एक्स्प्लोर

Marathi Serial Updates Sara Kahi Tichyasathi : 'सारं काही तिच्यासाठी' मध्ये मोठा ट्विस्ट; ओवीवर कोणी हल्ला केला, याचं कोडं उलगडणार

Marathi Serial Updates Sara Kahi Tichyasathi : 'झी मराठी'वरील 'सारं काही तिच्यासाठी' या मालिकेतही मागील काही एपिसोडपासून कथानकात ट्वीस्ट आले आहेत. आता आणखी एक नवा ट्वीस्ट येणार आहे.

Marathi Serial Updates Sara Kahi Tichyasathi : छोट्या पडद्यावर सध्या टीआरपीसाठी चांगलीच चढाओढ सुरू आहे. टीव्हीवर सुरू असलेल्या काही मालिकांच्या कथानकांमध्ये वळणं येत आहेत. मालिकेतील ट्विस्टमुळे प्रेक्षकांना खिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. 'झी मराठी'वरील 'सारं काही तिच्यासाठी' (Sara Kahi Tichyasathi) या मालिकेतही मागील काही एपिसोडपासून कथानकात ट्वीस्ट आले आहेत. आता आणखी एक नवा ट्वीस्ट येणार आहे. ओवीवर प्राणघातक हल्ला कोणी केला हे आता प्रेक्षकांसमोर येणार आहे.

'सारं काही तिच्यासाठी' मालिकेत काही दिवसांपूर्वी निशी आणि ओवी यांची लूटमार करण्याच्या हेतूने काही गुंड हल्ला करतात. यामध्ये निशीला वाचवताना ओवी गंभीर जखमी होते. ओवीवर रुग्णालयात उपचार सुरू असताना भावनाविवश झालेला श्रीनिवास तिच्यावर असलेल्या प्रेमाची कबुली देतो. त्यातून  खोत कुटुंबात छोटसं वादळ आलंय. निशीचा जीव वाचवल्याबद्दल ओवीबद्दल खोत कुटुंबीयांमध्ये तिच्याबद्दल सहानुभूती आहे. तिच्यावर विविध कारणांनी असलेला राग निवळला आहे. ओवी-श्रीनूच्या लव्ह स्टोरीचा प्लॉट सुरू असताना आता दुसरीकडे मोठा ट्वीस्ट मालिकेत येणार आहे. 

ओवी-निशीवर झालेल्या हल्ल्यामागे कोणाचा कट होता का याची चर्चा प्रेक्षकांमध्ये होती. काहींना हा हल्ला खरंच चोरांनी केला असे वाटत होते. तर काहींनी मेघना आणि चारूवर संशय व्यक्त केला होता.

ओवी-निशीवर कोणी केला हल्ला?

'सारं काही तिच्यासाठी' मालिकेत निशी आपल्या नवीन आयुष्यात रमायचा प्रयत्न करतेय. पण, त्यात आता दुसरीकडे ओवीच्या हल्ल्यामागे मेघना असल्याचे समोर येणार आहे. तो हल्ला निशीवर करायचा होता. पण, ओवीमध्ये आल्याने ती जखमी झाली. 

'सारं काही तिच्यासाठी' मालिकेत आता  मेघनाचा चांगुलपणाचा रंग उतरणार आहे. निशीने काही ही केले तरी मी तिला मनापासून कधीच सून  म्हणून स्विकारणार नसल्याचे मेघनाने ठरवले आहे. फक्त नीरजच्या हट्टापोटी मेघनाने हे लग्न करून दिले आहे. निशीच्या गृहप्रवेशापासून तिच्यावर संकटाची मालिका सुरू झालेली आहे. या सगळ्यामागे मेघनाचा हात असल्याचे समोर येणार आहे.  मुंबईला जाण्याआधी ही मेघनाने निशीचा काटा काढण्याची पूर्ण तयारी केली  पण  ओवीमुळे तिचा कट फसला. 

View this post on Instagram
 
A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

मेघना टाकणार पुढचा डाव... 

मेघना आता निशीविरोधातील राहिलेले हे अर्धवट  काम पूर्ण करणार आहे. नीरज परत येईपर्यंत ती निशीची घरातून आणि नीरजच्या आयुष्यातून बाहेर काढण्याचा पूर्ण प्रयत्नात असणार आहे. ज्याची सुरुवात  मेघनाने  हुशारीने सुरु केली आहे. निशी ओवीची काळजी घ्यायला जास्तीत जास्त वेळ  खोत घरात असते ज्याचा राग मेघनाला आहे. त्यातून आता मेघना पुढचा डाव टाकणार आहे. निशीला नीरजच्या आयुष्यातून बाहेर काढण्यात मेघना यशस्वी होईल का, नीरजला आपल्या आईचं खरं स्वरुप कळेल  का,  निशीच्या जीवाला काही धोका निर्माण होईल का? हे लवकरच प्रेक्षकांना आगामी काही एपिसोडमध्ये समजणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : ना पवार - ना ठाकरे...फडणवीसांच्या रडारवर जयंतराव; स्फोटक भाषणAjit Pawar Full Speech Igatpuri : वक्फ बोर्डावरु उद्धव ठाकरेंना टोला,अजित पवार गरजले-बरसलेAmit Shah Bag Check : अमित शाहांनाही रोखलं,निवडणूक पथकाने तपासली एक-एक बॅग!CM Eknath Shinde Nanded Speech : एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो..नांदेडच्या सभेत शिंदेंचं तुफान भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Embed widget