Aditya Sarpotdar : मुंज्याचा ट्रेलर राज ठाकरेंनी पाहिला अन् कौतुकाचा फोन केला; आदित्य सरपोतदारने सांगितला किस्सा
Aditya Sarpotdar : सध्या बॉक्स ऑफिसवर गाजत असलेल्या आदित्य सरपोतदारच्या मुंज्याचं राज ठाकरेंनी देखील फोन करुन कौतुक केलं, तो अनुभव आदित्यने सांगितला.
![Aditya Sarpotdar : मुंज्याचा ट्रेलर राज ठाकरेंनी पाहिला अन् कौतुकाचा फोन केला; आदित्य सरपोतदारने सांगितला किस्सा Aditya Sarpotdar shared experience of Raj Thackeray after showing him Munjya Bollywood Movie Trailer With Abp Majha Aditya Sarpotdar : मुंज्याचा ट्रेलर राज ठाकरेंनी पाहिला अन् कौतुकाचा फोन केला; आदित्य सरपोतदारने सांगितला किस्सा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/23/aa61dad7c409a075219e919fbe90feff1719148298039720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Aditya Sarpotdar : 'मुंज्या' (Munjya) या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर सध्या बरीच हवा पाहायला मिळतेय. अवघ्या 16 दिवसांत या सिनेमाने 80 कोटींचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे आदित्य सरपोतदारचा (Aditya Sarpotdar) हा सिनेमा लवकरच 100 कोटींच्या घरात प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जातंय. कोणाताही गाजावाजा न करता, फक्त दोन आठवड्यात प्रमोशन करुन मुंज्याने ही घोडदौड केलीये. इतकंच नव्हे तर मुंज्याचा ट्रेलर पाहून राज ठाकरेंनी (Raj Thackeray) देखील आदित्यला फोन केला होता. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये हा किस्सा सांगितला आहे.
मुंज्याचं दिग्गजांनी केलेल्या कौतुकाविषयी सांगताना आदित्यने राज ठाकरेंचा किस्सा सांगितला. मुंज्याचा ट्रेलर आदित्यने राज ठाकरेंना पाठवला होता. त्यावर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली याविषयी देखील आदित्यने सांगितलं. तसेच राज ठाकरेंनी कौतुक केल्यावरच्या भावना देखील आदित्यने एबीपी माझाच्या प्रेक्षकांसोबत शेअर केल्या आहेत.
ट्रेलर पाहिल्यावर काय होती राज ठाकरेंची प्रतिक्रिया?
दिग्गजांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर भाष्य करताना आदित्यने म्हटलं की, करण जौहर पासून शाहिद कपूरपर्यंत सगळ्यांनी मेसेज करुन कौतुक केलं. एकता कपूरने फोन केला, गिफ्ट पाठवलं. राज ठाकरे, विश्वास नांगरे पाटील यांनी देखील सिनेमाचं कौतुक केलं.राज ठाकरेंनी काय कौतुक केलं, यावर आदित्यने म्हटलं की, मी त्यांना भेटून मुंज्याचा ट्रेलर दाखवला. ते त्यांना फार आवडलं होतं आणि आम्ही त्यावर चर्चा देखील केली होती. जेव्हा मराठी टीम, मराठी दिग्दर्शक हिंदीत काम करतात आणि त्याचं कौतुक जेव्हा मराठीत होतं, तेव्हा मला फार भरुन येतं.
मुंज्या हाच खरा माझ्या सिनेमाचा हिरो - आदित्य
बॉलीवूडच्या लोकप्रिय चेहऱ्यावर भाष्य करताना आदित्यने म्हटलं की, लोकप्रिय चेहऱ्यांमधून ते काहीतरी बॅगेज घेऊन येतात. हिंदीमध्ये तो लोकप्रिय कशावरुन होतात, की त्यांचं मागचं पात्र हे लोकांना आवडलेलं असतं. त्यामुळे लोकांना त्यांनी तशीच भूमिका करावी आणि आमच्या भेटीला यावं अशी अपेक्षा खूप असते. त्यामुळे नवीन कलाकार तुम्ही जेव्हा घेता हिंदीसाठी तेव्हा ते त्याच्या एक पात्र म्हणून पाहतात आणि मुंज्यामध्ये त्या पात्रांची गरज होती.
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)