बहुप्रतिक्षीत 'गंगूबाई काठियावाडी' आणि 'RRR' मुहूर्त ठरला
आलिया भटचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'गंगुबाई काठियावाडी’ आणि राजामोली निर्देशित मल्टी स्टारर ' RRR' सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे.
![बहुप्रतिक्षीत 'गंगूबाई काठियावाडी' आणि 'RRR' मुहूर्त ठरला The much awaited Alia Bhatt's 'Gangubai Kathiawadi' and 'RRR' film released date annonced बहुप्रतिक्षीत 'गंगूबाई काठियावाडी' आणि 'RRR' मुहूर्त ठरला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/02/22747b96e33e51e2abc2928a3fd0ed58_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : महाराष्ट्रात सिनेगृह खुले करण्याची घोषणा होताच अनेक बहुप्रतिक्षीत सिनेमांच्या रिलीज डेट जाहीर करण्यात आल्या आहेत. आलिया भटचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'गंगुबाई काठियावाडी’ आणि राजामोली निर्देशित मल्टी स्टारर ' RRR' सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे.
'गंगुबाई काठियावाडी 6 जानेवारी आणि RRR 7 जानेवारी हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट प्रसिद्ध लेखक हुसेन जैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित सांगितला जात आहे.
View this post on Instagram
बाहुबली फेम दिग्दर्शक एसएस राजामौली RRR सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. सीताच्या भूमिकेतील आलियाचा लूक साधा असला तरी चाहत्यांना भूरळ पाडणारा आहे. RRR सिनेमात आलियासोबत ज्युनियर एनटीआर, अजय देवगन आणि राम चरण देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा एक पिरियड ड्रामा सिनेमा आहे, ज्यात सर्व कलाकार एकाच वेळी स्क्रीनवर दिसतील. हा सिनेमा दोन महान भारतीय स्वातंत्र्य सेनानी अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम यांच्या जीवनावर आधारित आहे. अल्लुरी सीताराम यांच्या भूमिकेत राम चरण तर कोमाराम यांच्या भूमिकेत ज्युनियर एनटीआर दिसणार आहेत. हा सिनेमा जवळपास 10 भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. येत्या 13 ऑक्टोबर 2021 रोजी सिनेमा रिलीज होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)