Raid 2 Box Office Collection Day 25: अजय देवगणच्या 'रेड 2'चा आणखी एक धमाकेदार रेकॉर्ड; 462 टक्के बजेट वसूल, 'छावा'शी बरोबरी करणार?
Raid 2 Box Office Collection Day 25: 'रेड 2'सोबतच सध्या बॉक्स ऑफिसवर हॉलिवूड सुपरस्टार टॉम क्रूझचा 'मिशन इम्पॉसिबल 8' आणि 'फायनल डेस्टिनेशन' हे सिनेमे आहेत.

Raid 2 Box Office Collection Day 25: अजय देवगणचा (Ajay Devgn) 'रेड 2' (Raid 2) हा चित्रपट प्रदर्शित होऊन 25 दिवस उलटून गेलेत, तरीसुद्धा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) कोट्यवधींची कमाई करत आहे. या चित्रपटासोबत 'हिट 3' आणि 'रेट्रो'सारखे मोठे दक्षिणेकडील चित्रपट प्रदर्शित झालेत. याआधी 'केसरी 2' सारखा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) आला होता. असं असूनही, 'रेड 2' या स्पर्धेत सर्वांसमोर पुरुन उरला, आणि 2025 मधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड चित्रपट ठरला.
बॉक्स ऑफिसवर चित्रपट अजूनही धुवांधार कमाई करत आहे. विशेष बाब म्हणजे, 'रेड 2'सोबतच सध्या बॉक्स ऑफिसवर हॉलिवूड सुपरस्टार टॉम क्रूझचा 'मिशन इम्पॉसिबल 8' आणि 'फायनल डेस्टिनेशन' हे सिनेमे आहेत. मात्र, याचा 'रेड 2' सारख्या सिनेमांवर जराही परिणाम झाल्याचं पाहायला मिळत नाही. आज चित्रपटाच्या कमाईशी संबंधित सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत. अशातच, चित्रपटानं आतापर्यंत किती कमाई केली? हे सविस्तर जाणून घेऊयात...
View this post on Instagram
'रेड 2'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन
ऑफिशियल आकडेवारीनुसार, अजय देवगणच्या 'रेड 2'नं 22 दिवसांमध्ये 161.79 कोटी रुपये कमावले आहेत. तर, 23व्या दिवशी फिल्मची कमाई घटून 1 कोटींवर पोहोचली आहे. पण, 24व्या दिवशी फिल्मनं पुन्हा मोठी झेप घेतली आणि 1.85 कोटी रुपये कमावले, 24 दिवसांत 164.64 कोटी रुपये जमा केले.
रविवारी 10.10 वाजेपर्यंत फिल्मनं 2.4 कोटी रुपयांची कमाई केली असून आतापर्यंत एकूण कमाई 167.04 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं आहे. हे आकडे अंतिम नाहीत. यामध्ये बदल होऊ शकतात.
'रेड 2'चं वर्ल्डवाईड कलेक्शन किती?
राजकुमार गुप्ता दिग्दर्शित, 2018 च्या सुपरहिट चित्रपट 'रेड'चा हा सिक्वेल अजय देवगण, रितेश देशमुख आणि अमित सियाल सारख्या कलाकारांसह बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा जादू निर्माण करत आहे. हा चित्रपट 48 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे.
'रेड 2' च्या जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, सॅकॅनिल्कच्या मते, त्याने 24 दिवसांत 220.50 कोटी रुपये कमावले आहेत. याचा अर्थ चित्रपटानं त्याच्या बजेटच्या सुमारे 462 टक्के कमाई केली आहे. 'मिशन इम्पॉसिबल' आणि 'फायनल डेस्टिनेशन' तसेच नुकताच प्रदर्शित झालेला 'भूल चुक माफ' या चित्रपटांच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट अजूनही चित्रपटगृहांमध्ये कमाईचा वेग कायम ठेवत आहे.
























