एक्स्प्लोर

Telly Masala : 'स्कॅम 2010' वेब सीरिजची घोषणा ते भूषण कडूने सांगितले 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडण्याचे धक्कादायक कारण; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या

Telly Masala : जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या....

Telly Masala :  मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या = मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Scam 2010 Hansal Mehta : 'स्कॅम' सीरिजचा तिसरा भाग येणार, हंसल मेहता सांगणार 25 हजार कोटींच्या घोटाळ्याची गोष्ट

Scam 2010 Hansal Mehta :   'स्कॅम 1992' (Scam 1992) आणि 'स्कॅम 2003' (Scam 2003) या धमाकेदार वेब सीरिजनंतर आता दिग्दर्शक हंसल मेहता (Hansal Mehta) आणखी एका घोटाळ्याची गोष्ट प्रेक्षकांसमोर आणणार आहे. 2010 मध्ये उघडकीस आलेला हा घोटाळा 25 हजार कोटींचा घोटाळा होता. हंसल मेहता या वेब सीरिजमध्ये सहाराचे सुब्रत रॉय (Subrata Roy) यांच्या घोटाळ्यावर भाष्य करणार आहे. सुब्रत रॉय यांचे काही महिन्यांपूर्वीच दीर्घ आजाराने निधन झाले होते. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

 

Gaurav More : आज माकड केलाय, उद्या गांडुळ करतील; 'मॅडनेस मचाऐंगे' व्हिडीओवर गौरव मोरेवर नेटकऱ्यांची टीका

Gaurav More :  'फिल्डरपाड्याचा बच्चन' म्हणून ओळख असलेला छोट्या पडद्यावरील विनोदवीर गौरव मोरे (Gaurav More) याने काही दिवसांपूर्वीच  'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या कॉमेडी शो सोडत असल्याची घोषणा केली होती. गौरव मोरे हा सध्या सोनी वाहिनीवरील 'मॅडनेस मचाऐंगे' या कॉमेडी शोवर झळकत आहे. हिंदीच्या मंचावरही गौरव मोरे आपल्या अभिनयाचे नाणे खणखणीत वाजवत आहे. मात्र, नेटकऱ्यांनी गौरवच्या एका व्हिडीओवर नाराजी व्यक्त करत टीका केली आहे. हिंदीवाल्यांनी तुला माकड केले असल्याचे युजर्सने म्हटले आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

 

Prashant Damle Damodar Natyagruha : अभिनेते प्रशांत दामले यांचा उपोषणाचा इशारा, 100 वर्ष जुने नाट्यगृह वाचवण्यासाठी कलाकार रस्त्यावर उतरणार

Prashant Damle On Damodar Natyagruha :    मुंबईतील 100 वर्षांचा इतिहास असलेले नाट्यगृह वाचवण्यासाठी आता रंगकर्मी सरसावले आहेत. परळसारख्या मराठमोळ्या भागात असलेले दामोदर नाट्यगृह वाचवण्यासाठी आता अभिनेते-निर्माते आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले (Prashant Damle) यांनी कलाकारांसह उपोषणाचा इशारा दिला आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

 

Marathi Serial Updates Sara Kahi Tichyasathi : 'सारं काही तिच्यासाठी' मध्ये मोठा ट्विस्ट; ओवीवर कोणी हल्ला केला, याचं कोडं उलगडणार


Marathi Serial Updates Sara Kahi Tichyasathi : छोट्या पडद्यावर सध्या टीआरपीसाठी चांगलीच चढाओढ सुरू आहे. टीव्हीवर सुरू असलेल्या काही मालिकांच्या कथानकांमध्ये वळणं येत आहेत. मालिकेतील ट्विस्टमुळे प्रेक्षकांना खिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. 'झी मराठी'वरील 'सारं काही तिच्यासाठी' (Sara Kahi Tichyasathi) या मालिकेतही मागील काही एपिसोडपासून कथानकात ट्वीस्ट आले आहेत. आता आणखी एक नवा ट्वीस्ट येणार आहे. ओवीवर प्राणघातक हल्ला कोणी केला हे आता प्रेक्षकांसमोर येणार आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

 

Bhushan Kadu Maharashtrachi Hasyajatra :  सेटवर धमकी देणारे यायचे...पाठीमागे उलटसुलट चर्चा; भूषण कडूने सांगितले हास्यजत्रा सोडण्याचे कारण

Bhushan Kadu Maharashtrachi Hasyajatra :  मराठी रंगभूमी, छोटा पडदा आणि रुपेरी पडद्यावर आपल्या विनोदी अभिनयाने छाप सोडणार अभिनेता भूषण कडू (Bhushan Kadu) मागील काही काळापासून मनोरंजन क्षेत्रापासून दूर आहे. कोरोना काळात ओढावलेल्या संकटानंतर भूषण काहीसा खचला होता. आता मात्र, त्याने पुन्हा एकदा उभारी घेण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले आहेत. 'कॉमेडी एक्स्प्रेस'मुळे भूषण हा घराघरात पोहचला होता. त्यानंतर  त्याने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये (Maharashtrachi Hasyajatra) धमाल उडवली होती. प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या या अभिनेत्यावर मात्र नियतीने एकापाठोपाठ एक संकटांची मालिका सुरू केली. भूषणने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शो का सोडला याचे कारण सांगितले आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

 

Tanvi Azmi : महाराष्ट्रीयन ब्राम्हण मुलीचं मुस्लिम मुलाशी लग्न, संपूर्ण समाजाचा विरोध पण..., अभिनेत्री तन्वी आझमींनी सांगितला लग्नानंतरचा अनुभव

Tanvi Azmi : 'बाजीराव मस्तानी', 'लय भारी' यांसारख्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या अभिनेत्री तन्वी आझमी (Tanvi Azmi) या सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्रींच्या यादीत येतात. आतापर्यंत अनेक सिनेमे, नाटकं, वेब सिरिज यांसारख्या माध्यमातून तन्वी यांनी प्रेक्षकांची मनं जिंकलीत. कायम वेगळ्या आशयाच्या भूमिका आणि कसोशीचा अभिनय यामुळे त्या कायमच चर्चेत राहिल्या होत्या. तसेच तन्वी आझमी या मुळच्या महाराष्ट्रीयन आहेत, पण त्यांनी लग्न वेगळ्या धर्मात केलं आहे. यामुळे तन्वी आझमी यांना बऱ्याच रोषाला सामोरं जावं लागलं होतं. तन्वी आझमी यांनी सिनेमॅटोग्राफर बाबा आझमीसोबत लग्न केले आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitesh Rane: आमचं वैयक्तिक आयुष्यही असतं, व्यवसायासाठी घरात पैशांची उलाढाल असेल तर गैर काय? नितेश राणेंच्या स्टिंग ऑपरेनशवर बंधू नितेश राणेंचा प्रतिसवाल
आमचं वैयक्तिक आयुष्यही असतं, व्यवसायासाठी घरात पैशांची उलाढाल असेल तर गैर काय? नितेश राणेंच्या स्टिंग ऑपरेनशवर बंधू नितेश राणेंचा प्रतिसवाल
WPL 2026 Auction: वनडे वर्ल्ड कपध्ये दमदार कामगिरीचा फायदा, डीएसपी दीप्ती शर्मावर सर्वाधिक बोली, UP किती कोटी मोजले?
DSP दीप्ती शर्मावर सर्वाधिक बोली, उत्तर प्रदेशनं RTM कार्ड वापरलं, कोट्यवधी रुपये मोजले
'आम्ही चांगलं क्रिकेट खेळलो नाही...' दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका गमावल्यानंतर रिषभ पंतनं मागितली माफी, पोस्ट शेअर
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीत मालिकेत पराभव, रिषभ पंतनं चाहत्यांची माफी मागितली, पोस्ट शेअर करत म्हणाला...
Credit Score : कर्जदारांसाठी गुड न्यूज, आता दर आठवड्याला क्रेडिट स्कोअर अपडेट होणार, आरबीआयच्या नव्या नियमामुळं फायदा होणार
कर्जदारांसाठी गुड न्यूज, दर आठवड्याला क्रेडिट स्कोअर अपडेट होणार, आरबीआय नवा नियम लागू करणार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nilesh Rane : गरिबांविरोधात असा पैसा वापरत असेल तर जिंकणार कसे? निलेश राणे 'एबीपी माझा'वर
Sachin Gujar : Ahilyanagar काँग्रेस जिल्हाध्यक्षांच अपहरण? बेदम मारहाण करुन रस्त्यावर दिलं सोडून
India Vs South Africa टीम इंडियाचा कसोटीतील मोठा पराभव, द. अफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाचं काय चुकलं?
Ujjwala Thitte News : आम्ही हायकोर्टात धाव घेऊ, तिथे ही अपयश आलं तर सर्वोच न्यायालयात जाऊ!
Nagpur Road ABP Majha Impact : एबीपी माझा'च्या बातमीनंतर नागपूर रस्त्यासाठी सरकारकडून 80 कोटींचा निधी मंजूर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitesh Rane: आमचं वैयक्तिक आयुष्यही असतं, व्यवसायासाठी घरात पैशांची उलाढाल असेल तर गैर काय? नितेश राणेंच्या स्टिंग ऑपरेनशवर बंधू नितेश राणेंचा प्रतिसवाल
आमचं वैयक्तिक आयुष्यही असतं, व्यवसायासाठी घरात पैशांची उलाढाल असेल तर गैर काय? नितेश राणेंच्या स्टिंग ऑपरेनशवर बंधू नितेश राणेंचा प्रतिसवाल
WPL 2026 Auction: वनडे वर्ल्ड कपध्ये दमदार कामगिरीचा फायदा, डीएसपी दीप्ती शर्मावर सर्वाधिक बोली, UP किती कोटी मोजले?
DSP दीप्ती शर्मावर सर्वाधिक बोली, उत्तर प्रदेशनं RTM कार्ड वापरलं, कोट्यवधी रुपये मोजले
'आम्ही चांगलं क्रिकेट खेळलो नाही...' दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका गमावल्यानंतर रिषभ पंतनं मागितली माफी, पोस्ट शेअर
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीत मालिकेत पराभव, रिषभ पंतनं चाहत्यांची माफी मागितली, पोस्ट शेअर करत म्हणाला...
Credit Score : कर्जदारांसाठी गुड न्यूज, आता दर आठवड्याला क्रेडिट स्कोअर अपडेट होणार, आरबीआयच्या नव्या नियमामुळं फायदा होणार
कर्जदारांसाठी गुड न्यूज, दर आठवड्याला क्रेडिट स्कोअर अपडेट होणार, आरबीआय नवा नियम लागू करणार
Pune Crime News: पुण्यातील आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरच्या खात्यात तब्बल इतके कोटी; पोलिसांनी सांगून टाकला आकडा, कुठून आले पैसे?
पुण्यातील आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरच्या खात्यात तब्बल इतके कोटी; पोलिसांनी सांगून टाकला आकडा, कुठून आले पैसे?
Pune Crime News: फॉर्च्युनरमध्ये व्यवसायिकाचा काटा काढला; पुण्यातील माजी नगरसेवकाचं कनेक्शन समोर आलं, ताम्हिणी घाटात काय घडलं?
फॉर्च्युनरमध्ये व्यवसायिकाचा काटा काढला; पुण्यातील माजी नगरसेवकाचं कनेक्शन समोर आलं, ताम्हिणी घाटात काय घडलं?
‘महावतार नरसिंह’ची ऑस्करच्या रेसमध्ये बाजी; भगवान विष्णूंच्या अवताराची पौराणिक कथा करणार का 5 सिनेमांवर मात?
‘महावतार नरसिंह’ची ऑस्करच्या रेसमध्ये बाजी; भगवान विष्णूंच्या अवताराची पौराणिक कथा करणार का 5 सिनेमांवर मात?
खेळताना ट्रॅक्टरवर चढला, चुकून गिअर पडला अन् क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; बार्शीत 4 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू
खेळताना ट्रॅक्टरवर चढला, चुकून गिअर पडला अन् क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; बार्शीत 4 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू
Embed widget