंधाली कुलकर्णी आणि सुनंदा काळुसकर यांची निर्मिती असलेल्या 'बोलविता धनी'(Bolavita Dhani Natak) या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन स्वतः हृषिकेश जोशी यांनी केले आहे. या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारा अभिनेता क्षितीज दातेने नाटकातील आपल्या भूमिकेबद्दल आणि हृषिकेशसोबत काम करण्याच्या अनुभवाविषयी मनमोकळेपणाने संवाद साधला.

दोन काळात चालणारं नाटक 

क्षितिजने या नाटकात दोन अत्यंत वेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. तो सांगतो की, "या दोन्ही भूमिका एकमेकांपासून खूप वेगळ्या आहेत. त्यामुळे एकाच वेळी दोन वेगळी माणसं एकापाठोपाठ एक उभी करणं हे माझ्यासाठी थोडं आव्हानात्मक आहे. नाटक दोन काळांमध्ये चालत राहतं आणि नाटकाच्या नावाप्रमाणे 'बोलविता धनी' या शब्दाचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने नाटकात लागतो." क्षितिजच्या मते, ही संकल्पना कोणत्याही एका विशिष्ट क्षेत्रापुरती मर्यादित नसली तरी, "बोलविता धनी म्हणजे बोलणारा किंवा कृती करणारा एक असतो, पण पडद्यामागे राहून त्याला सूचना देणारा दुसराच कोणी असतो."

विशेष म्हणजे, गेल्या काही वर्षांत त्याने साकारलेल्या लोकमान्य टिळक, एकनाथ शिंदे यांसारख्या नेतृत्वादी व्यक्तिरेखांच्या तुलनेत या नाटकात त्याची भूमिका कनिष्ठ पदाची आहे, पण एक अभिनेता म्हणून हेच आव्हान अधिक रंजक असल्याचं तो मानतो. हृषिकेशसोबत काम करण्याच्या अनुभवावर बोलताना क्षितिज म्हणाला, "मला हृषिकेश जोशींचं लिखाण प्रचंड आवडतं. त्यांची 'नांदी', 'संयुक्त मानअपमान' ही सगळी नाटकं मी पाहिली आहेत. शिवाय आता सुरू असलेल्या 'मी व्हर्सेस मी' या नाटकातही आम्ही दोघं एकत्र काम करतोय. त्यामुळे जेव्हा त्याने मला या नाटकासाठी फोन केला, तेव्हा मी काहीही विचार न करता लगेच हो बोलून टाकलं. नाटक काय आहे, वाचन कधी आहे, असल्या कोणत्याही गोष्टीत मी पडलो नाही; त्याने विचारलं त्याच क्षणी मी हो बोललो."

पुण्यात नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग  

हृषिकेश यांच्या निवडक विनोदी शैलीमुळे हे नाटक सहकुटुंब पाहता येईल असं आहे. क्षितिज म्हणाला की, हृषिकेशचं हे कसब आहे की त्याने ही संपूर्ण टीम एकत्र आणली; त्याची कलाकार निवडीबाबतची पारख खूप चांगली आहे. या नाटकात विनोदाचं अंग खूप मोठं आहे. या नाटकात ओंकार कुलकर्णी, संग्राम साळवी, यांसारख्या कलाकारांसह एकूण 13 जण आहेत. महत्त्वाचे म्हणजे, "कोणाच्याही खिजगणतीत नाही अशा जुन्या नाटकांच्या इतिहासातल्या एका महत्त्वाच्या प्रसंगावरती हे नाटक भाष्य करतं."

क्षितिजला खात्री आहे की, 13 जणांना एकत्रित पाहण्याची जी मजा असते ती या नाटकात नक्कीच अनुभवायला मिळेल आणि 'बोलविता धनी' हे नाटक नाट्यरसिकांसाठी 100टक्के पर्वणी असेल यात काही शंका नाही. 'बोलविता धनी' नाटकाचा पुण्यातील शुभारंभाचा प्रयोग 13 डिसेंबर रोजी रात्री 9.30 वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. तर मुंबईतील शुभारंभाचा प्रयोग 24 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता दिनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले येथे होणार आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bhool Bhulaiyaa Marathi Natak: रंगभूमीवर अनोखा प्रयोग 'भुल भुलैय्या'; कुमार सोहोनी यांचं 125वं नाटक प्रेक्षकांच्या भेटीला
रंगभूमीवर अनोखा प्रयोग 'भुल भुलैय्या'; कुमार सोहोनी यांचं 125वं नाटक प्रेक्षकांच्या भेटीला
Pudhchya Shukrawari Saat Vaajta Marathi Play: सतीश राजवाडे-चैत्राली गुप्तेंचं रंगभूमीवर दमदार पुनरागमन; 'पुढच्या शुक्रवारी 7 वाजता'मधून झळकणार
सतीश राजवाडे-चैत्राली गुप्तेंचं रंगभूमीवर दमदार पुनरागमन; 'पुढच्या शुक्रवारी 7 वाजता'मधून झळकणार
Marathi Natak Shantecha Karta Chalu Aahe: लक्ष्मीकांत बेर्डे सर.. लक्ष असू द्या! खळखळून हसवणारं 'शांतेचं कार्ट' पुन्हा रंगभूमीवर; प्रियदर्शन जाधवची पोस्ट चर्चेत
लक्ष्मीकांत बेर्डे सर.. लक्ष असू द्या! खळखळून हसवणारं 'शांतेचं कार्ट' पुन्हा रंगभूमीवर; प्रियदर्शन जाधवची पोस्ट चर्चेत
Marathi Natak: 'या' गाजलेल्या नाटकातून खळखळून हसवणार हास्यजत्रेतला चिपळूणचा पारसमणी; पुजाऱ्याच्या अवतारात उडणार धमाल
'या' गाजलेल्या नाटकातून खळखळून हसवणार हास्यजत्रेतला चिपळूणचा पारसमणी; पुजाऱ्याच्या अवतारात उडणार धमाल

व्हिडीओ

Vidhan Parishad Election : विधान परिषदेत ठाकरेंवरुन आघाडी नाहीतर बिघाडी? Special Report
Nashik TCS Case Special Report : कॉर्पोरेट जिहाद प्रकरण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कनेक्शन?
Navneet Rana Vs Pyare Khan Special Report : अमरावती परतवाडा प्रकरण, राणा विरुद्ध खान वाद पेटला
Amravati Crime Special Report : विकृतीची परिसीमा गाठणारी पैज, परतवाडा प्रकरणात धक्कादायक खुलासे
Walmik Karad : देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Women's reservation Bill Shivsena Priyanka Chaturvedi: प्रियांका चतुर्वेदींनी ठाकरे गटाविरोधात पहिलं पाऊल टाकलं, महिला आरक्षण विधेयकाबाबत पक्षविरोधी भूमिका, स्पष्टच म्हणाल्या...
प्रियांका चतुर्वेदींनी ठाकरे गटाविरोधात पहिलं पाऊल टाकलं, महिला आरक्षण विधेयकाबाबत पक्षविरोधी भूमिका, स्पष्टच म्हणाल्या...
Puja Sawant on Ashok Kharat: प्राजक्ता माळीनंतर अशोक खरात प्रकरणी पूजा सावंतची प्रतिक्रिया चर्चेत; 'या सगळ्या भोंदूगिरीची .. '
प्राजक्ता माळीनंतर अशोक खरात प्रकरणी पूजा सावंतची प्रतिक्रिया चर्चेत; 'या सगळ्या भोंदूगिरीची .. '
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर; CM फडणवीस म्हणाले, उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू, एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर; CM फडणवीस म्हणाले, उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू, एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांनी लोकसभेत मांडली भूमिका
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांची लोकसभेत मांडली भूमिका
Amit Shah : महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर होताच अमित शाहांची पोस्ट, 2029 चा उल्लेख करत विरोधकांना इशारा, एक्सवर पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर होताच अमित शाहांची पोस्ट, 2029 चा उल्लेख करत विरोधकांना इशारा
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
Vidhanparishad Election 2026 Shivsena: मोठी बातमी: विधानपरिषद निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंचा पहिला उमेदवार ठरला, दुसऱ्या जागेवर धक्कातंत्राचा वापर करणार? ही 6 नावं रेसमध्ये
विधानपरिषद निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंचा पहिला उमेदवार ठरला, दुसऱ्या जागेवर धक्कातंत्राचा वापर करणार? ही 6 नावं रेसमध्ये
Rahul Gandhi : संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर होताच राहुल गांधी यांची प्रतिक्रिया
संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, राहुल गांधींची प्रतिक्रिया ; प्रियांका गांधी काय म्हणाल्या
Embed widget