एक्स्प्लोर

Telly Masala :  मुंज्याचा ट्रेलर राज ठाकरेंनी पाहिला अन् कौतुकाचा फोन केला ते अक्षय कुमारमुळे रितेश देशमुखच्या भावाच्या सासऱ्याचं दिवाळं;जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या

Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Aditya Sarpotdar : मुंज्याचा ट्रेलर राज ठाकरेंनी पाहिला अन् कौतुकाचा फोन केला; आदित्य सरपोतदारने सांगितला किस्सा 

  'मुंज्या' (Munjya) या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर सध्या बरीच हवा पाहायला मिळतेय. अवघ्या 16 दिवसांत या सिनेमाने 80 कोटींचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे आदित्य सरपोतदारचा (Aditya Sarpotdar) हा सिनेमा लवकरच 100 कोटींच्या घरात प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जातंय. कोणाताही गाजावाजा न करता, फक्त दोन आठवड्यात प्रमोशन करुन मुंज्याने ही घोडदौड केलीये. इतकंच नव्हे तर मुंज्याचा ट्रेलर पाहून राज ठाकरेंनी (Raj Thackeray) देखील आदित्यला फोन केला होता. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये हा किस्सा सांगितला आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Vashu Bhagnani Akshay Kumar : अक्षय कुमारमुळे रितेश देशमुखच्या भावाच्या सासऱ्याचं दिवाळं; 250 कोटींचं कर्ज, ऑफिसही विकलं गेलं

बॉलिवूडमध्ये कधीकाळी आपल्या बळावर सुपरहिट चित्रपटांचा धडाका लावलेला अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याचे चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवत नाही. मागील काही वर्षांपासून अक्षय कुमारचे चित्रपट बॅक टू बॅक फ्लॉप होत आहेत. या फ्लॉप चित्रपटांमुळे निर्मात्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. याच फ्लॉप चित्रपटांमुळे  बॉलिवूडचे नावाजलेले दिग्गज निर्माते वासू भगनानी (Vashu Bhagnani) यांचे दिवाळं निघाले असल्याची चर्चा सुरू आहे. अक्षय कुमार, टायगर श्रॉफची मुख्य भूमिका असलेली 'बडे मियाँ, छोटे मियाँ' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर डिझास्टर ठरल्याने भगनानी यांना मोठं आर्थिक नुकसान झाले आहे. या चित्रपटामुळे आपल्यावरील कर्जे उतरतील असा विश्वास वासू भगनानी यांना होता.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Shweta Tiwari :  श्वेता तिवारीने दिली गुड न्यूज, म्हणाली,'' मी आता आणखी प्रतीक्षा नाही करू शकत.''

Shweta Tiwari :  छोट्या पडद्यावरील  'क्वीन' अशी ओळख असलेली अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) तिच्या फिटनेस आणि सौंदर्यामुळे  नेहमीच चर्चेत असते. श्वेता तिवारीच्या सौंदर्यावर भाळणारे अनेक चाहते आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून श्वेता चाहत्यांच्या संपर्कात असते. आता, श्वेताने आपल्या चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे.  इन्स्टाग्राम अकाउंटवरून तिने आपल्या चाहत्यांना गुड न्यूज देताना आता आपण आणखी प्रतीक्षा करू शकत नसल्याचेही म्हटले आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Shatrughna Sinha : आधी नकार पण लेकीची पाठवणी करताना भावनिक साद, सोनाक्षीच्या लग्नानंतर शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, प्रत्येक बापासाठी... 

अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला सोनाक्षी (Sonakshi Sinha) आणि झहीरचा (Zaheer Iqbal) लग्नसोहळा अखेर पार पडला. वांद्रे येथे त्यांनी रजिस्टर लग्न करत नव्या नात्याची सुरुवात केली. पण सुरुवातीला सोनाक्षीच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध असल्याचं बातम्या वारंवार समोर येत होत्या. त्यातच शत्रुघ्न सिन्हा (Shatrughna Sinha) यांच्या प्रतिक्रियेमुळे वारंवार भुवया उंचावल्या जात होत्या. पण शेवट गोड म्हणत अखेर हे जोडपं लग्नबंधनात अडकलं आणि त्यांनी नव्या नात्याची सुरुवात केली. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Mujya OTT Release : मुन्नीच्या शोधात 'मुंज्या' तुमच्या घरी येणार; थिएटरनंतर आता ओटीटीवर होणार रिलीज

 सध्या बॉक्स ऑफिसवर अॅक्शनपटाऐवजी हॉररपटाची चलती आहे. स्त्री, शैतान नंतर 'मुंज्या'ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 'मुंज्या' (Munjya) रिलीज होऊन दोन आठवडे झाले असून दोन्ही आठवड्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटाने आता तिसऱ्या आठवड्यात प्रवेश केला असून बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. 'मुंज्या' बॉक्स ऑफिसवर कमाई करत असताना दुसरीकडे चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे. ओटीटी रिलीजबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Kiran Mane : देश चालवणं म्हणजे फक्त मंदिर बांधणं नाही, जमत नसेल तर सरळ राजीनामा देऊन हिमालयात जा; किरण मानेंचा संताप

नीट वादात उडी घेत किरण माने (Kiran Mane) यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. मागील अनेक दिवसांपासून देशात वैद्यकीय प्रवेश परीक्षा म्हणजे नीटच्या परीक्षेवरुन सावळा गोंधळ सुरु आहे. आधी पेपरफुटी आणि त्यानंतर अचानक रद्द केलेली पीजी परीक्षा, यामुळे विद्यार्थी आणि पालक वर्गातून मोठा संताप व्यक्त केला जातोय. त्यावर आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी देखील पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. तसेच राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी देखील या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. त्यातच आता किरण माने यांनी देखील पोस्ट करत केंद्र सरकारला काही सवाल केले आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींचा वार, मोदींचा पलटवार; लोकसभेत काय घडलं?Who Is Bhole Baba : गुप्तचर विभागामधील नोकरी सोडून थ्री-पीस सूटमध्ये प्रवचन देणारे भोले बाबा?Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP  MajhaJob Majha : इंडियन बँकमध्ये 102 जागांसाठी भरती; विविध पदांसाठी सुवर्ण संधी 02 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र  विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
Embed widget