अत्यंत भयानक! थिएटरमध्ये सुरू होता 'फायनल डेस्टिनेशन'चा शो, तेवढ्याच थिएटरचं सिलिंग कोसळलं अन्...
Final Destination Bloodlines Incident: 'फायनल डेस्टिनेशन: ब्लडलाइन्स'चा थिएटरमध्ये शो सुरू असतानाच अचानक अत्यंत भयानक घटना घडली. थिएटरचं सिलिंग कोसळून पंख्यावर पडलं. यामधये एका प्रेक्षकाला गंभीर दुखापत झालीय.

Final Destination Bloodlines Incident: 'फायनल डेस्टिनेशन: ब्लडलाइन्स' (Final Destination Bloodlines) या सुपरनॅचरल हॉरर चित्रपटानं (Supernatural Horror Movies) सध्या जगभरात धुमाकूळ घातला आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला असून सध्या तो बॉक्स ऑफिसवर (Box Office) खूप कमाई करतोय. दरम्यान, थिएटरमध्ये 'फायनल डेस्टिनेशन: ब्लडलाईन्स' पाहणाऱ्या एका चाहत्यासोबत एक अत्यंत दुःखद घटना घडली. खरंतर, थिएटरचं सिलिंग पंख्यावर कोसळलं.
ही अत्यंत भयावह घटना अर्जेंटिनाच्या ला प्लाटा येथील सिनेमा ओचो थिएटरमध्ये घडली. डेली मेलच्या वृत्तानुसार, 'फायनल डेस्टिनेशन: ब्लडलाइन्स'च्या स्क्रीनिंग दरम्यान, एका महिला प्रेक्षकावर सिलिंग कोसळलं आणि ती त्या मलब्याखाली अडकली. या अपघातात महिलेच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर महिलेला त्यानंतर जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
वाढदिवसाच्या दिवशी फिल्म पाहायला गेलेली महिला
खरंतर, फियामा विलावेर्डे नावाची एक महिला तिचा 29 वा वाढदिवस साजरा करतेय आणि अशा परिस्थितीत ती तिच्या 11 वर्षांच्या मुली आणि मैत्रिणींसोबत चित्रपट पाहण्यासाठी गेली होती, जिथे तिचा अपघात घडला. अपघातानंतर विलावेर्डे म्हणाली की, "आज माझा वाढदिवस होता, आम्ही फिरायला गेलेलो आणि थिएटरमध्ये फिल्म पाहायला पोहोचलो. तिकिटं आठवड्याच्या इतर दिवसांपेक्षा स्वस्त असल्यानं आम्ही फिल्म पाहाण्याचं ठरवलं, आम्ही आत गेलो, काही पॉपकॉर्न विकत घेतले आणि बसलो."
दुर्दैवी घटनेनंतर सोशल मीडिया युजर्सकडून टीका
आपल्यासोबत घडलेल्या दुर्दैवी घटनेबाबत बोलताना महिला म्हणाली की, "चित्रपट जवळजवळ संपला होता आणि नंतर एका मोठ्या आवाजानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. सुरुवातीला आम्हाला वाटलं की, हा चित्रपटाचा एक भाग आहे कारण चित्रपट पाहण्यात खूप मग्न होतो. पण मग एक मोठा तुकडा माझ्या अंगावर पडला. जेव्हा फियामा विलावेर्डेसोबत झालेल्या या अपघाताची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली, तेव्हा काही लोकांनी त्यावर दु:ख व्यक्त केलं, तर अनेकांनी त्याची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली. एका व्यक्तीनं गंमतीनं म्हटलंय की, "तो एक 5D एक्सपीरियंस असेल." आणखी एक युजर म्हणाला की, "रियल लाईफमध्ये फायनल डेस्टिनेशन..."
'फायनल डेस्टिनेशन: ब्लडलाईन्स'
दरम्यान, 'फायनल डेस्टिनेशन: ब्लडलाईन्स' बॉक्स ऑफिसवर धुवांधार कमाई करत आहेत. फिल्म रिलीज होऊन 11 दिवस उलटले आहेत आणि या फिल्मनं वर्ल्डवाईड 1310 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :





















