एक्स्प्लोर

लॉकडाऊन नंतर मुंबईत प्रयोग करण्यासाठी नाटक कंपनी सज्ज

लॉकडाऊन नंतर प्रथमच नाटक कंपनीच्या 'आयटम' आणि 'महानिर्वण' या नाटकांचे प्रयोग मुंबईत पृथ्वी थिएटरला होणार आहेत.

मुंबई : शासनाने प्रयोग करण्यास मान्यता दिल्यानंतर हळूहळू अनेक नाटकांचे प्रयोग रंगभूमीवर सादर होऊ लागले आहेत. पुण्यातील नाटक कंपनी लॉकडाऊन नंतर प्रथमच मुंबईत प्रयोग करण्यास येत आहे. नाटक कंपनीच्या 'आयटम' आणि 'महानिर्वाण' अशा दोन नाटकांचे प्रयोग 8 व 9 एप्रिल रोजी संध्याकाळी सहा व नऊ वाजता पृथ्वी थिएटरला सादर होणार आहेत. पुण्यातील नाटक कंपनी ही गेली 12 वर्षे सातत्याने प्रायोगिक नाटक  करत आहे.

सतीश आळेकर लिखीत आणि दिग्दर्शित 'महानिर्वाण' हे नाटक भारतीय नाट्यसृष्टी मधील एक अद्वितीय कलाकुसरीचा नमुना आहे. गेली 40 वर्ष ह्या नाटकाचे प्रयोग भारतात आणि परदेशात सातत्याने होत आहेत. ह्या नाटकाचा पहिला प्रयोग 1974 साली राज्यनाट्य स्पर्धेत झाला आणि तेव्हापासून या नाटकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या नाटकाचे 400 हुन अधिक प्रायोगिक तत्वावर प्रयोग झाले आहेत. 10 भाषांमध्ये नाटकाचे भाषांतरदेखील झालेले आहे. या नाटकात कीर्तन हा भारतीय संगीत प्रकार वापरण्यात आला असून नाटक ब्लॅक कॉमेडीच्या ढंगाने भारतीय समाज, नातेसंबंध, माणसाच्या आंतरिक संघर्षावर भाष्य करते. नाटक कंपनीने 3 वर्षापूर्वी हे ऐतिहासिक नाटक पुनरुज्जीवित केले. नाटकाचे दिग्दर्शन स्वतः सतीश आळेकर यांनीच केले. 'महानिर्वाण' भारतीय समाज आणि संस्कृतीचे अवशेष आणि त्याची सोयीनुसार केली जाणारी अंमलबजावणी विनोदी पद्धतीने दर्शवते. नाटक सामाजिक रूढी आणि परंपरांकडे पाहण्याचा नवीन आणि आधुनिक दृष्टीकोन तयार करते. माणसाला 'माणूस' म्हणून समजून घेण्याचा प्रयत्न करते आणि ज्यामुळे माणूस घडत असतो, त्या परिस्थितीवर प्रशचिन्ह उपस्थित करते. या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन सतीश आळेकर यांनी केले असून, नाटकात नचिकेत देवस्थळी, सायली फाटक, सिद्धार्थ महाशब्दे, भक्तीप्रसाद देशमाने, मयुरेश्वर काळे, भूषण मेहेरे, निनाद गोरे, वरद साळवेकर, सौरभ शाळीग्राम व इतर नाटक कंपनीच्या कलाकारांच्या भूमिका आहेत. 

नाटक कंपनीची दुसरी प्रस्तुती सिद्धेश पूरकर लिखित, क्षितिश दाते दिग्दर्शित 'आयटम' हे नाटक आहे. बहुप्रतिष्ठित अशा मेटा थिएटर फेस्टिव्हल मध्ये  जिंकलेले ' आयटम' हे नाटक आहे. नाटक कंपनी कडून जयपूर, लखनऊ, दिल्ली, अहमदाबाद, कोलकाता येथे होणाऱ्या विविध मानाच्या फेस्टिव्हलमध्ये प्रयोग सादर करण्यात आले आहेत. तर मेटा थिएटर फेस्टिव्हलमध्ये उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार या नाटकात काम करणाऱ्या साईनाथ गणुवाड या अभिनेत्याने पटकावला आहे. 'आयटम' हा शब्द कानावर पडल्यावर आपल्या भारतीयांच्या मनात पहिले जो विचार येतो त्यावरच हे नाटक भाष्य करते. एरवी हा शब्द नमुना अथवा नग या अर्थाने वापरला जातो परंतु, आपल्या समाजात 'आयटम' हा शब्द मुलीच्या संदर्भातच वापरला जातो. भारतीय सिनेमा सृष्टीत, बी ग्रेड चित्रपट अशी एक कॅटेगरी आहे. त्या चित्रपटामध्ये लाइटिंग विभागात काम करणाऱ्या 'राकेश' या माणसाची कथा 'आयटम' या नाटकात उलगडत जाते. त्याच्या आयुष्यात आलेली 'सपना' ही मुलगी बी ग्रेड चित्रपटामध्ये कशी स्टार होते आणि पुरुषसत्ताक इनडस्ट्रीमध्ये सपनाची काय अवस्था होते, हे या नाटकात उपहासात्मक पद्धतीने दाखवले आहे. नाटकात दीप्ती महादेव, साईनाथ गणुवाड, निनाद गोरे, सिद्धार्थ महाशब्दे, अनुज देशपांडे, रुचिता भुजबळ, यश रुईकर, शुभम जिते यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर नाटक कंपनीचे इतर कलाकार देखील काम करतात.

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar ON VSR : अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश

व्हिडीओ

Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar ON VSR : अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पंढरपूरमध्ये अचानक बिघाड, 20 मिनिटं हेलिपॅडवर थांबल्यानंर शिंदेंनी मोठा निर्णय घेतला...
एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पंढरपूरमध्ये अचानक बिघाड, बॅटरी लो झाल्यानं दुसरं इंजिन सुरु होण्यास, अखेर शिंदेंचा मोठा निर्णय
EPFO: मोठी बातमी, पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, नव्या SWP ला मान्यता, ईपीएफओच्या CBT चा मोठा निर्णय
पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, ईपीएफओच्या CBT चा खातेदारांसाठी मोठा निर्णय
Gold rhenium powder: सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, वजन वाढवण्यासाठी वापरली जातेय ही चिनी गोल्ड पावडर, 22 कॅरेटचे सांगून खपवले जातायत 20 कॅरेटचे दागिने
सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, वजन वाढवण्यासाठी वापरली जातेय ही चिनी गोल्ड पावडर, 22 कॅरेटचे सांगून खपवले जातायत 20 कॅरेटचे दागिने
मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
Embed widget